सांस्कृतिक क्रांतीचा नॉस्टाल्जिया झपाट्याने वाढला, नाहीसा झाला

0

सांस्कृतिक क्रांतीच्या जुन्या आठवणींची लाट अचानकपणे गेल्या आठवड्यात चीनच्या इंटरनेटवर पसरलेली बघायला मिळाली. ती ज्या वेगाने पसरली तितक्याच वेगाने ओसरली देखील. सांस्कृतिक क्रांती (1966-1976) ही माओ त्से तुंग यांनी साम्यवादी विचारधारा बळकट करण्यासाठी आणि “भांडवलशाही” घटक नष्ट करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आणि  एक दशकभर चाललेली राजकीय चळवळ होती. यामुळे संपूर्ण चीनमध्ये मोठी अराजकता माजली होती, अपरिमित छळ आणि सांस्कृतिक वारशाचा विध्वंस झाला होता.

सांस्कृतिक क्रांतीच्या उत्तरार्धात घडलेल्या घटनांवर आधारित  आलेल्या 2017 च्या ‘युथ’ (फांगहुआ) या चिनी चित्रपटाबद्दल एका सुप्रसिद्ध इन्फ्यूएन्झरने केलेल्या चित्रपट पुनरावलोकनाचा  व्हिडिओ, चीनच्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या बिलिबिलीवर, विशेषतः तरुण प्रेक्षकांमध्ये, व्हायरल झाला. अर्थात पुढे कोणतेही स्पष्टीकरण न देता इंटरनेटवरून गायब होण्यापूर्वी या पुनरावलोकनास 3 कोटी 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.

माओ-युगातील घोषणांनी व्हिडिओवर कमेंट्सचा पूर

व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय होत असताना, हजारो प्रेक्षकांनी “Long live the people” आणि “Carry on to the end” अशा घोषणांनी कमेंट स्ट्रीम भरून टाकला. बिलिबिलीवर, रिअल टाइममध्ये व्हिडिओवर आलेल्या थेट कमेंट्स दिसतात. त्यातील आवाज आणि टोन यातून हेच सूचित होते की चर्चा चित्रपटाच्या पलीकडे गेली आहे.

व्हिडिओमधील एका स्क्रीनशॉटमध्ये नेटिझन्स कमेंट सेक्शनमध्ये माओ काळातील “लोकांचे चिरंजीव व्हा” हे घोषवाक्य पोस्ट करताना दिसत आहे, जे व्हिडिओ प्ले होताच थेट स्क्रीनवर दिसतात, कारण बिलिबिली अॅप रिअल टाइममध्ये कमेंट्स दाखवते.

“Long live the people” हे  वाक्य माओ काळापासून चालत आले आहे आणि सांस्कृतिक क्रांतीदरम्यान राष्ट्रीय सत्तेचा खरा पाया म्हणून सामान्य नागरिकांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले गेले. काळानुरूप हे वाक्यही रोजच्या वापरातून आता बाजूला सारले गेले असले तरी, अलिकडच्या वर्षांत, विशेषतः 2025 मध्ये, तरुण चिनी  बेरोजगारी, असमानता आणि घटत्या संधींबद्दल निराशा व्यक्त करण्यासाठी शांतपणे त्याचा वापर करतात, कारण त्यांना सरकारवर थेट टीका करता येत नाही.

व्हिडिओ जलद गतीने काढून टाकणे आणि सार्वजनिक प्रतिक्रिया

शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी पुनरावलोकन व्हिडिओने  35 दशलक्ष व्ह्यूज ओलांडल्यानंतर, हा व्हिडिओ अचानक काढून टाकण्यात आला आणि प्रमुख चिनी प्लॅटफॉर्मवरील संबंधित चर्चेचे थ्रेड्सही हटवण्यात आले.

माओ-युगातील जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या रेड सॉंग नेटवर्क या प्रसिद्ध संकेतस्थळाने वेइबोवर पोस्ट केले की पुनरावलोकन व्हायरल झाले कारण युजर्सनी चित्रपटाचे कौतुक केले नसले तरी त्यात आज तरुणांना भेडसावणाऱ्या वास्तविक चिंता प्रतिबिंबित झाल्या आहेत, ज्यात मर्यादित गतिशीलता आणि वाढत्या अन्याय यांचा समावेश आहे.

शिन्हुआचे माजी पत्रकार वांग है यांनी लिहिले की प्रेक्षक “चित्रपट पाहत नाहीत, तर वर्तमानाबद्दल बोलण्यासाठी भूतकाळाचा वापर करत आहेत”, असे सुचविते की इतिहास अशा तक्रारींसाठी एक पर्यायी भाषा बनली आहे ज्या उघडपणे व्यक्त करता येत नाहीत.

एक झलक जी पटकन हटवली गेली

या आशयात युजर्स मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, तोच आशय हटवण्याचे काम जलद गतीने सुरू झाले. सांस्कृतिक क्रांतीचे संदर्भ चीनमधील सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयांपैकी एक आहेत आणि जुन्या घोषणांचे पुनरुज्जीवन, विशेषतः अभिजात वर्गविरोधी भावनांशी संबंधित, प्लॅटफॉर्मना जलद गतीने पुढे जाण्यास प्रवृत्त करणारे आहेत. चित्रपट पुनरावलोकन म्हणून जे सुरू झाले ते चीनच्या तरुण पिढीसमोरील दबावांची एक संक्षिप्त, सार्वजनिक झलक बनली, परंतु नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गायब झाली.

रेशम
व्हिडिओमधील एका स्क्रीनशॉटमध्ये नेटिझन्स कमेंट सेक्शनमध्ये माओ काळातील “लोकांचे चिरंजीव व्हा” हे घोषवाक्य पोस्ट करताना दिसत आहे, जे व्हिडिओ प्ले होताच थेट स्क्रीनवर दिसतात, कारण बिलिबिली अॅप रिअल टाइममध्ये कमेंट्स दाखवते.

+ posts
Previous articleपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी, ओमान जग्वार लढाऊ विमाने भारताकडे सोपवणार
Next articleरडार वादाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून जपानच्या “लष्करी चिथावणीचा” निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here