हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ते MIRV तंत्रज्ञान: DRDO च्या यशस्वी टप्प्यांचा आढावा

0
DRDO

संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीने, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO), त्यांच्या स्वदेशी संशोधन आणि विकास उपक्रमांद्वारे, गेल्या पाच वर्षांत 2,64,156 कोटींची बचत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

मंगळवारी, संसदेत सादर केलेल्या एका अहवालात संरक्षण संसदीय स्थायी समितीने म्हटले आहे की, DRDO ने मागील आणि चालू आर्थिक वर्षात, पुढील पिढीतील हायपरसॉनिक तंत्रज्ञान आणि प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यामध्ये ‘महत्त्वाचे टप्पे’ गाठले आहेत.

DRDO च्या ‘वैविध्यपूर्ण कामगिरी’बद्दल त्यांचे अभिनंदन करताना, समितीने असा विश्वास व्यक्त केला की, संस्था गुंतागुंतीच्या आणि महत्त्वपूर्ण संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताच्या क्षमतांना नेहमीच प्रगतीच्या दिशेने पुढे नेत राहील.

अहवालानुसार, संरक्षण मंत्रालयाने समितीला अनेक महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली, ज्यामध्ये भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक जहाजविरोधी क्षेपणास्त्राची, नोव्हेंबर 2024 मध्ये झालेली यशस्वी उड्डाण-चाचणी समाविष्ट आहे. यापूर्वी, मार्च 2024 मध्ये, DRDO ने अग्नी-श्रेणीतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करून ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV)’ तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी चाचणी घेतली, ज्यामुळे एकाच क्षेपणास्त्राद्वारे विविध टार्गेट्सवर, एकाच वेळी अनेक वॉरहेड्स तैनात करणे शक्य झाले आहे.

समितीला अन्य यशस्वी स्वदेशी टप्प्यांविषीयी माहिती देण्यात आली, जसे की

  • अति-लघु पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली (VSHORADS) यशस्वीपणे विकसित करण्यात आली आणि तिची उड्डाण-चाचणीही यशस्वी झाली आहे.
  • मॅन-पोर्टेबल रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची (MPATGM) भारतीय लष्करासह प्रासंगिक कर्मचारी गुणात्मक आवश्यकता प्रमाणीकरण चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

निवृत्तीवेतनाचे ‘स्पर्श’ प्रणालीकडे स्थलांतर जवळपास पूर्ण

एका स्वतंत्र अहवालात समितीने नमूद केले की, भारतात सध्या 6,40,536 संरक्षण नागरी निवृत्तीवेतनधारक आणि 26,79,645 सशस्त्र दलांचे निवृत्तीवेतनधारक आहेत.

निवृत्तीवेतन मंजुरी आणि वितरणाची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, संरक्षण मंत्रालय ‘स्पर्श’ किंवा सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन- Raksha प्रणाली लागू करत आहे, असे या अहवालात नमूद केले आहे. आत्तापर्यंत, 28.24 लाख संरक्षण निवृत्तीवेतनधारक ‘स्पर्श’ प्रणालीकडे स्थलांतरित झाले आहेत, ज्याद्वारे आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये ऑगस्ट 2024 पर्यंत 67,388.45 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

स्थलांतराच्या प्रमाणाचे कौतुक करताना, समितीने उर्वरित निवृत्तीवेतनधारकांना तातडीने ‘स्पर्श’ प्रणालीवर आणण्याची शिफारस केली.

भारताच्या संरक्षण निर्यातीचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, नव्याने स्थापन झालेल्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी प्रमुख लक्ष्य म्हणून, देश आणि त्यांच्या सध्याच्या तसेच भविष्यातील गरजांनुसार निर्यात करण्यायोग्य उत्पादने निश्चित केली आहेत, असेही समितीने नमूद केले आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारत–ब्राझीलच्या नौदल प्रमुखांद्वारे पाणबुडी समर्थन सामंजस्य करारावर स्वाक्षरी
Next articleरिक स्वित्झर यांचा दौरा, भारतासाठी अप्रत्यक्ष ताकीद आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here