दुसरे MH-60R हेलिकॉप्टर पथक, 17 डिसेंबरला नौदलात दाखल होणार

0
MH-60R
MH-60R सीहॉक पाणबुडी-हटींग हेलिकॉप्टर

भारतीय नौदल 17 डिसेंबर रोजी, गोव्यातील ‘INS हंसा’ येथे ‘MH-60R सीहॉक पाणबुडी-शोधक हेलिकॉप्टरची’ दुसरे स्क्वाड्रन, ‘INAS 335 (ओस्प्रेयस)’ चा नौदलात समावेश करणार असून, यामुळे नौदलाच्या एकात्मिक विमान वाहतूक आणि सागरी युद्ध क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडेल आणि नौदलाच्या सध्या सुरू असलेल्या आधुनिकीकरण मोहिमेतील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल, अशी माहिती नौदल प्रवक्त्यांनी रविवारी दिली.

निवेदनानुसार, MH-60R हे हेलिकॉप्टर त्यातील अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि एव्हिऑनिक्स प्रणालीमुळे, पारंपरिक तसेच असममित सागरी धोक्यांचा सामना करणारे एक सक्षम बहुउपयोगी व्यासपीठ ठरते. “याआधी हे हेलिकॉप्टर नौदल ताफ्याच्या ऑपरेशन्समध्ये समाविष्ट केले गेले असून, त्याने अनेक प्रसंगामध्ये आपली योग्यता सिद्ध केली आहे,” असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या नव्या स्क्वाड्रनमुळे नौदलाच्या ऑपरेशनल सज्जतेला भक्कम चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

INAS 335 चा समावेश, मार्च 2024 मधील नौदलाच्या पहिल्या MH-60R स्क्वाड्रनच्या समावेशानंतर होतो आहे. ही दोन्ही युनिट्स एकत्रितपणे, नौदलाच्या प्रमुख कार्यक्षेत्रांमधील पाणबुडीविरोधी युद्ध, पृष्ठभागविरोधी युद्ध, देखरेख आणि सागरी आघात क्षमतांना अधिक मजबूत करतील.

MH-60R हेलिकॉप्टर्स फेब्रुवारी 2020 मध्ये, अमेरिकेसोबत स्वाक्षरी केलेल्या 24 विमानांच्या विदेशी लष्करी विक्री कराराचा भाग आहेत. लॉकहीड मार्टिनने यूएस नौदलांच्या तपशीलांनुसार तयार केलेले, MH-60R – ज्याला “रोमिओ” या टोपणनावाने ओळखले जाते, ते जागतिक स्तरावर सेवेत असलेल्या सर्वात प्रगत मल्टी-रोल सागरी हेलिकॉप्टर्सपैकी एक असल्याचे मानले जाते.

मल्टी-मोड रडार, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट उपाययोजना, इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड सेन्सर्स, डेटा लिंक्स, विमान टिकाव प्रणाली, तसेच डिपिंग सोनार आणि सोनोबॉइज प्रणालीने सुसज्ज असलेले हे हेलिकॉप्टर, पृष्ठभाग आणि पाण्याखालील वातावरणात सर्वसमावेशक डोमेन जागरूकता प्रदान करते. हेलिकॉप्टरची पूर्णपणे समाकलित मिशन प्रणाली, क्रू मेंबर्सना मोठ्या प्रमाणावरील सेन्सर डेटावर जलदगतीने प्रक्रिया करण्यास आणि कृतीयोग्य ऑपरेशनल चित्र तयार करण्यास सक्षम करतो.

टॉर्पेडो, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि क्रू-संचालित तोफांनी सुसज्ज असलेले MH-60R हेलिकॉप्टर, हे भारतीय नौदलासाठी एक शक्तीशाली व्यासपीठ आहे, विशेषत: दिवसेंदिवस स्पर्धात्मक होत असलेल्या हिंद महासागर क्षेत्रामध्ये निरंतर सागरी ऑपरेशन्सस पार पाडण्यासाठी हे हेलिकॉप्टर एक प्रभावशाली पर्याय आहे, जे जहाजावरुन आणि जमिनीवरुन संचालित केले जाऊ शकते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleबोंडी हल्ला: ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची अधिक कठोर शस्त्र कायद्यांची मागणी
Next articleयूएई आणि सौदी अरेबियाला मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे चीनचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here