AviaIndra 2025: भारतीय हवाई दलाचा रशियासोबत संयुक्त हवाई सराव

0

भारतीय हवाई दल (IAF) 15 ते 22 डिसेंबर दरम्यान, रशियन फेडरेशन एरोस्पेस फोर्स (RFASF) सोबत, ‘एव्हियाइंद्रा-2025’ (AviaIndra-2025) या संयुक्त हवाई सरावाचे आयोजन करत आहे. हा उपक्रम भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण भागीदारीला अधोरेखित करतो.

हा सराव ‘एव्हियाइंद्रा’ मालिकेचा भाग आहे, ज्याची सुरुवात 2014 मध्ये झाली होती. दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील ऑपरेशनल सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये दोन्ही हवाई दले, Su-30 MKI आणि तेजस या लढाऊ विमानांसह, तसेच IL-78 एरिअल रिफ्युलर्स आणि Mi-17 या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने संयुक्त उड्डाण मोहिमा राबवत आहेत.

भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हा सराव सर्वोत्तम पद्धती आणि आत्मसाद केलेले रणनैतिक धडे सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो, तसेच परस्पर सामंजस्य आणि एरोस्पेस समन्वय वाढवतो. “एव्हियाइंद्रा-2025 सराव द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याची आणि संयुक्त ऑपरेशनल क्षमता सुधारण्याची संधी देतो,” असे हवाई दलाने म्हटले आहे.

मंगळवारी ‘X’ वरील एका पोस्टमध्ये या सरावाची घोषणा करताना, हवाई दलाने नमूद केले की, ‘एव्हियाइंद्रा-2025 भारत-रशियामधील चिरंतन संबंध प्रतिबिंबित करतोे आणि दोन्ही दलांमध्ये विश्वास आणि सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने लष्करी सहभागाची परंपरा सुरू ठेवतो.’


हा सराव, भारत-रशिया संरक्षण संबंधांमध्ये नव्याने झालेल्या प्रगतीनंतर लगेचच होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान, नवी दिल्ली आणि मॉस्को यांनी संरक्षण भागीदारीचा अधिक विस्तार करण्याला मान्यता दिली, ज्यामध्ये विशेष लष्करी तंत्रज्ञान आणि वर्धित संरक्षण-औद्योगिक सहकार्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.

या भेटीदरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे रशियन समकक्ष आंद्रेई बेलोसोव्ह यांनी पुनरुच्चार केला की, “हे द्विपक्षीय संरक्षण संबंध; विश्वासाची सखोल भावना, समान तत्त्वे आणि परस्पर आदर यावर आधारित आहेत.” या भेटीदरम्यान, दोन्ही बाजूंनी संरक्षण सहकार्याची सध्याची आणि संभाव्य क्षेत्रे दर्शवणारा एक प्रोटोकॉल देखील स्वाक्षरित केला गेला, जो दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि दीर्घकालीन लष्करी संबंधांना बळकटी देतो.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleतीन अपाचे हेलिकॉप्टरची अंतिम तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द
Next articleIndian Army Contingent Heads to UAE for Desert Cyclone-II Joint Military Exercise

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here