चीनकडून विकत घेतले जात आहेत सोशल मीडिया इन्फ्युएन्झर्स

0

तैवानबद्दल खोट्या गोष्टी पसरवण्यासाठी आणि त्याची सामाजिक तसेच लष्करी ताकद कमकुवत करण्यासाठी इटलीस्थित एका ‘लष्करी इन्फ्युएन्झर’ ची नियुक्ती करण्याचा चीनचा प्रयत्न चिनी भाषिक ऑनलाइन वर्तुळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

हा लष्करी इन्फ्युएन्झर  “झू मौ-रेन – जो सत्य बोलतो” या नावाने प्रसिद्ध आहे.  पुढे जाण्यापूर्वी, लष्करी इन्फ्युएन्झर म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. मुळात, तो किंवा ती देशाच्या सशस्त्र दलाचा एक सेवेत असलेला सदस्य किंवा माजी सैनिक असतो, जो लष्करी जीवनातील अस्सल अनुभव शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतो.

आता, झू मौ-रेनने PLA मध्ये कधी सेवा केली होती की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नसली तरी तो इटलीमध्ये राहतो, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर काय पोस्ट करायचे याबद्दल काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळते असे दिसते. तिथे त्याने दावा केला आहे की, “सनसेट पायरेट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका चिनी इन्फ्युएन्झरने चीनच्या लष्करी गुप्तचर विभागाच्या वतीने त्याच्याशी संपर्क साधला होता.

झूने यूट्यूबवर पोस्ट केलेल्या लीक झालेल्या ऑडिओ व्हिडिओमधील स्क्रीनशॉट.

तैवानच्या आत्मविश्वासाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न

सनसेट पायरेटने तैवानच्या लष्करी क्षमतांवर टीका करणारा आशय तयार करण्यासाठी झू यांना दरमहा सुमारे 43 हजार डॉलर्स देण्याची ऑफर दिली होती, असा आरोप आहे. झू यांच्या म्हणण्यानुसार, याचा उद्देश तैवानच्या समाजात स्वतःच्या संरक्षण क्षमतेबद्दलचा आत्मविश्वास कमकुवत करणे हा होता. त्या मध्यस्थाने असेही सुचवले की, झू यांचा आशय बीजिंग-समर्थक दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे पुनर्प्रसारित केली जाऊ शकते, ज्यामुळे त्याचा प्रभाव वाढेल.

या दोघांमधील वाद कथितरित्या चिनी लोकांच्या अवैध स्थलांतराशी संबंधित एका वेगळ्या प्रकरणावरील भिन्न मतांमुळे सुरू झाला. यानंतर, झू यांनी ही ऑफर सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आणि पुरावा म्हणून ऑडिओ जारी केला.

या रेकॉर्डिंगमध्ये, सनसेट पायरेट दावा करतो की त्याने जपान, इटली आणि अमेरिकेत संगीत, प्रवास, खाद्यपदार्थ आणि ऑटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रांतील अनेक इन्फ्लुएन्सर्सना विकत घेतले आहे.

त्याच्या म्हणण्यानुसार, त्यांचे मुख्य काम राजकीय संदेश उघडपणे देणे हे नव्हते, तर चिनी संस्कृती आणि विचारसरणीचा सूक्ष्मपणे प्रचार करणे हे होते. त्याने यामागच्या मार्गदर्शक तत्त्वाचे  ‘शांतपणे गोष्टींना हवा देणे’ असे वर्णन केले, म्हणजेच लक्ष वेधून न घेता हळूहळू प्रभाव वाढवत नेणे.

मर्यादा आणि सेन्सॉरशिप

चीनशी हातमिळवणी करण्यासोबत काही अटी होत्या: चिनी कम्युनिस्ट पक्षावर मर्यादित स्वरूपाची टीका स्वीकारार्ह होती, परंतु शी जिनपिंग यांच्यावर कोणतीही टीका करण्यास सक्त मनाई होती.

या रेकॉर्डिंगमधून असेही सूचित होते की, युक्रेनच्या कमकुवतपणावर प्रकाश टाकण्यासाठी आणि तैवानचा त्यांच्या स्वतःच्या लष्करी लवचिकतेवरील आत्मविश्वास कमी करण्यासाठी, झू यांना रशिया-युक्रेन युद्धावरही  भाष्य करण्यास सांगितले गेले होते.

वाढत्या गुप्त प्रभाव मोहिमेबद्दल तज्ज्ञांचा इशारा

तैवानस्थित जपानी पत्रकार अकियो याइता यांच्या मते, कथानक आणि माहिती युद्धासाठी परदेशातील तसेच तैवानमधील इन्फ्युएन्झर्सना आपल्या बाजूने वळवण्यासाठी बीजिंगकडून एक पद्धतशीर मोहीम चालवली जात आहे.

त्यांच्या मते, समान भाषा असल्यामुळे, अनेक तैवानी इन्फ्युएन्झर्सशी आधीच संपर्क साधला गेला असण्याची शक्यता खूप जास्त आहे. बीजिंगचे काम करण्यासाठी त्यांना आकर्षक रकमेची ऑफर दिली गेली असण्याची शक्यता आहे.

एखादा इन्फ्युएन्झर शी जिनपिंग यांच्यावर उघडपणे टीका करतो की नाही, हे महत्त्वाचे आहे. अशी टीका केवळ त्या इन्फ्युएन्झरलाच धोक्यात घालत नाही, तर त्या व्यक्तीला ‘नियंत्रित’ करणाऱ्या व्यक्तीसाठीही धोका निर्माण करते. त्यामुळे, जर सोशल मीडियावर कोणी सातत्याने चीनच्या बाजूने भूमिका घेत असेल, तर तो किंवा ती चीनच्या तालावर नाचत आहे, हा एक इशारा ऐकणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवा.

ही कहाणी आणखी एका मुद्द्यावर प्रकाश टाकते: सोशल मीडिया सुरक्षा आणि सार्वभौमत्वावरील जनमताला अधिकाधिक आकार देत असताना, सर्वाधिक धोका मोठ्याने केल्या जाणाऱ्या प्रचाराचा नाही, तर शांत, विश्वासार्ह आवाजांचा आहे, जे वाजवी, संतुलित आणि टीकात्मक वाटत असले, तरीही ते काही विशिष्ट मर्यादा कधीही ओलांडत नाहीत. प्रेक्षकांसाठी एक धडा स्पष्ट आहे: माहिती युद्धाच्या युगात, जे बोलले जाते त्यापेक्षा जे अनुत्तरित राहते ते अधिक महत्त्वाचे असू शकते, आणि तटस्थता हीच कधीकधी सर्वात काळजीपूर्वक तयार केलेली भूमिका असू शकते.

रेशम

+ posts
Previous articleबांगलादेशातील घटना पाकिस्तानच्या रणनीतीला पूरक
Next articleडिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘टोन्बो इमेजिंग’ IPO जाहीर करण्याच्या तयारीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here