हेरगिरी लोकप्रिय संस्कृतीत रूपांतरित करण्याचा चीनचा प्रयत्न

0
चीनचा

राष्ट्रीय सुरक्षा हा विषय यापुढे केवळ गोपनीय बैठका आणि गंभीर पक्षीय दस्तऐवजांपुरता मर्यादित राहणार नाही असा निर्णय चीनने घेतला आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा चित्रांमध्ये असणारे संवाद-फुगे, नाट्यमय रेखाचित्रे आणि चांद्र नववर्षाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या रूपाने चिनी जनतेसमोर येत आहे.

2024 मध्ये राज्य-समर्थित गुप्तहेरगिरीवरील कॉमिक म्हणून पुस्तक संचाच्या रूपात सुरू झालेली ही मोहीम हळूहळू एका सर्वसमावेशक लोकप्रिय संस्कृतीच्या मोहिमेत विकसित होत आहे. 2026 पर्यंत, राष्ट्रीय सुरक्षेचा संदेश मोठ्या बजेटच्या चित्रपटांच्या रूपात चिनी चित्रपटगृहांमध्ये पोहोचेल, ज्यामुळे हे सुनिश्चित होईल की गुप्तहेरविरोधी चिंता अशा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, जे कदाचित पॉपकॉर्न खात हलकेफुलके मनोरंजन व्हावे यासाठी आले असतील, पण गुप्तहेरांचा विचार करत बाहेर पडतील.

गोपनीय बैठकांपासून कॉमिक पॅनल्सपर्यंत

या बदलाची पहिली चिन्हे जानेवारी 2024 मध्ये दिसली, जेव्हा राज्य सुरक्षा मंत्रालयाने प्रत्यक्षातील गुप्तहेर प्रकरणांवर आधारित ऑनलाइन कॉमिक पुस्तकांची एक मालिका प्रसिद्ध केली. सरकारी मालकीच्या ग्लोबल टाइम्सने हा उपक्रम योग्य त्या भव्य शब्दांत सादर केला, आणि वाचकांना आठवण करून दिली की, “राष्ट्रीय सुरक्षा हा राष्ट्रीय पुनरुत्थानाचा पाया आहे.” मात्र त्याचे स्वरूप अजिबात गंभीर नव्हते: उलट आकर्षक चित्रे, उत्कंठावर्धक कथानक आणि स्पष्ट नैतिक संदेश यांची रचना अशा प्रकारे केली होती की, मंत्रालयाच्या सूचनांपेक्षा मंगा पॅनल्सशी अधिक परिचित असलेल्या digital-first generation ला गुप्तचर धोके सहज समजण्यासारखे आणि लक्षात राहण्यासारखे व्हावेत.

नागरिक दक्षतेसाठी व्यापक मोहीम

पाश्चात्त्य देशांसोबत गुप्तचर स्पर्धा तीव्र होत असताना, चिनी पक्ष-राज्यातील खोलवरच्या अस्वस्थतेचे प्रतिबिंब लोकप्रिय संस्कृतीच्या स्वीकृतीमध्ये दिसून येते. चीनमध्ये हेरगिरीचे जाळे पुन्हा उभारण्याबद्दल सीआयएने केलेल्या सार्वजनिक खुलाशांमुळे, राष्ट्रीय सुरक्षा केवळ गडद सूट घातलेल्या व्यावसायिकांवर सोपवली जाऊ शकत नाही, या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दीर्घकाळापासूनच्या मताला दुजोरा मिळाला आहे. त्याऐवजी, ती सर्वसामान्यांची देखील सवय बनली पाहिजे. जेव्हा सीआयएने चिनी नागरिकांना उद्देशून थेट मँडरीन भाषेत एक प्रचार व्हिडिओ जारी केला, तेव्हा या संदेशावर अधिक जोर देण्यात आला; ही एक असामान्य कृती होती, जी बीजिंगच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते.

या जनसंघटनाचे पुरावे या कॉमिक्सच्या आधीपासूनच उपलब्ध आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये, झेंगझोऊजवळील झिनझेंग शहरात संशयित हेरांची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस देणारे पोस्टर लावलेल्या बसेसचे फोटो वेइबोवर प्रसारित झाले होते. संदेश स्पष्ट आणि निःसंदिग्ध होता: दक्षता ही एका वेळी एका बस रुटद्वारे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली जात होती.

हेरगिरी आता मोठ्या पडद्यावर

आता ही मोहीम मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचत आहे. चीनचा समकालीन राष्ट्रीय सुरक्षेवर आधारित पहिला मोठा चित्रपट चांद्र नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, जो देशातील चित्रपट व्यवसायासाठी सर्वात फायदेशीर काळ असतो. रॉयटर्सच्या मते, ‘जिंगझे वुशेंग’ (स्केअर आउट) या चित्रपटाची कथा चीनच्या नवीनतम फायटर जेटशी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीभोवती फिरते, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी आणि एका संशयित गुप्तहेरामध्ये तीव्र पाठलाग सुरू होतो. दक्षिणेकडील तंत्रज्ञान केंद्र असलेल्या शेन्झेनमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रित झालेल्या या चित्रपटाची, आधुनिक हेरगिरीच्या धोक्यांवर थेट लक्ष केंद्रित करणारा चीनचा पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट म्हणून जाहिरात केली जात आहे.

राज्य सुरक्षा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली निर्मित हा चित्रपट, हेरगिरीविरोधी मोहिमेला मुख्य प्रवाहातील मनोरंजनात आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने हा उद्देश स्पष्ट केला आहे, की हेरगिरी हा आता दूरचा किंवा काल्पनिक धोका राहिलेला नाही, तर तो “प्रत्येकाशी संबंधित” आहे. झांग यिमौ दिग्दर्शित आणि यी यांगकियानक्सी व झू यिलॉन्ग अभिनीत हा प्रकल्प बीजिंगच्या व्यापक सॉफ्ट-पॉवर धोरणाशी सुसंगत आहे, कारण शी जिनपिंग लष्करी आधुनिकीकरणासोबतच सांस्कृतिक कथनाच्या भूमिकेवर सतत भर देत आहेत.

थोडक्यात सांगायचे तर, चीनचा संदेश स्पष्ट आहेः राष्ट्रीय सुरक्षा हा एक गंभीर व्यवसाय आहे, परंतु तो मनोरंजक कथानक आणि चित्रपटगृहात विकला जाऊ नये असे थोडीच आहे.

रेशम

+ posts
Previous articleसंबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी भारत-EU शिखर परिषद सज्ज
Next articleॲपवरील बंदी टाळण्यासाठी अमेरिकेत TikTok च्या मालकी हक्कात बदल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here