ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी हे दिल्ली भेटीवर आले होते. भारत ब्रिटन यांच्यातील नव्या संबंधांचे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले होते.
यावर्षी मे महिन्यात ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टिम बॅरो यांच्या दौऱ्यादरम्यान उभय देशांनी मान्य केलेला तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम (टीएसआय) हा विषय लॅमी यांच्या या भेटीत अग्रस्थानी होता. टीएसआय ही तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यासाठी तयार केलेली एक महत्त्वपूर्ण आणि उदयोन्मुख द्विपक्षीय चौकट आहे.
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लॅमी यांच्या दौऱ्याबाबत बुधवारी रात्री उशिरा परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोनही देश सार्वजनिक, खाजगी तसेच शैक्षणिक विभागातील प्रमुख क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करण्यास उत्सुक आहेत.
भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उभय देशांच्या परराष्ट्र मंत्रालयासमवेत टीएसआय संबंधित नियामक आणि परवान्याच्या मुद्द्यांवर समन्वय साधणार आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
दोन्ही देश जागतिक तंत्रज्ञान प्रशासनावर संवाद साधतील, डिजिटल तंत्रज्ञान स्टॅडर्टवरील भूमिकेबाबत समन्वय साधतील आणि इंटरनेट प्रशासनाच्या बहु-भागधारक मॉडेलला पाठिंबा देतील.
टेलिकॉम
दोन्ही देश भविष्यातील टेलिकॉम, ओपन रॅन सिस्टीम्स, टेस्टबेड लिंकअप्स, सुरक्षा, स्पेक्ट्रम इनोव्हेशन, सॉफ्टवेअर आणि सिस्टीम्स आर्किटेक्चरमधील संयुक्त संशोधनावर लक्ष केंद्रित करतील. भारताचे सी-डॉट, डीओटीचे टेलिकॉम स्टार्टअप मिशन आणि ब्रिटनमधील सोनिक लॅब्स वरील गोष्टींवर एकत्र काम करतील.
यू. के. टेलिकॉम इनोव्हेशन नेटवर्क, यॉर्क विद्यापीठ आणि इतरांच्या सहकार्यासह भारतीय आणि ब्रिटीश संस्था 6जी तंत्रज्ञान या आणखी एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.
क्रिटिकल मिनरल्स
या संदर्भात केंब्रिज विद्यापीठ, आयआयटी धनबाद आणि आयआयटी मुंबई यांच्यात पुरवठा साखळी, निष्कर्षण तंत्रज्ञान, खनिज प्रक्रिया, माहिती व्यवस्थापन इत्यादींवरील माहिती शेअर करतील.
याशिवाय भारतातील संयुक्त महत्त्वपूर्ण खनिज पुनर्वापर केंद्राचादेखील वापर करतील. यात “प्रगत लष्करी कचऱ्याचा पुनर्वापर यावर अभ्यास केला जाईल, पण ते इतकेच मर्यादित नसेल.”
सेमीकंडक्टर्स
दोन्ही देश चिप डिझाइन, प्रगत पॅकेजिंग, निव्वळ शून्य प्रक्रिया आणि सायबर सुरक्षा यासारख्या अनुप्रयोगांचा शोध घेतील. चिप्सचे उत्पादन आणि रचना करण्यासाठी पुरवठा साखळी एकत्रित करण्यावर ते काम करतील. तसेच भारतीय आणि ब्रिटीश कंपन्या भागीदारीत काम करतील अशा व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात, ‘सुरक्षित, जबाबदार, मानव केंद्रित आणि विश्वासार्ह एआय’ वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दोन्ही बाजू एआय मेकॅनिझमसाठी सहकार्य आणि धोरणात्मक देवाणघेवाणीसाठी एक यंत्रणा स्थापन करतील; एआय संशोधक, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांना एआय अल्गोरिदममधील बायस शोधण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि आव्हान देण्यासाठी सुसज्ज करतील; हवामान विज्ञानासाठी एआयटी विकसित करतील; आणि आयआयटी मद्रास, आयआयएससी बंगळुरू आणि साउदॅम्प्टन तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठांकडून करण्यात आलेल्या परिणामाभिमुख शिफारशींसाठी कामाची उभारणी करतील.
ब्रिटनमधील ॲलन ट्युरिंग इन्स्टिट्यूट आणि भारतीय संस्थाही सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा वापर करण्याच्या दृष्टीने सहकार्य करतील.
क्वांटम
क्वांटम क्षेत्रात लाइफ सायन्सेस, ऑटोमोटिव्ह, केमिकल्स आणि हरितगृह वायू क्षेत्रातील क्वांटम अल्गोरिदम आणि उपाययोजनांमध्ये संयुक्त हॅकेथॉनवर काम करतील. ब्रिटनचे इम्पीरियल कॉलेज आणि भारताचे सी-डॉट, ओआरसीए आणि दूरसंचार अभियांत्रिकी केंद्र कौशल्य विकासावर काम करतील.
बायोटेक
जैवतंत्रज्ञानातील सहयोगामध्ये जनुकशास्त्र, जनुकीय अंदाज आणि अचूक औषध, जैव-संवेदक, जैव-इलेक्ट्रॉनिक्स, जैव-सामग्री आणि जैव-निर्मिती यांचा समावेश असेल.
ॲडव्हान्स मटेरिअल्स
दोन्ही देश नवीन मिश्रधातू, पावडरी आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणातही वापरता येईल अशा प्रगत सामग्रीवर सहकार्याने काम करतील.
मँचेस्टरच्या ग्रॅफीन इन्स्टिट्यूटची विद्यापीठे आणि केंब्रिज विद्यापीठातील संस्था भारतीय विज्ञान संस्थेसोबत द्विमितीय आणि अणूदृष्ट्या विरल साहित्य आणि नॅनो तंत्रज्ञानावर काम करतील. ते शैक्षणिक पात्रता आणि प्रमाणपत्रावरही काम करतील.
सूर्या गंगाधरन