शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यानंतर बांगलादेशात सध्या ‘इंडिया आऊट’ वातावरण तीव्रपणे दिसून येत आहे. बीएनपीच्या नेत्या खालिदा झिया यांचा मुलगा तारिक रहमान या सगळ्याच्या मागे असल्याचे म्हटले जात आहे. तो लंडनहून आज बांगलादेशला पोहोचत आहे.
जमात-ए-इस्लामी, बी. एन. पी. किंवा ईशान्येकडील बंडखोर नेत्यांसारख्या भारतविरोधी गटांवर शेख हसीना यांनी कठोर कारवाई केली होती, त्यापैकी काहींना भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. हे लक्षात घेतले तर पुढच्या काळात आणखी काही घडू शकते किंवा सूड उगवण्याची मागणी होऊ शकते.
त्या दृष्टीने, ढाका येथील उच्चायुक्तालय आणि चटगांव, खुलना, राजशाही आणि सिल्हेटमधील वाणिज्य दूतावासातील सर्व अनावश्यक कर्मचाऱ्यांना घरी बोलावून घेण्याचा भारताचा निर्णय विवेकपूर्ण होता. कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिथे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.
नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या घोषणेबरोबरच परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी विद्यार्थी नेते, राजकीय पक्ष आणि लष्कर वेगाने पावले उचलत आहेत. शेख हसीना यांना भारताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल युनूस यांनी टीका केली आहे, इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या या टिप्पण्यांपैकी काही उदाहरणादाखल घ्या.
“जेव्हा भारत म्हणतो की हे अंतर्गत प्रकरण आहे, तेव्हा मला दुःख होते. भावाच्या घरात आग लागली असेल तर ती अंतर्गत बाब आहे असे मी कसे म्हणू शकतो.”
“जर बांगलादेशात काही घडत असेल. सरकारी गोळ्यांनी तरुण मारले जात असतील, जर कायदा आणि सुव्यवस्था नाहीशी होत असेल… तर ते बांगलादेशच्या सीमेच्या आत आटोक्यात येणार नाही, ते शेजाऱ्यांपर्यंत पोहोचेलच.”
यापैकी कोणतेही वक्तव्य भारतविरोधी मानले जाऊ शकत नाही, युनूस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी भारताला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र येत्या काही दिवसांत त्यांचा आवाज महत्त्वाचा ठरेल का? आगामी काही महिन्यांत ढाका येथे कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत येईल, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
परंतु युनुस यांना अमेरिकेत महत्त्वाचे स्थान आहे आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ समुदायाशीदेखील त्यांचे गहिरे संबंध आहेत. त्यामुळे ढाकामधील कोणत्याही नवीन सरकारसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण बनू शकते.
परंतु युनुस यांना अमेरिकेत महत्त्वाचे स्थान आहे आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ समुदायाशीदेखील त्यांचे गहिरे संबंध आहेत. त्यामुळे ढाकामधील कोणत्याही नवीन सरकारसाठी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण बनू शकते.
अर्थात 15 वर्षांच्या भारत-समर्थक सरकारनंतर बांगलादेशमधील हवा बदलणे स्वाभाविक गोष्ट आहे. भारताने शेख हसीना यांना कधी हुकूमशाही कमी करण्याचा, निवडणुकीत घोटाळा न करण्याचा सल्ला दिला होता का? याबद्दल स्पष्ट माहिती नसली जरी सामान्यपणे तसे झाले असावे असे म्हणता येईल.
परंतु एका स्रोताने स्ट्रॅटन्यूजग्लोबलला सांगितल्याप्रमाणे, हसीना आपल्या मतांवर ठाम होत्या आणि एका मर्यादेपलीकडे, कोणतेही बाहेरचे सरकार दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांचे अंतर्गत प्रश्न कसे हाताळायचे हे सांगू शकत नाहीत. त्यामुळे असे दिसते की, हसीना यांची चिनी लोकांशी जवळीक वाढली असली किंवा मुस्लिम कट्टरपंथीयांनी हिंदू मंदिरांची तोडफोड केली, अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले केले तरी भारताने परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करून घेतला होता.
त्या बदल्यात, भारताच्या ईशान्येकडील भागात सापेक्ष शांतता होती, पायाभूत सुविधा आणि संपर्क प्रकल्प पुढे गेले तसेच सीमावर्ती भागातील लोकांमधील संबंधही पुढे गेले.
जेव्हा हसीना यांच्या विरोधात आंदोलक रस्यांवर उतरले तेव्हा भारताने हसीना यांना निघून जाण्याचा सल्ला दिला का? सूत्रांचे म्हणण्यानुसार हो आणि हा सल्ला अनेक वेळा परत परत दिला गेला असावा. मात्र त्यांच्या मुलाने त्यांना देश सोडून जाण्यास सांगितले तेव्हाच त्यांनी पुढील सूत्रे हलली. त्यांचे प्रस्थान भारताने अनेक वर्षांपूर्वी तयार केलेल्या प्रोटोकॉलवर आधारित होते, असे सूत्रांनी सांगितले.
जेव्हा हसीना यांच्या विरोधात आंदोलक रस्यांवर उतरले तेव्हा भारताने हसीना यांना निघून जाण्याचा सल्ला दिला का? सूत्रांचे म्हणण्यानुसार हो आणि हा सल्ला अनेक वेळा परत परत दिला गेला असावा. मात्र त्यांच्या मुलाने त्यांना देश सोडून जाण्यास सांगितले तेव्हाच त्यांनी पुढील सूत्रे हलली. त्यांचे प्रस्थान भारताने अनेक वर्षांपूर्वी तयार केलेल्या प्रोटोकॉलवर आधारित होते, असे सूत्रांनी सांगितले.
भारताने ढाका येथे एक महत्त्वाचा मित्र गमावला आहे, परंतु गोष्टी येथेच संपत नाहीत. तेथे कोणतेही राजकीय स्वरूप आकाराला येत असले तरी, भारत अगदी शेजारी आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आशा आहे की, बीएनपी बरोबरचे जुने नातेसंबंध भारताकडून पुनरुज्जीवित केले जातील अशी आशा आहे.
बांगलादेशातील आपल्या नेटवर्कचा पाकिस्तान वापर करेल आणि चीनला भारताविरुद्ध भडकवण्यास मदत करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. याआधी त्यांनी नेपाळ
आणि मालदीवमध्ये असेच केले आहे. मात्र आपण आपल्या कार्यपद्धतीवर ठाम आहोत असे बघायला मिळते.
हसीना यांचे जाणे हा अमेरिकेच्या काही दुष्ट कारस्थानांचा भाग असू शकतो का? ऐकीव माहितीनुसार जेव्हा चीनबरोबर त्यांची जवळीक वाढली तेव्हा अमेरिकेला ती फारशी आवडली नव्हती. त्यामुळे हसीना यांना हटवण्यासाठी ते संगनमत करतील का? हे सांगणे कठीण आहे. अर्थात रस्त्यावर झालेल्या निदर्शनांना स्वतःचा एक संदर्भ होता, जो हसीना यांनी चुकीच्या पद्धतीने समजून घेतला आणि चुकीच्या पद्धतीने हाताळला, यात शंका नाही.
ज्यांना हसीना यांच्या जाण्यात अमेरिकेचा हात असल्याचा संशय आहे, ते अफगाणिस्तानकडे बोट दाखवतात, ज्याचा शेवटही असाच झाला. अर्थात अलीकडे घडलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत तालिबानसोबत चांगले संबंध ठेवून तिथे काम करत असल्याचे दिसते. किंवा अगदी मालदीवमध्ये, जेथे राष्ट्राध्यक्ष मुइ्इझू, काही महिने चीनशी जवळीक साधून आगीत होरपळल्यासारखा अनुभव घेतल्यानंतर आता भारतासोबत परत एकदा संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सूर्या गंगाधरन