अनेक युद्धांमध्ये उपयोगात येणाऱ्या पोलादी तोफांप्रमाणेच इराणी गुप्तहेरांकडे इस्लामिक स्टेटचे शक्तिशाली साधन म्हणून पाहिले जाते, ज्यांच्या कामाच्या व्याप्तीला कोणत्याही सीमांचे बंधन उपयोगी पडत नाही. पण भाड्याने घेतलेला पाकिस्तानी हल्लेखोर असिफ मर्चंटचा वापर करून अमेरिकन राजकारणी किंवा नेत्यांची हत्या करण्याच्या कटात इराणचा सहभाग होता का?
मर्चंटने “इराणबद्दल वाटणाऱ्या आपलेपणाचे संकेत दिले आहेत,” कारण तो अनेकदा तेथे प्रवास करत असे. इराण आणि पाकिस्तानमध्ये त्याची पत्नी आणि मुले होती.
मात्र त्याच्याविरुद्ध याआधी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी वर्तनाची नोंद नाही. त्यामुळे ज्याने मर्चंटला कामगिरी सोपवली त्याने मर्चंटवर कधीही लक्ष दिले जाणार नाही हा मुद्दा लक्षात घेतला होता. कोणीतरी पोलिसांना माहिती दिली की मर्चंटने त्याला माहिती चोरण्यास, निदर्शने आयोजित करण्यास आणि हत्या करण्यास सांगितले होते.
सखोल चौकशीअंती मर्चंटचा पाकिस्तान – अमेरिकेदरम्यान झालेला प्रवास किंवा इराणचे केलेले दौरे यांचे तपशील उघड होतीलच.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) केलेल्या स्टिंग ऑपरेशननुसार मर्चंटला असा विश्वास होता की त्याने ज्या लोकांशी समन्वय साधला होता ते एका उत्तम संरक्षण असणाऱ्या उच्चस्तरीय अधिकाऱ्याची हत्या करण्याची त्याची योजना सहजतेने पार पाडण्यासाठी मदत करतील.
त्यांचे लक्ष्य डोनाल्ड ट्रम्प होते का? एफबीआयने अद्याप याबाबत खुलासा केला नसला तरी ट्रम्पच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने पॉलिटिको मासिकाने म्हटले आहे की मर्चंटवरील आरोप न्यायालयात उघड होण्यापूर्वी एफबीआयने ट्रम्प यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना ‘इशारा देण्याचे कर्तव्य’ केले होते.
मर्चंटकडे सांकेतिक शब्द होते जे त्याने गुप्त एजंट्ससोबत शेअर केलेः ‘फ्लीस जॅकेट’ हा हत्येचा सांकेतिक शब्द होता; ‘फ्लॅनेल शर्ट’ म्हणजे चोरी; ‘टी-शर्ट’ म्हणजे निषेध.
न्यायालयाच्या आदेशानुसार मर्चंटला अद्याप जामीन मिळालेला नाही. मात्र अलीकडेच झालेल्या ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे महाधिवक्त्यांनी (ॲटर्नी जनरल) सांगितले.
सूर्या गंगाधरन