गाझा फ्लोटिलाचा इस्रायली नाकाबंदीशी सामना, अन्य 30 बोटी गाझाकडे रवाना

0

गाझामध्ये मदत पोहचवण्यासाठी रवाना झालेल्या गाझा फ्लोटिलातील 13 बोटींना आणि परदेशी कार्यकर्त्यांना, इस्रायली सैन्याने अडवले असून, अन्य 30 बोटी सध्या युद्धग्रस्त पॅलेस्टिनी एनक्लेव्हकच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती, फ्लोटिला आयोकांनी गुरूवारी दिली.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने पडताळणी केलेल्या इस्रायली परराष्ट्र मंत्राल्याच्या व्हिडिओमध्ये, फ्लोटिलातील मुख्य प्रवाशांपैकी एक आहेत- स्वीडिश हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग, ज्या डेकवर बसल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला अन्य कार्यकर्ते देखील आहेत.

ग्रेटा आणि त्यांचे मित्र सुरक्षित

“हमास-सुमूद फ्लिटमधील काही नौकांना अडवण्यात आले असून, त्यातील प्रवाशांना सुरक्षितपणे इस्रायली बंदरावर हलवण्यात येत आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने X पोस्टद्वारे सांगितले. सोबतच, ग्रेटा आणि त्यांचे मित्र सुरक्षित असल्याची पुष्टीही त्यांनी केली आहे. ’

अन्न आणि औषधे घेऊन, गाझाच्या दिशेने निघालेल्या ग्लोबल सुमूद फ्लिटमध्ये, सुमारे 500 खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच वकीलांचा समावेश आहे.

फ्लिटने याबाबत टेलिग्रावर अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये काही प्रवासी स्वत:चे पासपोर्ट दाखवत सांगत आहेत की: ‘त्यांना जबरदस्तीने अडवण्यात आले असून, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना इस्रायली तळांवर नेण्यात आले. त्यांचा उद्देश हा शांततापूर्ण आणि मानवतावादी असल्याला, त्यांनी वारंवार पुनरुच्चार देखील केला आहे.’

विरोधाचे हाय-प्रोफाईल प्रतीक

गाझावर लादण्यात आलेल्या इस्रायली नाकाबंदीविरोधातील, हे सर्वात जास्त लक्षवेधी आंदोलन ठरले आहे. फ्लिटच्या भूमध्य सागरातील प्रवासाने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे, कारण तुर्कस्तान, स्पेन आणि इटलीसह अन्य देशांनीही, आपल्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करता यावी म्हणून, इस्रायलने वारंवार रोख लावूनही, नौका किंवा ड्रोन्सच्या साहाय्याने मदत पाठवली होती. 

दहशत निर्माण करणारे कृत्य

तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने, इस्रायल्या या कारवाईला ‘दहशत निर्माण करणारे कृत्य’ असे संबोधत, त्याचा निषेध केला आणि ही कृती निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घालणारी असल्याचेही म्हटले.

बुधवारी, फ्लिटमधील 2 कोलंबियन नागरिकांना झालेल्या अटकेनंतर, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनी इस्रायलच्या संपूर्ण राजनैतिक प्रतिनिधीमंडळाला देशातून हुसकावून लावण्याचा आदेश दिला. मागील वर्षापासून एकही इस्रायली राजदूत कोलंबियामध्ये नैतान नाही.

पेत्रो यांनी, ही अटक म्हणजे पंतप्रधान बेंजामि नेतान्याहू यांच्या दृष्टीने एक ‘नवा आंतरराष्ट्रीय गुन्हा’ असू शकतो असे म्हणत, तातडीने नागरिकांच्या सुटकेची मागणी केली. तसेच त्यांनी इस्रायलसोबतचा कोलंबियाचा मुक्त व्यापार करार (FTA) देखील तात्काळ संपुष्टात आणला.

गुरुवारी, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी, इस्रायलद्वारे फ्लिटला अडवून धरण्याच्या घटनेचा निषेध केला आणि आठ मलेशियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले.

“अशाप्रकारच्या मानवतावादी मोहिमेत अडथळा निर्माण करुन, इस्रायलने केवळ पॅलेस्टिनी जनतेच्या अधिकारांचाच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या उदारमतवादी भूमिकेचा अवमान केला आहे,” असे मत मुस्लिम बहुल देश असलेल्या मलेशियाच्या पंतप्रधानांनी एका निवेदनाद्वारे व्यक्त केले.

इस्रायलच्या या कारवाईमुळे, इटली आणि कोलंबियामध्ये आंदोलने देखील झाली. शुक्रवारी, इटलीतील काही संघटनांनी, आंतरराष्ट्रीय मदत फ्लिटला पाठिंबा दर्शवत, संपाची हाक दिली.

इस्रायली नौदलाने याआधीच फ्लिटला चेतावणी दिली होती की, ते युद्धग्रस्त क्षेत्राच्या दिशेने जात आहेत आणि कायदेशीर नाकाबंदींचे उल्लंघन करत आहेत. त्यांनी सुरक्षित आणि कायदेशीर मार्गांनी गाझापर्यंत मदत पोहचवण्याचा पर्याय देण्याची तयारी दर्शवली होती.

30 नौकांचा अजूनही गाझाच्या दिशेने

सुमारे दोन वर्षांपासून चाललेल्या संघर्षामुळे गाझाचा बराचसा भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे, त्यामुळे गाझाच्या दिशेने मदत घेऊन जाणाऱ्या फ्लिटचा हेतू स्पष्ट आहे.

बुधवारी फ्लिटविरुद्ध इस्रायलने केलेल्या कारवाईला, फ्लिट आयोजकांनी “वॉर क्राईम” संबोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, फ्लिटला रोखण्यासाठी इस्रायली लष्कराने आक्रमक पद्धती वापरल्या, ज्यामध्ये पाण्याच्या फवाऱ्यांचा समावेश करण्यात आला, मात्र सुदैवाने कोणालीही जखम झालेली नाही.

“मदत घेऊन जाणाऱ्या अनेक बोटी, आंतरराष्ट्रीय समुद्रात इस्रायली सैन्याकडून बेकायदेशीरपणे अडवण्यात आल्या आणि त्यावर चढाई करण्यात आली,” असे आयोजकांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

त्यावेळी या नौका, युद्धग्रस्त गाझापासून सुमारे 70 नॉटिकल मैलांवर होत्या. आयोजकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे संप्रेषण अडवण्यात आले आणि काही बोटींवरील थेट प्रसारणही बंद करण्यात आले.

फ्लिटच्या ट्रॅकिंग डेटानुसार, गुरुवार सकाळपर्यंत एकूण 13 बोटी नाकाबंदीमध्ये अडवण्यात आल्या. “अशा अडथळ्यांवर फ्लिट मात करत राहील,” असे आयोजकांनी ठामपणे सांगितले.

गुरुवारी सकाळी टेलिग्रामवर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, “हा प्रकार घडन असताना, अन्य 30 बोटी गाझाच्या दिशेने प्रवास करत होत्या आणि त्या गंतव्यस्थानापासून 46 नॉटिकल मैलांवर होत्या.”

फ्लिटला जर अडवले गेले नसते, तर गुरुवार सकाळपर्यंत गाझामध्ये पोहोचण्याचा त्यांचा उद्देश होता.

‘उद्दिष्ट मानवतावादी नाही, तर उकसवणारे आहे’

दुसरीकडे, इस्रायली अधिकाऱ्यांनी या मोहिमेला सातत्याने एक प्रचाराचा भाग ठरवले आहे. “मदत थेट हस्तांतर करण्यास नकार देणे, यातून हे स्पष्ट होते की यांचा उद्देश मानवतावादी नसून उकसवणारा आहे,” असे इटलीमधील इस्रायली राजदूत जोनाथन पेलड यांनी X पोस्टमध्ये म्हटले.

इस्रायलने 2007 पासून, गाझावर नौदल नाकाबंदी लागू केली आहे, जेव्हापासून हमासने या किनारपट्टी भागावर ताबा मिळवला आहे. त्यानंतरही अनेकदा कार्यकर्त्यांनी समुद्रामार्गे मदत पोहोचवण्याचे विविध प्रयत्न केले आहेत.

2010 मध्ये, इस्रायल सैनिकांनी एकूण 6 नौकांवर चढाई केली होती, ज्यामध्ये 50 देशांतील 700 समर्थक होते आणि त्यातील 9 कार्यकर्ते चकमकीत ठार झाले होते.

याच वर्षी जूनमध्ये, एका लहान नौकेत स्वार होऊन गाझाच्या दिशेने जाणाऱ्या ग्रेटा थनबर्ग आणि इतर 11 सदस्यांना, इस्रायल नौदलाने ताब्यात घेतले होते. ही मोहिम ‘फ्रीडम फ्लिटीला कोअ‍ॅलिशन’ नावाच्या एका गटाने आयोजित केली होती.

इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी, गाझावर आपला लष्करी हल्ला सुरू केला, जेव्हा हमासने इस्रायलवर हल्ला करून सुमारे 1,200 लोकांना ठार केले होते आणि 251 लोकांना गाझामध्ये बंदी बनवले होते, असे इस्रायलच्या आकडेवारीतून समोर आले आहे. गाझा आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यानंतर झालेल्या इस्रायली कारवायांमध्ये आतापर्यंत 65,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.’

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleडिजिटल सार्वभौमत्वाचे चिनी धडे भारत गिरवणार का?
Next articleRajnath Singh Performs Shastra Puja in Bhuj, Warns Pakistan Against Sir Creek Misadventure

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here