एअर इंडिया क्रॅशची चौकशी सुरु आहे, निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल: सीईओ

0

गेल्या महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या, एअर इंडिया विमानाच्या भीषण दुर्घटनेनंतर तपासकर्त्यांनी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. याप्रकरणी एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन, यांनी सोमवारी एका अंतर्गत निवेदनात सांगितले की, “या अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे, त्यामुळे कोणतेही अकाली निष्कर्ष काढण्याविरुद्ध इशारा देण्यात आला आहे.”

रॉयटर्सने पुनरावलोकन केलेला हा मेमो, बोईंग ड्रीमलायनरच्या अपघातापूर्वी कॉकपिटमध्ये गोंधळाचे चित्रण केल्यानंतर आला आहे, ज्यामध्ये 260 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात म्हटले आहे की विमानाच्या इंजिनचे इंधन कटऑफ स्विच जवळजवळ एकाच वेळी उलटले आणि इंजिनमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली.

विल्सन म्हणाले की: “प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होणे हा तपासातील एक टप्पा होता, जिथून आपण आणि जगाने, या घटनेविषयी अधिक तपशील मिळवायला सुरुवात केली. या अहवालाने काही गोष्टी स्पष्ट केल्या, पण त्याचबरोबर नवीन प्रश्नही उपस्थित केले.”

“या प्राथमिक अहवालात कोणतेही कारण किंवा शिफारसी नमूद केलेल्या नाहीत, त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की, कृपया घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नयेत. अजून बराच तपास बाकी आहे.”

AAIB चा प्राथमिक अहवाल

भारताच्या विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाने, टेकऑफनंतर लगेचच जोर गमावायला सुरुवात केली आणि खाली झुकू लागले.

प्राथमिक अहवालात सांगितले की, “विमानात कोणतीही यांत्रिक किंवा देखभाल-संबंधी त्रुटी नव्हती आणि सर्व आवश्यक देखभाल वेळेत केली गेली होती.”

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात, बोईंग किंवा GE (ज्यांनी इंजिन पुरवले) या कंपन्यांकडून तत्काळ कोणतीही कारवाई सुचवलेली नाही.

AAIB ही संस्था, भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असून, या दुर्घटनेचा तपास पुढे नेत आहे. या दुर्घटनेत विमानातील 243 पैकी 242 जणांचा मृत्यू झाला, तसेच जमिनीवरील 19 जण मरण पावले.

या दुर्घटनेनंतर एअर इंडियावर अनेक स्तरांतून प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत.

4 जुलै रोजी, युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी (EASA) ने जाहीर केले की: ते एअर इंडिया एक्सप्रेस या कमी किमतीच्या युनिटची चौकशी करणार आहेत. रॉयटर्सच्या अहवालानुसार, एअर इंडिया एक्सप्रेसने Airbus A320 विमानात काही आवश्यक इंजिन वेळेवर बदलले नव्हते आणि रिकॉर्ड्समध्ये खोटा दाखला दिला होता.

ALPA India, जी आंतरराष्ट्रीय पायलट संघटनेच्या (IFALPA) भारतातील शाखेचे प्रतिनिधित्व करते, तिने अहमदाबाद दुर्घटनेमध्ये पायलटची त्रुटी असल्याचा निष्कर्ष फेटाळला असून, “निष्पक्ष आणि तथ्यावर आधारित चौकशी” होण्याची मागणी केली आहे.

“पायलट संघटनेला आता या तपास प्रक्रियेत कमीतकमी निरीक्षक म्हणून तरी सहभागी करून घेतले पाहिजे,” असे ALPA India चे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी रॉयटर्सला सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleदलाई लामांच्या उत्तराधिकाराचा मुद्दा भारतासोबतच्या संबंधांमध्ये ‘काटा’– चीन
Next articleइम्रान खान यांच्या PTI आंदोलनादरम्यान, पाक नवे निमलष्करी दल स्थापणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here