लष्करप्रमुखांची मणिपूरला भेट; सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीची पाहणी

0

भारतीय लष्करप्रमुख (COAS) जनरल उपेंद्र द्विवेदी, यांनी मंगळवारी मणिपूरला भेट दिली. राज्यातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणे आणि भारतीय लष्कर तसेच आसाम रायफल्सच्या तुकड्यांची ऑपरेशनल तयारी तपासणे, हा त्यांच्या एक दिवसीय दौऱ्याचा उद्देश होता.

भेटीदरम्यान लष्करप्रमुखांना, मणिपूरमधील सध्याची ग्राउंड रिअॅलिटी आणि शांती व सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपक्रमांविषयी, सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी सीमेवर तैनात जवानांशी संवाद साधला आणि कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेली कुशलता, चिकाटी आणि समर्पणाचे कौतुक केले.

द्विवेदी यांनी, मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांचीही भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या बैठकीत सुरक्षा आणि विकासाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा झाली. या संवादातून नागरी प्रशासन आणि सुरक्षा दलांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, जे राज्यातील गुंतागुंतीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक आहे.

जनरल द्विवेदी, इम्फाळमधील खुमान लंपक स्टेडियममध्ये होणाऱ्या 134व्या दुरंद कपच्या उद्घाटन सामन्याला देखील उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांनंतर या स्पर्धेचे शहरात पुनरागमन होत आहे आणि त्यानिमित्ताने पारंपरिक सांस्कृतिक सादरीकरणे व लष्करी प्रदर्शनांसह एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे, जो मणिपूरच्या समृद्ध वारशाचा आणि भारतीय सशस्त्र दलांच्या परंपरेचा गौरव करतो.

लष्करप्रमुखांची ही भेट मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या, नागरी–लष्करी सहकार्य मजबूत करण्याच्या आणि युवकांना खेळ व संस्कृतीच्या माध्यमातून जोडण्याच्या भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.

या भेटीद्वारे, भारतीय लष्कराचा संघर्षग्रस्त भागात स्थिरता पुनर्स्थापित करण्याचा आणि विकास उपक्रमांना पाठबळ देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित झाला आहे, असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleArmy Chief Visits Manipur, Reviews Security, Operational Readiness
Next articleBharat Forge Unveils Advanced Aerospace Ring Mill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here