मेघायन -24 चर्चासत्राचे आयोजन

0
Climate Change Seminar

जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून 28 मार्च 2024 रोजी दक्षिण नौदल कमांड येथे स्कूल ऑफ नेव्हल ओशनोलॉजी अँड मेटियोरोलॉजी (एसएनओएम) आणि इंडियन नेव्हल मेटियोरोलॉजिकल ॲनालिसिस सेंटर (आयएनएमएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेघायन-24’ या एमईटीओसी (हवामान आणि समुद्रशास्त्रीय विषयक) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यंदाच्या चर्चासत्राची संकल्पना जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) 2024 साठी मांडलेल्या ‘At the Frontline of Climate Action’ या संकल्पनेशी सुसंगत होती.

नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी आभासी पद्धतीने उद्घाटनपर भाषण केले आणि हवामान बदलाचा सामना करण्याच्या महत्त्वावर तसेच डब्ल्यूएमओच्या आदेशानुसार क्लायमेट-स्मार्ट समाजासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
ते म्हणाले की, भारतीय नौदल शाश्वत धोरणे स्वीकारण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षा धोरणात हवामान बदलाच्या एकात्मतेचा विचार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

डॉ. टीव्हीएस उदय भास्कर आणि डॉ. राघवेंद्र अषित या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावर धोरण निर्मितीला मदत करणे आणि ते वाढविणे यासाठी वैज्ञानिक संस्थांनी स्वीकारलेल्या नवीन तंत्रांवर आणि हवामान डेटा विश्लेषणावर यावेळी चर्चा करण्यात आली.

हवामान आणि हवामान बदलाचा नौदलाच्या कामावर होणारा परिणाम या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभ्यासक आणि तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी भारतीय नौदल आणि भारतीय वैज्ञानिक संस्था परिचालनविषयक समस्यांसाठी एमईटीओसीकडून मिळालेल्या माहितीचा कशाप्रकारे वापर केला जातो या विषयी आपले मत मांडले.

या चर्चासत्रामध्ये, INDRA (इंडियन नेव्हल डायनॅमिक रिसोर्स फॉर वेदर ॲनालिसिस) नावाचे नवीन भारतीय ॲप लाँच करण्यात आले. हे ॲप BISAG (भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉर्मेटिक्स) या भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या वैज्ञानिक संस्थेने विकसित केले आहे. तंत्रज्ञान विकास आणि व्यवस्थापन, संशोधन, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्रात क्षमता निर्माण करण्यावर काम करणे हे तिचे मुख्य उद्दिष्ट आहे.

इंद्रचा वापर भारतीय नौदलाच्या, नौदल समुद्रशास्त्र आणि हवामानशास्त्र संचालनालयाद्वारे केला जाईल. योग्य आणि जलद निर्णय घेता यावा यासाठी हवामानाशी संबंधित माहिती तसेच अंदाज प्रसारित करण्याचे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleAt the Frontline of Climate Action
Next articleभारतीय नौदलाने केली अपहृत इराणी जहाजातून पाकिस्तानी क्रूची सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here