आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी ATAGS करार अपेक्षितः लष्करप्रमुख

0
द्विवेदी
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पत्रकार परिषदेला संबोधित करताना

भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाला लक्षणीय चालना देताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी जाहीर केले की, लष्कर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची पुनर्रचना आणि वापर करून आपल्या लढाऊ क्षमतांमध्ये बदल करत आहे. उल्लेखनीय खरेदींपैकी, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 8 हजार कोटी रुपये किंमतीच्या 307 Advanced Towed Artillery Gun Systems  (ATAGS)  कराराला अंतिम रूप दिले जाणे अपेक्षित आहे.वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना जनरल द्विवेदी यांनी अनेक अधिक मूल्याच्या अधिग्रहण प्रकल्पांची रूपरेषा मांडली. स्वदेशी पिनाका रॉकेट प्रणालीसाठी range-enhancing अशा 10 हजार 500 कोटी रुपयांचा दारूगोळा खरेदी करण्याची लष्कराची योजना आहे. यात high-explosive pre-fragmented दारूगोळ्यासाठी 6 हजार कोटी रुपये आणि area-denial munitionsसाठी 4 हजार 500 कोटी रुपये समाविष्ट आहेत.

झोरावर रणगाडे आणि आधुनिकीकरण

लष्कर दिनाच्या निमित्ताने आयोजित या वार्षिक पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, लष्करप्रमुखांनी चाचणी सुरू असलेल्या 354 झोरावर या वजनाने हलके रणगाडे सहभागी करून घेण्याच्या लष्कराच्या योजनांबद्दल माध्यमांना ताजी माहिती दिली. 17 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मेक-1 उपक्रमांतर्गत 295 रणगाडे आणि डीआरडीओ च्या सहकार्याने विकसित केलेल्या 59 रणगाड्यांचा समावेश आहे.

“सर्वोच्च-उंचीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि झोरावर लाइट रणगाडे आता चाचणीतील अभिप्रायाच्या आधारे सुधारणांसाठी चेन्नईला परत येत आहे. सुधारणा अंमलात आल्यानंतर पुढील चाचण्या घेण्यात येतील,” असे जनरल द्विवेदी यांनी सांगितले.

पारंपरिक टी-72 रणगाड्यांच्या मोठ्या प्रमाणातील upgradesना विलंब होत असल्याबद्दल लष्करप्रमुख म्हणाले की, संरक्षण पीएसयू आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडच्या (AVNL) बाजूने यापूर्वी त्रुटी होत्या, परंतु आता सरकारी कंपनीने आपली क्षमता 120 रणगाड्यांवरून 150 पर्यंत वाढवली आहे आणि ती दर वर्षी 200 रणगाड्यांपर्यंत जाईल.

आधुनिकीकरणासाठी निधीची कमतरता नाही

जनरल द्विवेदी यांनी संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा दिला आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या पैशाची कमतरता नाही या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. 2020 मध्ये चीनशी झालेल्या गलवान संघर्षानंतर मंजूर करण्यात आलेल्या आपत्कालीन खरेदी अधिकारांसह लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या प्राधान्यांची पूर्तता केली जात आहे.

मात्र, मनाली आणि लेहमधील अंतर 60 किलोमीटरने कमी करण्याच्या उद्देशाने 41 किलोमीटर लांबीचा शिंकू ला बोगदा बांधण्यासाठी राखून ठेवलेला निधी संरक्षण मंत्रालयाला परत करण्यात आल्याचे त्यांनी उघड केले.

एकात्मिक युद्ध गटांची (IBG)  पुनर्रचना आणि भवितव्य

आधुनिक युद्धाची आव्हाने अधोरेखित करताना जनरल द्विवेदी म्हणाले की, लष्करी कार्यक्षमता वाढविण्यासाठी लष्कर पुनर्रचना, माहिती मोहीम गट, लढाऊ पथके आणि मानवरहित पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील डोंगराळ भागांसाठी एकात्मिक युद्ध गट (आयबीजी) स्थापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. “आयबीजी हे आमच्या पुनर्रचनेच्या प्रयत्नांमधील  पहिले Special Purpose Vehicle आहे. मंजुरी मिळाल्यास अशाच प्रकारच्या उपक्रमांचा मार्ग मोकळा होईल. मात्र, 2025 पर्यंत अंतिम रूप न मिळाल्यास हा प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो,” असे ते म्हणाले.

लष्करप्रमुखांनी दिलेली ही अद्ययावत माहिती भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा अधोरेखित करते. स्वदेशी उत्पादन क्षमता वाढवताना सद्य परिस्थितीमधील युद्धाच्या आवश्यकतांशी जुळवून घेणे हे या दलाचे उद्दिष्ट आहे.

रवी शंकर 


Spread the love
Previous articleनाग मार्क 2 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Next articleGaza Ceasefire Deal: Breakthrough Very Possible In Doha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here