ऑस्ट्रेलिया: NSW जंगलातील आगीने नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता

0
NSW
वाढत्या तापमानामुळे न्यू साउथ वेल्समध्ये वणवे सुरू झाले आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतरित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समध्ये शनिवारी लागलेल्या आगीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील जंगले जळून खाक झाली. त्यामुळे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यातील हजारो रहिवाशांना सर्वात जास्त धोका असल्याचा इशारा देत अधिकाऱ्यांनी स्थलांतर करण्याचे आवाहन केले.

राज्याच्या मध्यवर्ती किनारपट्टी प्रदेशातील फेगन्स बे आणि वॉय वॉय क्षेत्रासाठी हा इशारा देण्यात आला होता, जिथे 3 लाख 50 हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे वास्तव्य असून ऑस्ट्रेलियाचे सर्वात मोठे शहर सिडनीच्या उत्तरेस सुमारे 45 किमी (30 मैल) अंतरावर आहे.

ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पने वृत्त दिले आहे की, या प्रदेशात झाडांना लागलेल्या आगीमुळे 16 घरे जळून खाक झाली आहेत.

“वॉय वॉयकडे कडून बाहेर जाणारा मार्ग मोकळा असेल तर आताच निघून जा,” असे राज्याच्या ग्रामीण अग्निशमन सेवेने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.

न्यू साउथ वेल्स (NSW) मध्ये शनिवारी उष्णतेच्या लाटेमुळे 42 अंश सेल्सिअस (108 अंश फॅरेनहाइट) तापमान नोंदवलेल्या या भागात आगीचा धोका वाढला आहे, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

NSW चे प्रीमियर क्रिस मिन्स यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद बोलावली आणि अग्निशमन दलाच्या जवानांसाठी हा एक अतिशय आव्हानात्मक तर घरे गमावलेल्या लोकांसाठी एक विनाशकारी दिवस असल्याचे वर्णन केले.

त्यांनी सांगितले की, RFS ने 300 वाहनांसह दीड हजारांहून अधिक अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत आणि सरकार त्यांचा “जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे”.

“अग्निशमन आणि बचाव कार्याबाबत RFS, NSW पोलिसांकडून मिळालेल्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी ही प्रत्येकाला दिलेली एक चेतावणी आहे.”

NSW RFS चे आयुक्त ट्रेंट कर्टिन म्हणाले की, वीज कोसळण्याच्या प्रकारांबरोबरच वाढत्या हवामान परिस्थितीवर रात्रभर लक्ष ठेवले जाईल.

“उद्या पहाटे 2 ते पहाटे 5 च्या दरम्यान वाऱ्यांची दिशा बदलेल अशी अपेक्षा आहे, मात्र त्याबद्दलही आम्हाला चिंता आहे,” असे ते म्हणाले.

“त्यामुळे अग्निशमन दलासाठी खूप आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल आणि आम्हाला त्या परिस्थितीचे निरीक्षण करावे लागेल.

“कृपया एकमेकांची काळजी घ्या आणि अधिकाऱ्यांच्या सल्ल्याचे पालन करा,” असे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

शनिवारी रात्री उशिरा राज्यात 50 हून अधिक झाडे जळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, ज्यामध्ये राज्यातील अप्पर हंटर भागातील आगीचा समावेश आहे, जी सर्वात जास्त मोठ्या आपत्कालीन रेटिंगवर होती. ज्यात जवळजवळ 10 हजार हेक्टर (25 हजार एकर) वरील झाडे जळून खाक झाली आहेत.

गेले अनेक हंगाम शांततेत गेल्यानंतर या  उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियात उच्च-जोखीम असलेल्या वणव्यांचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. 2019-2020 च्या “ब्लॅक समर” आगीमुळे तुर्कीएवढा परिसर नष्ट झाला होता तर 33 जणं मृत्युमुखी पडले.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleभारत-रशिया संरक्षण संबंध: खरेदीदार-विक्रेते ते संयुक्त विकासकांपर्यंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here