बांगलादेशमध्ये निवडणुकीची लगबग; लवकरच प्रचाराच्या तोफा धडाडणार

0
बांगलादेशमध्ये
गेल्यावर्षी जुलैच्या उठावादरम्यान बांगलादेशी महिला आंदोलन करत असातानाचा फोटो. सौजन्य: अनस्प्लॅश/तन्वीर खोंडोकर

बांगलादेशमध्ये निवडणूक प्रचाराचा धडाका आणि जल्लोष अद्याप सुरू झाला नसला, तरी बीएनपी (BNP) नेत्या खालिदा झिया यांच्यावर अंत्यसंस्कार पडले असून, सोमवारी शोककाळ अधिकृतरित्या संपणार असल्यामुळे, एका अत्यंत चुरशीच्या संघर्षाच्या तयारीची नांदी होणार आहे.

आगामी निवडणूक लढवण्यासाठी, अवामी लीगवर कागदोपत्री बंदी असल्याने बीएनपी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ ‘जमात-ए-इस्लामी’ दुसऱ्या क्रमांकावर असेल. दरम्यान, बीएनपी आणि जमात यांनी पूर्वीप्रमाणेच पुन्हा हातमिळवणी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

दुसरीकडे, ‘नॅशनल सिटीझन्स पार्टी’ (NCP) या तिसऱ्या दावेदाराने, जमातसोबत निवडणूक समझोता केल्यानंतर पक्षात फुटीची चिन्हे दिसत आहेत. ‘ढाका ट्रिब्यून’च्या म्हणण्यानुसार, “जमातसोबत झालेल्या कराराच्या निषेधार्थ अर्ध्या डझनाहून अधिक आघाडीच्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत किंवा पक्षाच्या उपक्रमांतून माघार घेतली आहे.”

एनसीपी (NCP) मध्ये अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यांनी शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. मात्र, खंडणीखोरी, धमकावणे आणि अशाच काही इतर कृत्यांमुळे या विद्यार्थ्यांनी जनतेमधील आपली प्रतिमा मलीन केल्याचे दिसून येत आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न आहे, तारिक रहमान यांच्याशी निगडीत. खालिदा झिया यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या “सहानुभूतीच्या लाटेवर” स्वार होऊन, ते आपल्या पक्षाला विजयाकडे नेऊ शकतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, आणि हे मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रेरित करण्याच्या क्षमतेवर, मधल्या स्तरावरील नेत्यांना आपल्याकडे वळवण्यावर आणि खालिदा यांच्या निधनानंतर असुरक्षित झालेल्या जुन्या गटाच्या चिंता दूर करण्यावर.

भारतासाठी, शेख हसीना यांचे अनपेक्षितपणे सत्तेतून बाहेर पडणे हा एक मोठा धक्का आहे, विशेषतः तारिक रहमान हे असे व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांच्यावर भारताचा फारसा विश्वास नाही. ‘स्ट्रॅटन्यूजग्लोबल’ला मिळालेल्या माहितीनुसार, तारिक यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध जुने आहेत आणि काही रिपोर्ट्सनुसार, त्यांनी हसीना यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कटही रचला असण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) चे जमातशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत आहेत, अशातच तारिक रहमान यांनी अलीकडेच ढाका येथे जमातचे नेते शफिकुर रहमान यांची भेट घेतली होती.

“आपण आपल्या प्रिय देशाच्या हितासाठी यापूर्वी एकत्र काम केले आहे आणि जर देवाची इच्छा असेल तर, आपण देशाच्या हितासाठी भविष्यातही एकत्र काम करत राहू,” असे तारिक यांनी म्हटल्याचे वृत्त आहे.

जमातच्या नेत्यानेही अशाच भावना व्यक्त केल्या: “येत्या पाच वर्षांतील राष्ट्रीय स्थैर्यासाठी आणि सुदृढ राजकीय वातावरण पुनर्संचयित करण्यासाठी, आपण एकत्रितपणे रचनात्मक पर्यायांचा विचार करू शकतो का, यावर आपण लक्ष दिले पाहिजे.”

या दोघांचे एकत्र येणे भारतासाठी दुहेरी संकट ठरू शकते. परंतु हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, गेल्यावर्षी एका भारतीय दूताने जमातच्या नेत्याची भेट घेतली होती. त्यामुळे भारताने त्या पक्षाशी संवादाचे दार खुले ठेवले आहेत.

तारिक यांनी जातीय आणि वांशिक सलोख्याचे देखील आवाहन केले असून; ख्रिश्चन, बौद्ध आणि हिंदू हे देखील बांगलादेशात राहतात, असे नमूद केले आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी परवाच त्यांची भेट घेऊन, त्यांच्या आईच्या निधनाबद्दल सांत्वन केले आणि पंतप्रधान मोदींचे पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केले. जरी या शिष्टाचाराच्या भेटी असल्या तरी, अशा संकेतांचे स्वतःचे राजनैतिक महत्त्व असते.

भारतातील अनेकांना अशी आशा आहे की, इतकी वर्षे परदेशात राहिल्यानंतर तारिक यांनी भारताबाबतचे आपले विचार बदलले असतील आणि 7 टक्क्यांहून अधिक दराने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेशी जोडून घेत, ते आपल्या लोकांच्या फायद्याला प्राधान्य देतील.

परंतु, हे सर्व नंतरचे विषय आहेत. आता सर्वांचे लक्ष 5 जानेवारीकडे लागले आहे, जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. यावेळी अनेक टिप्पण्या, अनेक विधाने केली जातील आणि भारतही या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असेल; आणि भारताला अशी राहील की, जर तारिक यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्था विजयी झाली, तर भूतकाळातील कटू आठवणींचे दरवाजे कायमचे बंद होऊ शकतील.

मूळ लेखक- सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleहिंसक दंगलीनंतर ट्रम्प यांची इराणला धमकी
Next articleट्रम्प आणि तेहरान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धाचे सावट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here