बांगलादेश निवडणुकांपूर्वी नॅशनल सिटिझन पक्षाचा (NCP) जनमतासाठी संघर्ष

0
NCP

बांगलादेशातील हजारो लोकांनी तेथील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत, या वर्षी शेख हसीना यांना सत्तेतून हटवले आणि नॅशनल सिटिझन पार्टी (NCP) स्थापन केली, परंतु आता परिस्थीती काहीशी वेगळी आहे. फेब्रुवारीतील निवडणुकांपूर्वी, आपल्या प्रस्थापित आणि व्यापक नेटवर्क असलेल्या प्रतिस्पर्ध्यांना तोंड देणाऱ्या या पक्षाला, जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे.

“आमचे संघटन कमकुवत आहे, कारण ते उभारण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळालेला नाही,” असे NCP चे प्रमुख नाहिद इस्लाम म्हणाले. नाहिद इस्लाम, हे गेल्यावर्षी झालेल्या जीवघेण्या सरकारविरोधी आंदोलनांलनात अग्रस्थानी होते आणि त्यांनी नोबेल विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू प्रशासनात थोड्या कालावधीसाठी काम केले होते.

जनमत चाचण्यांमध्ये पक्ष तिसऱ्या स्थानावर

मतदान सर्वेक्षणातून दिसून येते की, सर्व 300 जागांवर निवडणूक लढवण्याचे उद्दिष्ट असलेल्या NCP ला, जनतेचे केवळ 6% समर्थन मिळाले, ज्यामुळे तो तिसऱ्या क्रमांकावर आला. हा पक्ष माजी पंतप्रधान खलिदा झिया यांच्या ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) पेक्षा खूप मागे आहे, जो 30% समर्थनासह आघाडीवर आहे.

अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट’ नावाच्या एका नॉन-प्रॉफिट संस्थेद्वारे, डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणातून हे समोर आले आहे, कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’ या गटालाही NCP पेक्षा चांगली कामगिरी करेल आणि 30% समर्थनासह दुसऱ्या क्रमांकावर राहील.

पक्षामधील वाढत्या निराशेचे आणखी एक चिन्ह म्हणजे, सप्टेंबरमध्ये ढाका विद्यापीठात (ज्या ठिकाणी झालेल्या तीव्र आंदोलनामुळे हसिना यांना नवी दिल्लीला पळून जावे लागले होते) झालेल्या विद्यार्थी संघटना निवडणुकीतही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

हसीना शेख यांचा ‘अवामी लीग’ पक्ष, ज्याला निवडणूक लढवण्यास अजूनही बंदी आहे, त्यांनी असा इशारा दिला आहे की: ‘ही बंदी न उठवल्यास प्रदेशात असंतोष आणि अस्थिरता निर्माण होऊ शकते’; ज्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वस्त्र निर्यातदार असलेल्या बांगलादेशच्या वस्त्रोद्योगाला धोका निर्माण होऊ शकतो.

राजकीय आघाडीसाठी चर्चा

संघटनेची मर्यादित रचना, अपुरा निधी तसेच महिला आणि अल्पसंख्याकांचे हक्क यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील अस्पष्ट भूमिका यामुळे अडथळे निर्माण झालेल्या NCP ने, BNP आणि जमात-ए-इस्लामीसह इतर पक्षांशी चर्चा सुरू केली आहे, असे नेत्यांनी सांगितले.

इस्लामी गटाने सांगितले की, “पैसा ही आमची दुसरी मोठी अडचण आहे, कारण पक्षातील पूर्णवेळ काम करणारे सदस्य त्यांच्या वेतनासाठी, लहान लहान देणग्या आणि क्राउड-फंडिंगवर अवलंबून राहून, निवडणूक प्रचार करत आहेत.”

काही तरुण अजूनही या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत, कारण त्यांना वाटते की पैसा, बळाचा वापर आणि घराणेशाहीच्या ताकदीवर आधारित राजकीय वातावरणात, हा पक्ष अधिक समतावादी संस्कृतीसाठी प्रयत्न करत आहे. 

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleनौदल दिन: सादरीकरणाने भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षांचा विस्तार अधोरेखित
Next articleLockheed Martin and Tata Celebrate 250th C-130J Tail Assembly Delivery

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here