तैवान वादाच्या पार्श्वभूमीवर बीजिंगने जपानच्या माजी लष्करी नेत्याला केले लक्ष्य

0
बीजिंगने

जपानच्या पंतप्रधानांनी तैवानबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर बीजिंगने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर, चीनने जपानच्या ‘सेल्फ-डिफेन्स फोर्सेस’चे माजी चीफ ऑफ स्टाफ शिगेरू इवासाकी यांच्या विरोधात कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव अधिक वाढला आहे.

‘वन-चायना’ धोरणाच्या उल्लंघनाचा आरोप

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, इवासाकी यांनी ‘वन-चायना’ धोरणाचे आणि चीन–जपान यांच्यातील राजकीय समजूतीचे उल्लंघन केले आहे. तैवानशी संबंधित त्यांच्या टिप्पण्या आणि कृतींद्वारे त्यांनी ‘चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये गंभीरपणे हस्तक्षेप’ केल्याचा आरोप मंत्रालयाने केला आहे.

या निर्बंधांचा एक भाग म्हणून, चीनने इवासाकी यांच्यावर व्हिसा निर्बंध लादले आहेत, तसेच चीनच्या अधिकारक्षेत्रातील त्यांची मालमत्ता गोठवली आहे आणि कोणत्याही चिनी संस्था किंवा व्यक्तींना त्यांच्याशी व्यवहार करण्यास किंवा त्यांना सहकार्य करण्यास सक्त मनाई केली आहे.

तैवान: वाढत्या संघर्षाचे कारण

जपानच्या पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे, दोन्ही देशात निर्माण झालेल्या अलीकडील तणावानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, बीजिंग या विधानांकडे तैवानवरील आपल्या सार्वभौमत्वाच्या दाव्यांना दिलेले आव्हान म्हणून पाहतो. चीनने टोकियोला वारंवार आवाहन केले आहे की, ज्याला चीन आपली ‘अंतर्गत बाब’ मानतो, त्यामध्ये हस्तक्षेप करणे टाळावे.

टोकियोने अद्याप या नव्या उपायांनावर औपचारिक प्रतिसाद दिलेला नाही, परंतु विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार: चीन–जपान संबंधांमध्ये ‘तैवान’ हा सर्वात संवेदनशील आणि विभाजनकारी मुद्दा असल्याचे, या कृतीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात जपान अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रांसोबतचे आपले सुरक्षा संबंध अधिक दृढ करत असताना, व्यापक प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचीनमध्ये आता मोफत बाळंतपण; सरकार उचलणार प्रसूतीचा पूर्ण खर्च
Next articleThales Partners with Indian Firm SFO Technologies for Rafale Radar Production

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here