नौदलाच्या 28 EON-51 प्रणालीसाठी BEL बरोबर करार

0
EON-51
संरक्षण मंत्रालयाने नौदलाच्या 28  EON-51साठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी 642 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

संरक्षण मंत्रालयाने 8 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडसोबत (BEL) 28 EON-51 प्रणाली खरेदी करण्यासंदर्भात करार केला.EON-51 ही इलेक्ट्रो ऑप्टिकल फायर कंट्रोल प्रणाली आहे जी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि थर्मल इमेजर्स उपकरणांचा वापर करून लक्ष्यांचा शोध, तपास  आणि वर्गीकरण करते.

ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत रोजगार निर्माण करेल तसेच सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह विविध भारतीय उद्योगांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देईल. त्यासोबतच संरक्षणात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या अधिग्रहणामुळे 11 अत्याधुनिक ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स आणि तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांसाठीची खरेदी (भारतीय-आय. डी. डी. एम.)’ खरेदी श्रेणी अंतर्गत EON-51 प्रणालीने सुसज्ज केले जाईल, ज्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर सुनिश्चित होईल.

देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षमतांना चालना देताना भारतीय नौदलाची पाळत ठेवणे आणि लढाईची तयारी वाढवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

टीम भारतशक्ती

 


Spread the love
Previous articleBEL Bags ₹642 Cr Contract To Supply 28 EON-51 Systems For Navy
Next articleऑपरेशन डेव्हिल हंट : बांगलादेशात कायद्याचे राज्य अपयशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here