ऑपरेशन डेव्हिल हंट : बांगलादेशात कायद्याचे राज्य अपयशी

0
ऑपरेशन
जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारामुळे बांगलादेशातील कायद्याचे राज्य कमकुवत होत आहे आणि अंतरिम सरकार त्यावर नियंत्रणात ठेवण्यास असमर्थ असल्याचे दिसते.

जमावाकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तणावपूर्ण  बनली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या न्याय्य बाजू किंवा शहाणपणाबद्दल खात्री नसल्याने कोणताही पक्ष माघार घेण्यास तयार नाही.

बांगलादेशने ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे, ज्यात वरवर पाहता अवामी लीगचे समर्थक आणि त्यांच्या मित्रपक्षांना लक्ष्य करण्यासाठी राबवले जात आहे. गाझीपूरमध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या नेत्यांनी या हल्ल्यामागे अवामी लीगचे नेते ए. के. एम. मोझम्मेल हक आणि गाझीपूरचे माजी महापौर जहांगीर आलम यांचा हात असल्याचे म्हटले आहे. चळवळीतल्या नेत्यांनी अवामी लीगची नोंदणी रद्द करण्याची, शेख हसीना यांना अटक आणि खटला चालवण्याची आणि गाझीपूर हल्ल्यात सामील असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

चळवळीचे सदस्य आरिफ सोहेल म्हणाले, “जरी फॅसिस्ट हसीना पळून गेल्या असल्या तरी त्यांचे सहकारी अजूनही आपल्या आजूबाजूला आहेत. आपण परिस्थिती संयमाने हाताळली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत अव्यवस्था निर्माण करण्याची गरज नाही.”

स्थानिक प्रशासनात अवामी लीगच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाचा हा कदाचित शेवटचा संकेत होता. विद्यार्थ्यांवर हल्ला होत असताना मदतीसाठी हाक मारूनही पोलीस किंवा नागरी प्रशासनाकडून काहीच मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

परंतु वृत्तात असे सूचित केले गेले आहे की विद्यार्थी नेत्यांनी जो दावा केला आहे त्यापेक्षा या घटनेत आणखी बरेच काही मुद्दे होते. असे दिसते की अनेकजण मोझम्मेल हक यांच्या घरी जमले, मग घरात घुसले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल, जवळच्या इतरांनी, बहुधा त्यांच्या समर्थकांनी, विद्यार्थ्यांवर हल्ला केला ज्यामुळे अनेकजण जखमी झाले.

लोकांनी कायदा स्वतःच्या हातात घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीविरोधात संपादकीयमधून अनेक वृत्तपत्रांनी इशारा दिला. ढाका ट्रिब्यूनने असा इशारा दिला की, “जेव्हा जमाव गोंधळ घालतो तेव्हा आपण सर्व गरीब असतो. जर आपण खरोखरच एक होण्यासाठी, एक चांगला बांगलादेश बनण्यासाठी गंभीर आहोत, तर कायद्याचे राज्य सुनिश्चित करणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, गेल्या वर्षीच्या उठावामुळे आता पर्यंत केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी मातीमोल ठरण्याचा धोका आहे.”

ढाका ट्रिब्यूनचे संपादक जफर सोभन यांनी एका लेखात “सध्याच्या प्रशासनाचे नियंत्रण आहे का?” असा प्रश्न विचारला आहे.

“कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचा कोणताही धाक न बाळगता जेव्हा जमाव घर फोडतो आणि पाडतो, तेव्हा ते देशातील कायद्याच्या स्थितीत प्रेरणा देण्यासाठी फारसे काही करत नाही. यामुळे हा कार्यक्रम कोण चालवत आहे आणि अंतरिम सरकारचे आदेश किती गांभीर्याने चालतात? असे अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण होतात.”

सूर्या गंगाधरन


Spread the love
Previous articleनौदलाच्या 28 EON-51 प्रणालीसाठी BEL बरोबर करार
Next articleIndian Navy’s Chiefs’ Annual Conclave Focuses on Future Strategy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here