25 नोव्हेंबर 2024 रोजी BharatShakti.in आपला 9 वा वाढदिवस साजरा करत 10व्या वर्षात प्रवेश करत आहे. संस्थापक सदस्यांमधील नितीन अ. गोखले, ब्रिगेडियर एस.के. चॅटर्जी (निवृत्त), आणि नीलंजना बॅनर्जी यांनी भारताचे प्रमुख संरक्षण-केंद्रित व्यासपीठ तयार करण्याच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत केलेली चर्चा तुम्ही आमच्या युट्युब चॅनेलवरील एका खास व्हिडिओमध्ये बघू शकता. भारताच्या संरक्षण उद्योगाचा आवाज आपण बनू शकतो या साध्या विचरातून निर्माण झालेल्या या व्यासपीठाचा आतापर्यंतचा प्रवास, त्यांच्या समोर आलेली आव्हाने, त्यांनी गाठलेले यशाचे विविध टप्पे आणि भविष्यातील आकांक्षा यांचा आढावा या व्हिडिओत घेण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर 2015 रोजी, BharatShakti.in हे भारताच्या संरक्षण उद्योग आणि सशस्त्र दलांसाठी समर्पित एक व्यासपीठ सुरू करण्यात आले. आज, 10 व्या वर्षात प्रवेश करत असताना, BharatShakti.in लवचिकता, विश्वासार्हता आणि आपल्या प्रभावाचा उल्लेखनीय प्रवास साजरा करत आहोत.
या व्यासपीठाचे संस्थापक, नितीन अ. गोखले आणि त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे ब्रिगेडियर एस. के. चॅटर्जी (निवृत्त) आणि नीलंजना बॅनर्जी या सदस्यांनी हा उपक्रम कसा उभा राहिला यावर चर्चा केली आहे.
झेन टेक्नॉलॉजीजचे सीएमडी नितीन आणि अशोक अतलुती यांच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या सामायिक उत्कटतेमधून या मंचाची कल्पना जन्माला आली.
भारताचे प्रमुख संरक्षण व्यासपीठ बनण्याच्या ध्यासातून त्यावेळी हातात अपुरा निधी असूनही BharatShakti.in ची वाटचाल सुरू झाली. आज संरक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह आवाज म्हणून त्याची ओळख बनली आहे. संरक्षण खरेदी विभागातील धोरणकर्ते, संरक्षण उद्योगातील दिग्गज, लष्करी नेतृत्व आणि व्यावसायिकांसह सर्व भागधारकांना या व्यासपीठाने एकत्र आणले आहे. वर्षानुवर्षे या व्यासपीठावर सखोल ज्ञानातून निर्माण झालेला आशय, विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून उतरलेले लेख आणि भारतीय तसेच जागतिक संरक्षण दिग्गजांना एकत्रित आणणाऱ्या वार्षिक कॉन्क्लेव्हसारख्या सिग्नेचर कार्यक्रमामुळे विश्वासार्हता प्राप्त केली आहे.
हा मैलाचा दगड भविष्यासाठीची बांधिलकी देखील दर्शवतो. नितीन गोखले यांनी सांगितल्याप्रमाणे, या मंचाचे उद्दिष्ट स्पष्टीकरणात्मक व्हिडिओ, अधिक क्षेत्रीय भेटी आणि संरक्षण आधुनिकीकरणावरील विशेष मालिका, संरक्षण क्षेत्रातील महिला आणि भारतातील प्रमुख प्रशिक्षण संस्थांसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे आपली व्याप्ती वाढवणे हे आहे. BharatShakti.inच्या यूट्यूब चॅनलची सचोटी आणि त्या वर्गाची ओळख कायम ठेवत यानंतरच्या काळात उच्च दर्जाचा, आकर्षक आशय देण्याबरोबरच आपली ओळख आणखी बळकट करण्याची योजना ही टीम आखत आहे.
ही चर्चा केवळ भूतकाळातील कामगिरीचा आढावा नाही – BharatShakti.in च्या आशयाला आकार देण्याच्या, भागीदारी वाढवण्याच्या आणि भारताच्या संरक्षण आकांक्षांना समर्थन देण्याच्या ध्येयामध्ये पुढे काय आहे याचा प्रेरणादायी रोडमॅप आहे. तुमच्या सतत असणाऱ्या पाठिंब्याच्या जोरावर हा मंच पुढील दशकात अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
टीम भारतशक्ती