
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) रविवारी बलुचिस्तानच्या नोशकी (नुश्की) जिल्ह्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्याजवळ घडवून आणलेल्या स्फोटात, 90 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला आहे. याच गटाने गेल्या आठवड्यात एका प्रवासी ट्रेनचे देखील अपहरण केले होते.
राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या हल्ल्यात, पाच सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, बारा सैनिक जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नोशकी स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) जफरउल्ला सुमलानी यांच्या मते, ‘प्राथमिक तपासात ही घटना एक आत्मघातकी हल्ला असल्याचे दिसून येते.’
एसएचओ सुमलानी म्हणाले की, “हल्ल्याच्या ठिकाणाहून मिळालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, एका आत्मघातकी हल्लेखोराने FC ताफ्यावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले.”
हल्ल्यानंतर जखमींना FC कॅम्प आणि Noshki (Nushki) प्रशिक्षण रुग्णालयात हलविण्यात आले.
एसएचओ सुमलानी यांनी घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांकडून निषेध
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी, यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत, X वर पोस्ट केले: की “आम्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. निष्पाप लोकांना लक्ष्य करणे ही क्रूरतेची पराकाष्ठा आहे. देशाचा शत्रू आमच्या प्रिय मातृभूमीत अस्थिरता निर्माण करण्यासाठी एक घृणास्पद कट रचत आहे. मात्र अशा भ्याड कृत्यांमुळे देशाचा दृढनिश्चय कमकुवत होऊ शकत नाही.”
90 जण ठार झाल्याचा, बीएलएचा दावा
याप्रकरणी BLA ने एक निवेदन जारी करत, हल्ल्यात 90 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला आहे.
“काही तासांपूर्वी नोशकी येथील आरसीडी महामार्गावरील रख्शान मिलजवळ, व्हीबीआयईडी फिदाई हल्ल्यात बलुच लिबरेशन आर्मीची फिदाई युनिट असलेल्या माजीद ब्रिगेडने कब्जा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य केले. या ताफ्यात आठ बस होत्या, त्यापैकी एक बस स्फोटात पूर्णपणे नष्ट झाली,” असे बीएलएने एका निवेदनात म्हटले आहे, जे सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.
जाफर एक्सप्रेस अपहरण
गेल्या आठवड्यात बीएलएने, बलुचिस्तानच्या सिबी परिसरात जाफर एक्सप्रेस या प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते, ज्यामध्ये 18 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 26 जणांचा मृत्यू झाला होता.
ट्रेनच्या अपहरणानंतर झालेल्या कारवाईत 5 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यू झाला.
जागतिक दहशतवाद निर्देशांक
पाकिस्तानात अलिकडच्या काळात दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जागतिक दहशतवाद निर्देशांक (GTI), हा जगातील 99.7 टक्के लोकसंख्या असलेल्या 163 देशांसाठी दहशतवादाच्या परिणामांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करतो.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)