ट्रम्प यांच्या टॅरिफ बाबत, ब्राझीलचे अध्यक्ष लुला BRICS नेत्यांशी चर्चा करणार

0

बुधवारी, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी, आपण स्वतः एक विभाजित जगात बहुपक्षीयतेचा (multilateralism) पुरस्कर्ता असल्याचे सांगितले आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी लादलेल्या टॅरिफ विरोधात ब्रिक्स (BRICS) देशांची संयुक्त प्रतिक्रिया तयार करण्यासाठी, भारत व चीनच्या नेत्यांशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली.

राष्ट्राध्यक्ष लुला म्हणाले की, “ट्रम्प जे काही करत आहेत, ते गुप्त आहे त्यांना बहुपक्षवाद नष्ट करायचा आहे, जिथे सामूहिकरित्या संस्थांमध्ये करार केले जातात आणि त्याऐवजी एकपक्षवाद (unilateralism) आणायचा आहे, जिथे ते इतर देशांशी एक-एक करून चर्चा करतात.”

“एका लहान लॅटिन अमेरिकन देशाची, अमेरिकेसमोर वाटाघाटीची कायताकद आहे? काहीही नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

लुला म्हणाले की, “ट्रम्प यांच्या शुल्काचा सामना कसा करायचा, याबबत ते विकसनशील राष्ट्रांच्या BRICS समूहामध्ये चर्चा सुरू करतील.”

गुरुवारी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि त्यानंतर चीनचे शी जिनपिंग आणि इतर नेत्यांना फोन करण्याची योजना आखत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या समूहात रशिया आणि इतर उदयोन्मुख अर्थव्यवस्था देखील सहभागी होतील.

BRICS नेत्यांशी चर्चा

“मी ब्रिक्स सदस्यांशी चर्चा करुन हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, या परिस्थितीत प्रत्येकजण कसे वागत आहे, प्रत्येक देशावर त्याचे काय परिणाम होत आहेत, जेणेकरून आम्ही योग्य निर्णय घेऊ शकू,” असे राष्ट्राध्यक्ष लुला म्हणाले. जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या समूहाचा उल्लेख करताना, ते म्हणाले की, “हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, G20 मध्ये BRICS चे दहा देश समाविष्ट होणार आहेत,”

“ब्राझीलकडे सध्या BRICS चे अध्यक्षपद असून, ट्रम्प बहुपक्षवादावर का हल्ला करत आहेत आणि त्यांची उद्दिष्ट्ये काय असू शकतात, याविषयी आपल्याला मित्र राष्ट्रांशी चर्चा करायची आहे की,” असे लूला यांनी सांगितले.

गेल्या महिन्यात, जेव्हा रिओ डी जनेरियो येथे ब्रिक्स समूहाची शिखर परिषद भरली होती, तेव्हा ट्रम्प यांनी BRICS ला “अमेरिकाविरोधी” म्हटले होते आणि त्या देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त 10% शुल्क लावण्याची धमकी दिली होती.

ट्रम्प यांनी लादलेल्या काही सर्वात जास्त शुल्कांमध्ये, याच देशांवरील शुल्कांचा समावेश आहे.

गेल्या महिन्यात, ब्राझील या यादीत पहिल्या क्रमांकावर आला, जेव्हा ट्रम्प यांनी देशाच्या बहुतेक निर्यातीवर 50% शुल्क लावले आणि त्याला माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्याविरुद्ध “विच हंट” (जादूटोणा) म्हटले.

बुधवारी ट्रम्प यांनी, भारतीय आयातीवर आणखी 25% शुल्क लावण्याची धमकी दिली, कारण भारत रशियन तेलावर अवलंबून आहे. यामुळे आधीच असलेल्या 25% शुल्कात भर पडेल.

चीन आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या वस्तूंवरील ३०% शुल्क देखील ट्रम्प यांनी लादलेल्या सर्वात जास्त शुल्कांपैकी आहेत, जरी काही चीनी उत्पादनांवर अतिरिक्त शुल्क आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePakistan’s Army Chief Heads to US for Second Visit in Two Months Amid Shifting South Asia Dynamics
Next articleIndia to Host Australian Army Chief Next Week for Strategic Collaboration

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here