CCC 2025: सशस्त्र दलांसाठी संयुक्तता आणि तंत्रज्ञान-चलित रोडमॅप निश्चित

0

बुधवारी, संयुक्त कमांडर परिषद- CCC 2025 ची सांगता झाली. भारताच्या सर्वोच्च लष्करी नेतृत्वाने सशस्त्र दलांना पूर्णपणे एकात्मिक, तंत्रज्ञान-चालित आणि सुधारणा-केंद्रित दलात रूपांतरित करण्यासाठी, एक निर्णायक रोडमॅप (कृती आराखडा) सादर निश्चित करण्यात आला. “सुधारणांचे वर्ष – भविष्यासाठी परिवर्तन” या थीम अंतर्गत आयोजित केलेली ही तीन दिवसीय परिषद, वाढत्या अस्थिर जागतिक व्यवस्थेत जटिल, बहु-डोमेन आव्हानांसाठी तयारी करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते.

परिषदेचे मुख्य निष्कर्ष

  • संयुक्त लष्करी अवकाश सिद्धांत: प्रथमच, भारताने अवकाश क्षेत्राला एक ‘ऑपरेशनल डोमेन’ म्हणून औपचारिक मान्यता दिली. यामुळे अवकाश-आधारित क्षमता विकसित करण्यासाठी तिन्ही सेवांमध्ये (भूदल, नौदल आणि वायुदल) समन्वय साधला जाईल.
  • तंत्रज्ञान-आधारित युद्ध: पुढील पिढीच्या युद्धासाठी तयारी म्हणून, तिन्ही सेवांनी त्यांच्या ऑपरेशनल सिद्धांतांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), काउंटर-ड्रोन प्रणाली, क्षेपणास्त्र संरक्षण आणि सायबर लवचिकता यांचा समावेश करण्यास वचनबद्धता दर्शविली.
  • संयुक्तता आणि थिएटर कमांड्स: परस्पर समन्वय, सुव्यवस्थित कमांड संरचना आणि थिएटर कमांड्सच्या अंमलबजावणीला गती देण्यावर पुन्हा भर देण्यात आला.
  • सुधारणेचा आढावा आणि रोडमॅप: CDS जनरल अनिल चौहान, यांनी गेल्या दोन वर्षांतील प्रगतीचा आढावा घेतला आणि राष्ट्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाहीसाठी कृती आराखडा सादर केला.
  • संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता: पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यावर जोर दिला, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि औद्योगिक परिसंस्था मजबूत होईल.
  • माहिती युद्ध सज्जता: माहिती, वैचारिक आणि जैविक युद्धांविरुद्ध मजबूत क्षमता निर्माण करण्याच्या तातडीवर परिषदेत भर देण्यात आला.
  • खरेदी आणि आर्थिक सुधारणा: कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारण्यासाठी खरेदी प्रक्रिया सोपी करणे आणि आर्थिक अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे यासारख्या शिफारसींचा समावेश होता.
  • धोरणात्मक शेजारसंबंधांचे मूल्यांकन: प्रादेशिक तणाव आणि जागतिक बदलांचे विश्लेषण करण्यात आले, ज्यात दूरदृष्टी आणि सक्रिय भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले गेले.

नेतृत्वाचे दृष्टिकोन

आपल्या मुख्य भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सशस्त्र दलांच्या समर्पणाचे कौतुक केले आणि नाविन्यपूर्णता, संयुक्तता आणि लवचिकता यावर आधारित “परिवर्तनात्मक झेप” घेण्याचे आवाहन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, दलांच्या सज्जतेवर चर्चा असलेल्या सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी अपारंपरिक आणि पारंपरिक नसलेल्या धोक्यांविरुद्ध चपळतेची गरज असल्याचे सांगितले. परिषदेचा समारोप करताना CDS जनरल चौहान यांनी सांगितले की, “अनिश्चित आव्हानांच्या जगात, भारताच्या सशस्त्र दलांना भविष्यासाठी सज्ज आणि सार्वभौम ठेवण्यासाठी, हे परिवर्तन एक सततची प्रक्रिया म्हणून सुरू ठेवणे आवश्यक आहे.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleEurope’s New Strategic Vision: EU-India Cooperation in Defence, and Emerging Domains
Next articleयुरोपियन युनियन (EU) भारतासोबत बहुक्षेत्रीय सहकार्य वाढवण्यास उत्सुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here