कार निकोबार बेटावरील हवाई दलाच्या सुधारित धावपट्टीचे CDS यांच्या हस्ते उद्घाटन

0
CDS
CDS जनरल अनिल चौहान यांनी कार निकोबार हवाई दलाच्या तळावरील नूतनीकरण केलेल्या धावपट्टीचे उद्घाटन केले. 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी शुक्रवारी अंदमान आणि निकोबार बेटांवरील भारतीय हवाई दलाच्या (IAF) कार निकोबार हवाई तळावरील अद्ययावत धावपट्टीचे उद्घाटन केले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “CDS यांनी भारतीय हवाई दलाच्या कार निकोबार हवाई तळावरील पुनर्बांधणी केलेल्या आणि नूतनीकरण केलेल्या धावपट्टीचे उद्घाटन केले.” श्री विजय पुरमपासून सुमारे 535 किमी अंतरावर असलेल्या निकोबार जिल्ह्यातील कार निकोबारला 2004 च्या त्सुनामीदरम्यान मोठा फटका बसला होता.

ही अद्ययावत धावपट्टी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या मलाक्का सामुद्रधुनीवर सामरिक देखरेख ठेवण्यास सक्षम असून पूर्व आघाडीची क्षमता वाढवणारी आहे. या सुधारणेमुळे भारतीय हवाई दलाला जलदगतीने हवाई कारवाया करणे शक्य होईल.

विमानांची सहज हालचाल सुलभ करण्यासाठी धावपट्टीचे ॲप्रन क्षेत्र विस्तारण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, या नवीन सुविधेमुळे भारतीय हवाई दलाला कमी वेळात लांब पल्ल्याच्या फायरिंगचा सराव करणे शक्य होईल.

2025 मध्ये कार निकोबार येथे धावपट्टीच्या विस्तार आणि आधुनिकीकरणादरम्यान चित्रित करण्यात आलेला स्ट्रॅटन्यूज ग्लोबल/भारतशक्तीचा माहितीपट पहा. आमच्या ‘आर्क ऑफ पॉवर’ या मालिकेच्या सातव्या भागाला 1 जानेवारी, 2026 रोजी 1 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

एका वरिष्ठ कमांड अधिकाऱ्याने सांगितले की, “CDS यांच्या भेटीमुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंदमान आणि निकोबार बेटांचे सामरिक महत्त्व अधोरेखित होते, जे आमच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाशी आणि या प्रदेशातील सुरक्षा तसेच विकासासाठीच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ग्रेट निकोबार बेटावर ग्रीनफिल्ड विमानतळाच्या विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवांकरिता निविदा मागवल्या आहेत. याचे उद्दिष्ट एकूण 1 हजार 039 हेक्टर क्षेत्रावर एक अत्याधुनिक विमानतळ तयार करणे आहे, जे एअरबस A380 विमानाला सामावून घेण्यास सक्षम असेल. हा विमानतळ सर्व-हवामान परिस्थितीत कार्यान्वित राहील, ज्यामुळे पर्यावरणीय परिस्थिती कशीही असली तरी सातत्याने कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल. प्रस्तावित विमानतळावर 4 हजार मीटर बाय 75 मीटरची धावपट्टी आणि 4 हजार 800 मीटर बाय 45 मीटरचा टॅक्सीवे असेल, जो एकाच वेळी चार वाइड-बॉडी आणि 28 नॅरो-बॉडी विमानांना हाताळण्यास सक्षम असेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारतीय लष्करासाठी 2026 हे ‘नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीत वर्ष’ असणार
Next articleतैवान ते आर्थिक विकास, जुन्याच संकल्पनांची जिनपिंग यांच्याकडून पुनरावृत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here