दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियाने तणाव वाढवला : चीनचा दावा

0
दक्षिण
21 जुलै 2022 रोजी छापण्यात आलेले चिनी आणि ऑस्ट्रेलियन झेंडे या चित्रात दिसत आहेत. (रॉयटर्स/डॅडो रूविक/चित्रण/फाईल फोटो)

चीनने ऑस्ट्रेलियावर वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात सागरी गस्त घालून जाणूनबुजून तणाव निर्माण केल्याचा शुक्रवारी आरोप केला आणि त्याला ‘बनावट कथा’ म्हटले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने आपल्या कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत असल्याचे आग्रहाने म्हटले आहे.

चिनी पी. एल. ए. जे-16 जेटने आरएएएफ विमानाच्या 30 मीटर (100 फूट) आत प्लेअर्सचा मारा केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनी केला आहे. ही घटना  नौदल आणि हवाई दलाच्या परस्परविसंवादामुळे ताणलेल्या संबंधांच्या दरम्यान घडली असून याला ऑस्ट्रेलियाने धोकादायक म्हटले आहे.

‘असुरक्षित आणि अव्यावसायिक’

मंगळवारी आपण आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात नियमित गस्त घालत असल्याचे सांगत, गस्त घालण्याच्या दिशेने चीनच्या जेटने केलेल्या “असुरक्षित आणि अव्यावसायिक” कृती असे ऑस्ट्रेलियाने संबोधल्यानंतर शुक्रवारी चीनने आपली प्रतिक्रिया  दिली, ज्यात बीजिंगने वक्तव्याचा विरोध केला.
चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झिआओगांग म्हणाले, “ऑस्ट्रेलियाने जाणूनबुजून दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या हक्कांचे उल्लंघन केले आणि चीनला चिथावले, तरीही खलनायकानेच (ऑस्ट्रेलियाने) खोटी माहिती पसरवत पहिल्यांदा तक्रार केली.”

‘घरामध्ये घुसखोरी’

झांग यांनी ऑस्ट्रेलियन लष्करी विमानावर व्यस्त जलमार्गातील मुख्य मार्गांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला, ते म्हणाले की ते इतरांच्या घरांमध्ये घुसले आणि त्यावर चीनचा प्रतिसाद वाजवी आणि आपल्या सार्वभौमत्वाचा कायदेशीर बचाव करणारा होता.”

“आम्ही ऑस्ट्रेलियाला तर्क आणि साहस यांचा भास सोडून देण्याचे आवाहन करतो,”  असे झांग म्हणाले.

इतरांचे आणि स्वतःचे नुकसान करण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात “समस्या निर्माण करण्याऐवजी” त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या आघाडीच्या नौदल आणि हवाई दलांना रोखण्याचे आवाहन केले.

चीनच्या प्रतिक्रियेपूर्वी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही ही कृती असुरक्षित मानतो आणि हे आम्ही स्पष्ट केले आहे.”

संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस म्हणाले की ऑस्ट्रेलियन विमान आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीत होते, ते पुढे म्हणाले, “चिनी जे16 चे पायलट फ्लेअर्स नंतर कुठे जातात यावर नियंत्रण ठेवू शकले असते असा कोणताही मार्ग नव्हता.”

जलप्रवासाचे स्वातंत्र्य

मार्लेस म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सैन्याने दक्षिण चीन समुद्रात नौवहन स्वातंत्र्याचा वापर केल्याने धोका वाढतो.

“आम्ही हे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार करतो”, असे त्यांनी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनला शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

“असे करणारा आपण एकमेव देश नाही. पण हे खरोखर महत्वाचे आहे की आपण रस्त्याच्या नियमांवर ठाम आहोत, जसे ते आधी होते.”

ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम या देशांनी या भागात दावे केले असूनही  दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर चीन दावा करतो.

हेग येथील कायमस्वरुपी लवाद न्यायालयाने 2016 साली दिलेला निर्णय चीनने फेटाळला आहे, की त्याच्या व्यापक दाव्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याने समर्थन दिलेले नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)

 


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here