ताकाची यांच्या वक्तव्यानंतर चिनी पर्यटकांना जपानला भेट देण्यास मनाई

0
जपानच्या पंतप्रधान ताकाची यांच्या तैवानवरील वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात, बीजिंगने चिनी पर्यटकांना जपानला भेट देण्यापासून रोखल्यानंतर जपानने शनिवारी चीनला “योग्य उपाययोजना” करण्याचे आवाहन केल्याचे वृत्त क्योडो वृत्तसंस्थेने दिले आहे.

जपानने “चीनपर्यंत संदेश पोहोचण्यात आला आहे आणि योग्य ती कृती करण्यासाठी जोरकसपणे सांगण्यात आले आहे,” असे वृत्तात म्हटले आहे. उपाययोजनांबद्दल सविस्तरपणे सांगताना त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला नाही.

ताकाची यांचे तैवानबाबतचे वक्तव्य

जपानच्या पंतप्रधान साने ताकाची यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने शुक्रवारी आपल्या नागरिकांना जपानला भेट देण्यापासून सावध केले. गेल्या आठवड्यात ताकाची यांनी म्हटले होते की तैवानवर चीनचा हल्ला झाला तर तो  “जगण्यासाठी धोकादायक परिस्थिती” निर्माण करू शकतो आणि त्यावर टोकियोकडून लष्करी प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

किहारा म्हणाले की जपान आणि चीनमध्ये या मुद्द्यावर मतभेद आहेत आणि त्या दृष्टीने संवाद राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे क्योडोने वृत्त दिले आहे.

चीन लोकशाही पद्धतीने शासित तैवान हा आपला भूभाग असल्याचा दावा करतो आणि जपानी भूभागापासून फक्त 110 किमी (70 मैल) अंतरावर असलेल्या या बेटाचा ताबा घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची शक्यता नाकारत नाही. तैवानचे सरकार बीजिंगच्या सार्वभौमत्वाचे दावे कायम नाकारत आले आहे.

जपानी नेत्यांनी यापूर्वी अशा परिस्थितींवर चर्चा करताना सार्वजनिकरित्या तैवानचा उल्लेख करणे टाळले आहे, टोकियोचा मुख्य सुरक्षा मित्र अमेरिकेनेही “सामरिक अस्पष्टता” राखली आहे.

चीनची भूमिका

चीनच्या तीन विमान कंपन्यांनी शनिवारी सांगितले की जपानला जाणाऱ्या तिकिटांचे पैसे कोणतीही काटछाट न करता  परत केले जाऊ शकतात किंवा प्रवासाचे ठिकाण बदलता येईल असे राज्य माध्यम चायना न्यूज सर्व्हिसने म्हटले आहे.

तैवानच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या प्रवक्त्या करेन कुओ म्हणाल्या की, जपानवरील चीनच्या प्रवास निर्बंधांमुळे आणि आजूबाजूच्या भागात सुरू असलेल्या लाईव्ह-फायर कवायतींमुळे प्रादेशिक घडामोडींकडे लक्ष वेधले गेले आहे.

त्या म्हणाल्या की, बीजिंगचे “जपानविरुद्ध राजकीयदृष्ट्या प्रेरित, बहुआयामी धोके इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षा आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करतात”.

चीनच्या सागरी सुरक्षा प्रशासनाने सांगितले की, सोमवार ते मंगळवार मध्य पिवळ्या समुद्राच्या काही भागात लाईव्ह-फायर सराव चोवीस तास आयोजित केले जातील आणि या भागात प्रवेश करण्यास मनाई असेल, असे अधिकृत माध्यम सीसीटीव्हीने म्हटले आहे. मात्र यात नेमके क्षेत्र नमूद केलेले नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleदाएश-खोरासनः पाळेमुळे दक्षिण आशियात, पोहोच मात्र जागतिक
Next articleCDS Demands Accountability From Defence Firms Over Delays and Misleading Claims

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here