तैवानजवळ क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या योजनेवरून, चीनने जपानला खडसावले

0

सोमवारी चीनने, तैवानजवळच्या बेटावर क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या जपानच्या योजनेचा जाहीर निषेध केला. चीनने टोकियोवर असा आरोप केला, की “ते जाणूनबुजून प्रादेशिक तणाव वाढवण्याचा आणि लष्करी संघर्ष भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत.”

वाढता राजनैतिक तणाव

जपानच्या पंतप्रधान सनेई ताकाईची यांनी या महिन्यात केलेल्या विधानानंतर, सध्या दोन्ही देशांमधील संबंध हे गेल्या अनेक वर्षांतील, सर्वात मोठ्या राजनैतिक तणावातून जात असतानाच, ही टिप्पणी करण्यात आली आहे. ताकाईची यांनी म्हटले होते की, “लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या तैवानवर चीनने काल्पनिक हल्ला केल्यास, टोकियोकडून त्याला लष्करी प्रत्युत्तर मिळू शकते.”

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी नियमित पत्रकार परिषदेत सांगितले की, “जपानमधील उजव्या विचारसरणीचे गट, जपानला आणि या प्रदेशाला आपत्तीकडे नेत आहेत.”

ही टिप्पणी, जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी रविवारी केलेल्या वक्तव्यानंतर आले आहे. कोइझुमी म्हणाले होते की, “तैवानच्या पूर्व किनारपट्टीपासून सुमारे 110 किमी (68 मैल) दूर असलेल्या योनागुनी बेटावरील लष्करी तळावर, मध्यम पल्ल्याची-जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र युनिट तैनात करण्याची योजना हळूहळू पुढे सरकत आहे.”

माओ यांनी सोमवारी सांगितले की, “विशेषतः ताकाईची यांच्या पूर्वीच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, ही कृती अत्यंत धोकादायक आहे आणि त्यामुळे शेजारील देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये गंभीर चिंता निर्माण व्हायला हवी.”

लष्करी इशारे

नोव्हेंबरच्या मध्यात, चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जपानला चेतावणी दिली होती की, लोकशाही पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या तैवानच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी बळाचा वापर केला, तर त्यांनी ‘गंभीर’ लष्करी पराभवाचा सामना करावा लागू शकतो.

सोमवारी तैपेई येथे, तैवानचे उप-परराष्ट्र मंत्री फ्रँकोइस वू यांनी खासदारांना सांगितले की, “योनागुनी तैवानच्या किती जवळ आहे हे लक्षात घेता, जपानला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्या भूभागाची सुरक्षा करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलण्याचा अधिकार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “जपान आपल्या संबंधित लष्करी सुविधा मजबूत करत आहे, हे मूलत: तैवान सामुद्रधुनीतील सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.”

“जपानचे तैवानबद्दल कोणतेही प्रादेशिक हेतू किंवा शत्रुत्व नसल्यामुळे, हे अर्थातच आमच्या राष्ट्रीय हितासाठी उपयुक्त आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोइझुमी यांनी रविवारी सांगितले होते की, ‘योनागुनीचे संरक्षण करणे हा क्षेपणास्त्र तैनातीचा उद्देश आहे.’ “आम्हाला विश्वास आहे की, हे युनिट कार्यान्वित केल्याने आमच्या देशावर सशस्त्र हल्ला होण्याची शक्यता प्रत्यक्षात कमी करता,” असेही ते म्हणाले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleजपानसोबतच्या राजनैतिक वादात हाँगकाँगचा चीनला पूर्ण पाठिंबा
Next articleIndia–Oman Deepen Defence Industrial Cooperation; PM Likely to Visit Muscat Next Month

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here