चीनची भ्रष्टाचारविरोधी मोहीम अधिक कडक; गैरवर्तनावर नव्याने फोकस

0
भ्रष्टाचारविरोधी मोहीम

चीनच्या राज्य प्रसारकाच्या एका माहितीपटातून उघड झाल्यानुसार, चीन आपली भ्रष्टाचारविरोधी मोहीम पूर्ण स्वरूपाच्या लाचलुचपतीत रूपांतर होण्याआधीच गैरवर्तन थांबवण्यावर केंद्रित करण्याची योजना आखत आहे. या माहितीपटामध्ये पदच्युत झालेल्या एका माजी मंत्र्याच्या गैरकृत्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

चीनची सर्वोच्च भ्रष्टाचारविरोधी संस्था, ‘सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शन’ (CCDI) च्या तीन दिवसीय वार्षिक बैठकीच्या एक दिवस आधी, रविवारी उशिरा सीसीटीव्हीच्या सहाय्याने तयार केलेल्या “अन्व्हेव्हरिंग इन अवर रिझोल्व्ह, अनयिल्डिंग इन अवर स्टेप” (आमच्या संकल्पात अढळ, आमच्या पाऊलात अविचल) या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला.

या व्हिडिओमध्ये, माजी कृषीमंत्री टांग रेनजियान यांना प्रामुख्याने दाखवण्यात आले आहे, ज्यांना गेल्या सप्टेंबरमध्ये लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा झाली होती. एकीकडे त्यांनी कसे आलिशान मेजवानी, मनोरंजन आणि आपल्या कुटुंबासाठी लाभ घेतले, तर दुसरीकडे त्यांचा सहभाग असलेले काही ग्रामीण प्रकल्प मोठ्या प्रमाणावर कसे अर्धवट सोडून दिले गेले, याचे तपशील या व्हिडिओत देण्यात आले आहेत.

टांग या व्हिडिओमध्ये साध्या काळ्या टी-शर्टमध्ये दिसत असून, त्यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या माहितीपटामध्ये, मध्य हेनान प्रांतातील एका अधिकाऱ्याचे उदाहरणही देण्यात आले आहे. मार्चमध्ये, कम्युनिस्ट पक्षाच्या नियमांविरुद्ध आयोजित केलेल्या मेजवानीत त्यांचा अतिमद्यपानामुळे मृत्यू झाला होता. तसेच, चीनच्या पेन्शन फंड प्रणालीतील त्रुटींचा फायदा घेऊन गैरव्यवहार करणाऱ्या दोन तळागाळातील अधिकाऱ्यांच्या प्रकरणाचाही यात समावेश आहे.

पक्षाचे नियम आणि काटकसरीचे उपाय

मगील वर्षी, कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित काटकसरीचे नियम लागू करण्यात आले होते. ज्यानुसार, आलिशान मेजवान्या, “पांढरा हत्ती” ठरणारे (खर्चिक पण निरुपयोगी) पायाभूत सुविधा प्रकल्प, गाड्यांचे आलिशान फिटिंग्ज आणि कार्यालयीन बैठकांमधील शोभेच्या रोपट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

“गैरवर्तणुकीपासून भ्रष्टाचारापर्यंत पसरलेली हितसंबंधांची ही साखळी आपण तोडली पाहिजे आणि भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी एक कार्यप्रणाली तयार केली पाहिजे,” असे सीसीडीआय (CCDI) अधिकारी वांग शिन्की यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

शी जिनपिंग यांचा इशारा आणि ‘हाय-प्रेशर’ मोहीम

भ्रष्टाचार हा चीनच्या कम्युनिस्ट पक्षासाठी ‘सर्वात मोठा धोका‘ आहे, असे वक्तव्य चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्यावर्षी केले होते. सत्ताधारी पक्ष, चिनी समाजाच्या विविध स्तरांमध्ये रुजलेली ही जुनी समस्या सोडवण्याचे काम असेच सुरू ठेवेल, असा स्पष्ट संकेत यातून मिळाला होता.

बीजिंगने यासंबंधीची “हाय-प्रेशर मोहीम” कायम ठेवली असून, त्याअंतर्गत गेल्यावर्षी अनेक हाय-प्रोफाईल व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये माजी सिक्युरिटी रेग्युलेटर प्रमुख यी हुइमान, चायना इस्टर्न एअरलाईन्सचे माजी अध्यक्ष लिऊ शाओयॉन्ग यांच्यापासून ते देशाचे दुसऱ्या क्रमांकाचे जनरल हे वेईडॉन्ग यांच्यासह नऊ वरिष्ठ लष्करी नेत्यांचा समावेश आहे.

“पक्षाचे आचरण हीच त्याची प्रतिमा असते, ज्याचा परिणाम जनतेच्या पाठिंब्यावर आणि पक्षाच्या अस्तित्वावरही होत असतो,” असे त्या सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमादुरो यांच्यावरील कारवाईमुळे लॅटिन अमेरिकेबाबत चीनला इशारा
Next articleजागतिक व्यापार वाटाघाटींसाठी बीजिंगने केली नव्या उपप्रतिनिधीची नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here