चीनमधील घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तिथल्या तरुण जोडप्यांना विवाह करण्यास आणि मुले जन्माला घालण्यास सरकार प्रोत्साहित करत असूनही, चीनमध्ये विवाहाचे प्रमाण मागील वर्षी पाचव्या भागाने घसरले आहे.
गेल्यावर्षी (2024) चीनमध्ये, 6.1 दशलक्षाहून अधिक जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली होती, जे प्रमाण त्या आधीच्या वर्षात 7.68 दशलक्ष इतके असल्याचे, नागरी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
आर्थिक अनिश्चितता
चीनमधील तरूणांची, विवाहातील आणि स्वत:चे कुटुंब सुरू करण्यामधील कमी होणारी रूची, लहान मुलांच्या संगोपनाचा आणि शिक्षणावरील उच्च खर्चाचा भार, ही यामागील मुख्य कारणे असल्याचा अंदाज आहे. याशिवाय, गेल्या काही वर्षांत मंदावलेल्या आर्थिक प्रगतीमुळे, विद्यापीठातून बाहेर पडलेल्या पदवीधरांना काम मिळणे कठीण झाले आहे आणि मिळालेल्या कामातील दीर्घकालीन संधींबाबत असुरक्षिततेची भावना तरुणांच्या मनात निर्माण झाली आहे.
मात्र चीनी सरकारसाठी, विवाहाचे प्रमाण आणि जन्मदराची संख्या वाढवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणे, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कारण, चीनमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी- 1.4 अब्ज इतकी लोकसंख्या असली, तरी ती संपुष्टात येण्याचा मार्गावर आहे.
एक अपत्त्य धोरण
चीनच्या 1980-2015 मधील, ‘एक अपत्त्य धोरण’ आणि जलद गतीने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे जन्मदर अनेक दशकांइतका घटला आहे, आणि येत्या दशकात अंदाजे 300 दशलक्ष चीनी – जवळपास संपूर्ण युएस लोकसंख्येच्या समतुल्य दरात प्रवेश करतील अशी चिंता आहे.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, स्थानिक अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी हाती घेतलेल्या उपाययोजनांमध्ये- विवाह, प्रेम, प्रजनन आणि कुटुंब निर्मितीच्या सकारात्मक विचारांवर जोर देण्याच्या हेतूने, चीनच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांना “Love education” प्रदान करण्याचा आग्रह करणे, या गोष्टीचा प्रामुख्याने समावेश आहे.
तसेच नोव्हेंबरमध्ये, चीनच्या राज्य परिषद किंवा मंत्रिमंडळाने- स्थानिक सरकारांना चीनच्या लोकसंख्येचे संकट दूर करण्यासाठी संसाधने निर्देशित करण्यास सांगितले आहे. तसेच “योग्य वयात” मूल जन्माला घालण्याचे महत्व पटवून देणे आणि विवाह संस्थेविषयी समाजात आदर निर्माण करण्याचे काम सोपवले आहे.
ड्रॅगन वर्षात वाढला जन्मदर
गेल्यावर्षी चीनमधील जन्मदरात काही अंशी वाढ पाहायला मिळाली होती, कारण पँडॅमिक नंतरचा थोडा काळ आणि 2024 हे ड्रॅगनचे चिनी राशीचे वर्ष होते. त्या वर्षी जन्मलेल्या मुलांना खूप मोठे भागय प्राप्त होते आणि ती अधिक महत्त्वाकांक्षी असतात, अशी धारणा आहे.
पण यावर्षात जन्मदर वाढूनही, देशाच्या एकूण लोकसंख्येत सलग तिसऱ्या वर्षी घट झाल्याचे दिसून आले.
गेल्या वर्षी 2.6 दशलक्षाहून अधिक जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केले होते, जे 2023 च्या तुलनेत 1.1 टक्क्यांनी जास्त आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)