काराकोरममधील भारतीय सीमेजवळ चीनचा लष्करी सराव

0
सराव

चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) नवीन वर्षाच्या सुरुवातीला काराकोरम पर्वतांमध्ये भारतीय सीमेजवळच्या उंच आणि थंड हवामानाच्या परिस्थितीत लढाई सज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त कवायती सुरू केल्या आहेत. या सरावात आधुनिक युद्ध क्षमतेवर लक्ष केंद्रित करणारी ड्रोन, रणगाडे आणि पायदळ लढाऊ वाहने आहेत.

चायना सेंट्रल टेलिव्हिजनने (सीसीटीव्ही) सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार, शिनजियांग लष्करी कमांडचे एक पथक अपरिचित उंचीच्या वातावरणात सामरिक हेरगिरीची कवायत करत आहे. या कवायतींमध्ये कामगिरीची परिणामकारकता तपासण्यासाठी विविध उपकरणांचा वापर करून टेहळणी, चिलखती आणि firepower units मधील एकत्रित प्रयत्नांचा समावेश असतो.

सुरू असलेल्या सरावादरम्यान, टेहळणी पथकाने त्वरित नियुक्त केलेल्या भागात हालचाली सुरू केल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर एक निरीक्षण चौकी स्थापन केली. त्याच वेळी, हवाई टेहळणी तुकड्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाळत ठेवण्यासाठी, परिस्थितीजन्य जागरूकता आणि परिचालन अचूकता वाढवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले.

सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये असे दिसून आले की कवायती जसजशा पुढे सरकत गेल्या तसतसे टेहळणी पथक आघाडीवर वेगाने पुढे सरकत गेले. रडार प्रणाली, ड्रोन आणि दुर्बिणीचा वापर करून, त्यांनी शत्रूच्या पुढील स्थानांचा सखोल शोध घेतला, ज्यामुळे त्यांची परिस्थितीजन्य जागरूकता आणि सामरिक अचूकता वाढली.

वार्षिक लष्करी सराव
या वर्षीच्या लष्करी कवायतींना अधिकृतपणे 2 जानेवारी रोजी सुरुवात झाली, ज्यात सैन्याने देशभरातील विविध भूभागांमध्ये-कोरड्या गोबी वाळवंट आणि किनारपट्टीच्या आघाडीपासून ते बर्फाच्छादित पठारे आणि घनदाट पर्वतीय जंगलांपर्यंत सराव केले.

गुरुवारी, पीएलए सदर्न थिएटर कमांडच्या विध्वंसक तुकडीने अधिक कसून कवायती सुरू केल्या.  सीसीटीव्हीच्या एका वृत्तानुसार, प्रगत विध्वंसक आणि युद्धनौकांची एक तुकडी उच्च-तीव्रतेच्या, लढाऊ-केंद्रित कवायतींची मालिका पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी रवाना झाली.

त्याच वेळी, हवाई दलाच्या विमानचालन ब्रिगेडने त्यांचे वर्षातील पहिले प्रशिक्षण उड्डाण आयोजित केले, ज्यात त्यांच्या कवायतींमध्ये हवाई सामरिक स्पर्धांचा समावेश होता. वैमानिकांनी वास्तववादी लढाऊ परिस्थितीमध्ये भाग घेतला, ज्यात हवाई लढाई संघर्ष, जवळची हवाई मदत आणि अनेक शाखांमध्ये हवाई-ते-जमिनीवरील हल्ल्याचा सराव यांचा समावेश आहे. सीसीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार युद्धभूमीच्या प्रत्यक्ष वातावरणाचा अनुभव येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या परिस्थितीत वैमानिकांचे लढाऊ कौशल्य सुधारण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले गेले आहे.

चिनी लष्करी विश्लेषकांच्या मते, नवीन वर्षाच्या या कवायती संयुक्त परिचालन प्रणालीच्या नवीन सुधारणांशी जोडल्या गेल्या आहेत. संयुक्त मोहिमांची परिणामकारकता वाढवण्यासाठी विविध लष्करी सेवा आणि शाखांमध्ये परस्परावलंबन मजबूत करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. अशाप्रकारच्या सरावामुळे पीएलए शत्रूच्या निर्णय प्रक्रियेला अडथळा आणणे आणि त्यांना गैरसोयीच्या स्थितीत ढकलणे हे उद्दिष्ट साध्य करत आहे, असे बातमीत म्हटले आहे.

टीम भारतशक्ती 


Spread the love
Previous articleRussia Ramps Up Operations Around Pokrovsk in Ukraine
Next articleNeed Private Sector To Boost Aerospace Production: IAF Chief

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here