Friday, March 13, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi सिटीबँकेच्या UAE मधील तर HSBC च्या कतारमधील शाखा तात्पुरत्या बंद

सिटीबँकेच्या UAE मधील तर HSBC च्या कतारमधील शाखा तात्पुरत्या बंद

0
UAE

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे या प्रदेशातील बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यास सुरुवात केली असतानाच, खबरदारीचा उपाय म्हणून 14 मार्चपर्यंत सिटीबँक (Citibank) आपल्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील बहुतांश शाखा आणि वित्तीय केंद्रे बंद ठेवणार असल्याचे बँकेच्या संकेतस्थळावर गुरुवारी नमूद करण्यात आले.

अमेरिका आणि इस्रायल यांचा इराणशी सुरू असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत 2 हजार लोकांचा बळी गेला असून,  जागतिक ऊर्जा बाजारपेठा आणि वाहतूक व्यवस्थेत प्रचंड अनागोंदी निर्माण झाली आहे. हा संघर्ष आता संपूर्ण पश्चिम आशियामध्ये पसरला असून, इराणकडून इस्रायल, अमेरिकेचे लष्करी तळ आणि आखाती देशांना लक्ष्य केले जात आहे.

अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित असलेल्या आखाती बँकिंग हितसंबंधांबाबत इराणने धमक्या दिल्यानंतर, बँकिंग क्षेत्रात वाढू लागलेल्या चिंतेचेच प्रतीक म्हणजे या अमेरिकन वित्तीय समूहाने उचललेले हे पाऊल आहे.

सिटी बँक पूर्णपणे रिमोट मॉडेलकडे वळली

मध्य दुबईतील मॉल ऑफ द एमिरेट्समधील सिटी बँकेची शाखा सध्यातरी सुरूच राहणार असल्याचे बँकेने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे. याशिवाय 16 मार्च रोजी सर्व प्रभावित शाखा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे.

सिटी बँकेने UAE मधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे रिमोट मॉडेलचा वापर करण्यास सुरूवात केली असून  ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवा देणे सुरू ठेवले असल्याचे बँकेच्या प्रवक्त्याने सांगितले.

सिटी बँकेने या आठवड्यात दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि दुबईच्या औद मेथा जिल्ह्यातील आपल्या वाखा कर्मचाऱ्यांना कार्यालये बंद करण्यास सांगितले असून, शाखा पुन्हा सुरू होईपर्यंत घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे.

सिटी बँकेने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे की युएईमध्ये त्यांची फोन बँकिंग सेवा सध्या मर्यादित क्षमतेने कार्यरत आहे आणि चेक क्लिअरिंगच्या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो.

“आमच्या तीन इमारती रिकामी करण्याचा आणि UAE मधील शाखा बंद करण्याचा निर्णय आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार घेण्यात आला आहे आणि तो आमच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे,” असे प्रवक्त्याने सांगितले.

कर्मचारी आणि ग्राहकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, HSBC या आणखी एका प्रमुख जागतिक बँकेनेही अशाच प्रकारच्या योजनेचा अवलंब केला असून, ग्राहकांसाठी जारी केलेल्या एका सूचनेनुसार, त्यांनी कतारमधील आपल्या सर्व शाखा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या आहेत.

या युद्धामुळे, ‘या क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह आर्थिक केंद्र’ म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवसायांना आकर्षित करण्याच्या दुबईच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे; परिणामी, भांडवलाचा बहिर्प्रवाह (capital flight), कर्मचारी कपात आणि कंपन्यांचे इतरत्र स्थलांतर यांविषयीच्या चिंता वाढल्या आहेत, असे वृत्त रॉयटर्सने गेल्याच आठवड्यात दिले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleइराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा यांचा पहिला संदेश‌ प्रसारित, अमेरिकेला दिला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here