ऑस्ट्रेलियाचे म्यानमारला यादवी युद्ध संपवण्याचे आवाहन

0
ऑस्ट्रेलियाचे
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन 27 जुलै, 2024 रोजी लाओसच्या वियनतियान येथील नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे 57 व्या आशियाई परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना (रॉयटर्स)

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी म्यानमारच्या लष्करी शासकांना तीव्र होत चाललेले गृहयुद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे. विविध देशांचे मंत्री आणि वरिष्ठ मुत्सद्दी लाओसमध्ये जमले असताना ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असे वक्तव्य करत म्यानमारला मोठा धक्का दिला आहे.

लाओटियन राजधानी वियनतियान येथे होणाऱ्या दोन शिखर परिषदांमध्ये ते जागतिक समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने विचारांची देवाणघेवाण करणार आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचा संदेश

पेनी वोंग म्हणाले की, 2021साली सैन्याने सत्ता काबीज केल्यापासून म्यानमारमधील संघर्षाबद्दल ऑस्ट्रेलियाला तीव्र चिंता आहे.

असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्सच्या (आसियान) शांतता योजनेचे पालन करण्यासाठी त्यांनी त्यांची वचनबद्धता कायम ठेवण्याचे आवाहन केले.
वोंग म्हणाले, “या संघर्षामुळे देशात निर्माण झालेली अस्थिरता, असुरक्षितता, मृत्यू, वेदना आम्ही पाहत आहोत.”

ते म्हणाले, “मूलभूतपणे, ऑस्ट्रेलियाकडून म्यानमारच्या सध्याच्या शासनाला माझा संदेश आहे की, हे तुमच्यासाठी किंवा तुमच्या लोकांच्या दृष्टीने फार काळ टिकणारे नाही.”

रशिया, अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन आणि इतर देश या  शिखर परिषदेला उपस्थित आहेत.

ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया त्यांना वेगळा मार्ग अवलंबण्याचे आणि पाच कलमी कार्यक्रमाबद्दल एकमत कसे होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करेल.

गृहयुद्ध

हे गृहयुद्ध म्यानमारचे सैन्य आणि वांशिक अल्पसंख्याक बंडखोर गटांमध्ये झालेली युती आणि सशस्त्र प्रतिकार चळवळी यामुळे सुरू झाले आहे.

दरम्यान, या युद्धात 5 हजार 400हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले असून म्यानमारमध्ये किमान 30 लाख लोक विस्थापित झाले आहेत.

याशिवाय म्यानमारच्या गृहयुद्धामुळे शाळांवरील विध्वंसक हल्ल्यांमध्ये तीव्र वाढ झाली आहे.

जुंटा :  अटक आणि टीका

असिस्टन्स असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्सच्या म्हणण्यानुसार, लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्यापासून 27 हजारांहून अधिक लोकांना अटक केली आहे.

नागरी भागांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांसाठी अत्याचार आणि अत्याधिक बळाचा वापर केल्याबद्दल जुंटाला जागतिक निषेधाला सामोरे जावे लागले आहे.

पाश्चिमात्य देशांनी चुकीची माहिती पसरवली असल्याचे सांगत जुंटाने हे सर्व आरोप फेटाळले आहे.

लष्करप्रणित शासनाने आसियान प्रोत्साहित शांतता प्रयत्नांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले आहे.

म्यानमार सदस्य असलेल्या 10 सदस्यांच्या गटाने सर्व बाजूंनी म्यानमारशी संवाद साधण्यास नकार दिल्याने म्यानमारच्या सरकारची कोंडी झाली आहे.

धोकादायक कृतींबाबत चिंता

शनिवारी पहाटे लाओसमध्ये पोहोचलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन म्यानमारच्या गृहयुद्धाच्या मुद्द्यावर भाष्य करतील अशी अपेक्षा आहे.

ते आशियाई देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांना भेटतील तसेच चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

अमेरिकेची टीका

एका निवेदनानुसार, ब्लिंकन साऊथ चायना सी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार करतील.

फिलिपिन्सच्या जहाजांवर चीनच्या तटरक्षक दलाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबाबत अमेरिकेने टीका केली आहे.

फिलिपिन्स आणि चीन यांच्यातील संघर्ष

फिलिपिन्स आणि चीन यांच्यात गेल्या वर्षी समुद्रात आणि वक्तृत्वपूर्ण पद्धतीने झालेला संघर्ष सातत्याने बघायला मिळाला.

चीनच्या मुख्य भूभागापासून दूर असलेल्या मनिलाच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (ईईझेड) दोन वादग्रस्त उथळ पाणलोटांजवळ घडलेल्या घटनांमुळे हे संघर्ष झाले.
यामुळे जलप्रदेशातील वाढत्या दादागिरीबद्दल या भागात चिंता निर्माण झाली आहे. या जलमार्गाद्वारे सुमारे 3 ट्रिलियन डॉलर्सचा वार्षिक व्यापार होतो.

फिलिपिन्स आणि चीन यांच्यातील करार

मनिलाच्या जहाजांना नौदलाच्या जहाजावर तैनात असलेल्या सैनिकांपर्यंत पोहोचण्याची परवानगी देण्यासाठी चीनशी आपला करार झाल्याचे फिलीपिन्सने यापूर्वीच सांगितले आहे.

याशिवाय असे म्हटले आहे की, त्यांनी शनिवारी शोल  कर्मचाऱ्यांची अदलाबदली करणे आणि रसद पुरवठा मोहीम कोणत्याही व्यत्ययाविना पूर्ण केली.
त्यावेळी कोणत्याही “अनुचित घटना” घडल्या नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली चिंता

साऊथ चायना सीमधील ईईझेड सुरक्षित असले पाहिजेत, आंतरराष्ट्रीय जलमार्ग सुलभ असले पाहिजेत आणि तणाव कमी झाला पाहिजे यावर वोंग यांनी भर दिला.
ते म्हणाले की, अस्थिर, धोकादायक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असलेल्या कोणत्याही कृतीबद्दल ऑस्ट्रेलियाला खूप चिंता वाटते.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous article80% Success: The S400 Air Defence System’s Strategic Edge
Next articleJoint Communique Of The 57 ASEAN Foreign Ministers’ Meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here