गोमावरील कब्जानंतर काँगोचे M23 बंडखोर दक्षिणेकडे सरकले

0
M23
29 जानेवारी 2025 रोजी रवांडाच्या रुबावू जिल्ह्यातील गिसेनी येथील सीमावर्ती भागात, काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या (FARDC) M23 सशस्त्र दलांमधील संघर्षादरम्यान रवांडा संरक्षण दलाचा (RDF) एक सैनिक ग्रँड बॅरियर सीमेवर उभा आहे. (रॉयटर्स/थॉमस मुकोया)

गोमा शहर ताब्यात घेतल्यानंतर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमधील रवांडाचे समर्थन असलेले M23 बंडखोरांनी बुधवारी दक्षिण किवू प्रांताची राजधानी बुकावूकडे आपला मोर्चा वळवला आणि देशाच्या पूर्वेकडील त्यांच्या नियंत्रण क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

किवू तलावाच्या पश्चिमेकडील मिनोवा शहरातून M23 सैन्य दक्षिणेकडे पुढे सरकत होते, असे पाच राजनैतिक आणि सुरक्षा सूत्रांनी सांगितले, ज्यापैकी एक बंडखोरांच्या थेट संपर्कात होता.

प्रादेशिक विस्तारासाठी प्रयत्नशील

20 वर्षांपूर्वी काँगोमध्ये झालेल्या मोठ्या युद्धातही  पूर्वीच्या बंडखोरांनी दक्षिणेकडील भागावर ताबा मिळवला नव्हता. त्यामुळे आता M23 गटाने दक्षिणेकडील भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेला कोणताही यशस्वी प्रयत्न, हा आजपर्यंत ताब्यात न घेतलेल्या प्रदेशावर बंडखोरांचे नियंत्रण असल्याचे दर्शवणारा असेल.

बुकावूला पोहोचण्यासाठी, त्यांना कावुमु ताब्यात घ्यावे लागेल, जिथे शहराचा विमानतळ आहे आणि काँगोच्या मजबूत संरक्षणासाठी तैनात केलेल्या बुरुंडी सैन्यावर मात करावी लागेल.

M23 ने उत्तर किवूची राजधानी गोमा आणि विस्थापित लोक, मदत कर्मचारी, संयुक्त राष्ट्रांचे शांतिरक्षक आणि काँगोच्या सैन्याचे केंद्र यावर आपली पकड मजबूत केल्यामुळे बुकावूमधील त्यांची प्रगती लक्षणीय आहे.

उत्तर किवू आणि दक्षिण किवू या दोन्ही प्रांतांमध्ये असंख्य खनिज खाणी आहेत आणि काँगोच्या मुबलक संसाधनांवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा संघर्ष हा या विशाल देशाच्या पूर्वेकडील संघर्षाच्या कारणांपैकी एक आहे. यामध्ये कोल्टनचा समावेश आहे, जे स्मार्टफोनमध्ये वापरले जाते.

अमेरिकेने रवांडाला M23 बंडखोरांच्या हाती गोमा पडल्यामुळे ‘अत्यंत अस्वस्थ’ असल्याचे सांगितले आहे. सध्या तिथे मुत्सद्दी कारवायांचा भडका उडाला असला तरी, बंडखोरांनी शहराचा ताबा घेतल्याची चिन्हे वाढतच गेली आहेत.

20 लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या काही दूरच्या जिल्ह्यांमध्ये तुरळक गोळीबार झाला, जिथे सोमवारी बंडखोरांनी रस्त्यावर मृतदेह फेकले आहेत, रुग्णालये जखमींनी भरली आहेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षकांनी आपापल्या तळांवर आश्रय घेतला आहे.

बुधवारी काँगोचे सरकारी सैन्य शहराच्या मध्यभागी कुठेही दिसले नाही आणि रॉयटर्सच्या एका पत्रकाराने M23 लढाऊ सैनिकांना रवांडाच्या सीमेवर गस्त घालताना आणि पादचारी तसेच वाहनांचा मार्ग रोखणाऱ्या साखळ्या आणि कुलुपे कापताना पाहिले.

“असे वाटते की आपण दोन देशांमध्ये आहोत. आम्ही काँगोमध्ये आहोत आणि त्याच वेळी रवांडामध्ये आहोत,” असे गोमाच्या एका उच्चभ्रू भागातील रहिवाशाने सांगितले.

भाडोत्री सैन्याची माघार

गोमा आणि त्याचे रवांडातील जुळे शहर गिसेनी यांच्यातील सीमा ओलांडताना, रॉयटर्सच्या पत्रकारांनी डझनभर पुरुष, त्यातले काही थकलेले, रवांडाच्या बाजूला येताना आणि पोलिस स्निफर कुत्र्यांद्वारे त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी रांगेत उभे असल्याचे पाहिले. त्यांनी रवांडाच्या अधिकाऱ्यांना शारीरिक तपासणीसाठी करण्याची परवानगीदेखील दिली.

संयुक्त राष्ट्रांच्या सूत्रांनी आणि रवांडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते काँगो सरकारचे भाडोत्री सैनिक होते. त्यातील अनेकांकडे रोमानियन पासपोर्ट होते. एका व्यक्तीने रॉयटर्सला सांगितले की तो रोमानियन आहे आणि सुमारे दोन वर्षे गोमा येथे होता.

तपासणी पूर्ण झाल्यावर हे सैनिक गाडीत चढले आणि तिथून शक्य तितक्या वेगाने पळून गेले.

गेल्या दोन वर्षांत रवांडाच्या पाठिंब्यावर बंडखोरांनी तिथे कब्जा केल्यानंतर, काँगो सरकार संरक्षण वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी खाजगी लष्करी कंपन्यांकडे वळले, परंतु सोमवारी M23 ने गोमा येथे कब्जा केला तेव्हा भाडोत्री सैनिकांनी फारसा प्रतिकार केला नाही.

30 वर्षांपूर्वी रवांडामध्ये झालेल्या नरसंहारानंतर, जेव्हा अतिरेकी हुतुसांनी तुत्सी आणि उदारमतवादी हुतुस यांची हत्या केली आणि नंतर कागामे यांच्या नेतृत्वाखाली तुत्सी सैन्याने त्यांचा पाडाव केला, तेव्हापासून कांगोला हादरवून टाकणारे M23 हे नवीन वांशिक तुत्सी नेतृत्वाखालील, रवांडा समर्थित बंडखोर आहेत.

रवांडाचे म्हणणे आहे की हद्दपार केलेल्या काही गुन्हेगारांनी नरसंहारापासून काँगोमध्ये आश्रय घेतला आहे, ज्यामुळे काँगोच्या तुत्सी आणि रवांडासाठीच धोका निर्माण झाला आहे. काँगोने रवांडाचे अरोप फेटाळले आणि म्हटले की रवांडाने फायदेशीर खनिज लुटण्यासाठी त्याच्या गुप्त सैन्याचा वापर केला आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleKim Calls For Strengthening Nuclear Forces Of North Korea
Next articleअमेरिका इस्रायलमधून Patriot Missiles युक्रेनमध्ये स्थलांतरित करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here