चीनची तिबेटमधील दडपशाही वाढली; दलाई लामा यांचे फोटो केले जप्त

0
दलाई लामा

चिनी अधिकाऱ्यांनी, तिबेटच्या अनेक प्रदेशांमध्ये धार्मिक श्रद्धा किंवा मान्यतांविरोधात नवीन दडपशाही मोहीम सुरू केली आहे. ज्याअंतर्गत, त्यांनी तिबेटचे निर्वासित अध्यात्मिक नेते ‘दलाई लामा’ यांचे फोटो जप्त केले केले, तसेच ‘बेकायदेशीर धार्मिक विधी’ केल्याच्या आरोपाखाली काही भिक्षूंना ताब्यात घेतले आहे.

स्थानिक वृत्तानुसार, ऑक्टोबरच्या मध्यापासून शिगात्सेमधील तशी ल्हन्पो मठात आणि जवळपासच्या गावांमध्ये चीनच्या सुरक्षा दलांनी छापे टाकले. या कारवाईत, त्यांनी भिक्षू राहत असलेल्या खोल्यांमध्ये आणि खाजगी घरांमध्ये प्रवेश करून, दलाई लामा यांचे फोटो जप्त केले.

अधिकाऱ्यांनी तिबेटियन रहिवाशांना इशारा दिला आहे की, ‘दलाई लामांचे फोटो प्रदर्शित करणे हा एक गंभीर राजकीय गुन्हा आहे.’ तसेच त्यांची पूजा करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कारवाईदरम्यान, कोणतीही मोठी हिंसा झाल्याचे वृत्त समोर आले नसले तरी, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण घरांमध्ये आणि लहान मठांमध्ये शोधमोहीम अजून सुरू आहे.

याच कारवाईचा आणखी एक भाग म्हणून, बिजिंगने नियुक्ती केलेल्या ‘पंचेन लामा’, ज्यांचे मूळ नाव ग्याल्त्सेन नोरबू आहे, त्यांच्या ‘कालचक्र दीक्षा समारंभाला’ तिबेटमधील भिक्षू आणि नन्सना सक्तीने हजर राहावे लागले. अनेक तिबेटी लोक पंचेन लामांना सच्चा धार्मिक नेता मानत नाहीत. तरीही, या कार्यक्रमाला हजर राहणे बंधनकारक होते आणि सगळे लोक हजर आहेत का हे पाहण्यासाठी सरकारी अधिकारी तिथे पहारा देत करत होते.

याशिवाय पूर्व तिबेटमध्ये, एका नियोजित जलविद्युत प्रकल्पाला विरोध करणाऱ्या अनेक भिक्षूंना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना कथितरित्या छळ करण्यात आल्या. प्रकल्पातील धरणाच्या बांधकामामुळे, मठ आणि पवित्र स्थळे पाण्यात बुडण्याचा धोका असल्याकारणाने, भिक्षूंचा त्याला विरोध होता.

एकंदरीत, या सर्व घटना तिबेटमधील धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्यावरील, चीनी सरकारचे नियंत्रण अधिक कठोर करत आहेत, ज्यामुळे तिबेटी बौद्ध धर्माला कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीच्या चौकटीत आणण्याच्या बीजिंगच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.

– अनुकृती

+ posts
Previous articleIndia-China Border In Sikkim Won’t be Easy To Resolve
Next articleHTT-40 Series Production Trainer Aircraft Takes Maiden Flight

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here