Raksha Mantri Shri @rajnathsingh has taken a significant step in enhancing India’s border infrastructure by virtually dedicating 75 Border Roads Organisation (BRO) projects worth Rs 2,236 crore to the nation. These projects, spread across 11 states and union territories, will not… pic.twitter.com/zoNCDw8hWU
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) October 12, 2024
सिंह यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पांचा उल्लेख सीमेवरील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या आणि या भागांची सामाजिक-आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या अविचल संकल्पाचा पुरावा म्हणून केला. ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पांमुळे देशाच्या संरक्षण सज्जतेत लक्षणीय वाढ होईल.
या 75 प्रकल्पांच्या उद्घाटनासह, बीआरओने 2024 मध्ये एकूण 3 हजार 751 कोटी रुपये खर्चून 111 पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले. यामध्ये अरुणाचल प्रदेशातील अत्याधुनिक सेला बोगद्यासारख्या 1 हजार 508 कोटी रुपयांच्या 36 प्रकल्पांचा समावेश आहे, ज्याचे उद्घाटन पंतप्रधानांनी या वर्षाच्या सुरुवातीला केले होते. गेल्या वर्षी, बीआरओचे 3 हजार 611 कोटी रुपये खर्चून तयार केलेले 125 पायाभूत सुविधा प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले होते.
सत्तेवर आल्यापासून सीमेवरील पायाभूत सुविधांचा विकास हे सरकारचे प्राधान्य क्षेत्र राहिले आहे यावर त्यांनी भर दिला. हे प्रदेश, विशेषतः ईशान्येकडील प्रदेश, सामाजिक-आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. “गेल्या दशकात, आम्ही गावांपासून शहरांपर्यंत रस्त्यांचे विशाल जाळे तयार केले आहे, ज्याचा परिणाम देशाच्या अभूतपूर्व प्रगतीमध्ये झाला आहे,” असे ते म्हणाले.
टीम भारतशक्ती