देशाचे संरक्षण उत्पादन 1लाख 26 हजार 887 कोटी रूपयांच्या विक्रमी मूल्यावर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या संरक्षण उत्पादनाच्या तुलनेत 16.7 टक्क्यांपेक्षा अधिक अशी ही वाढ आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या संरक्षण उत्पादनात आतापर्यंतच्या सर्वोच्च वाढीची नोंद झाली आहे. आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सरकारची धोरणे आणि उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी तसेच लक्ष्य साध्य करण्यावर दिलेला भर यामुळे संरक्षण मंत्रालयाने हे यश मिळवले आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व संरक्षण कंपन्या (डीपीएसयु), संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या इतर सार्वजनिक कंपन्या (पीएसयु) आणि खाजगी कंपन्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील संरक्षण उत्पादन 1 लाख 26 हजार 887 कोटी रूपयांच्या विक्रमी मूल्यावर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या संरक्षण उत्पादनाच्या तुलनेत 16.7 टक्क्यापेक्षा अधिक अशी ही वाढ आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये संरक्षण उत्पादनाचे मूल्य 1 लाख 08 हजार 684 कोटी रुपये होते.
एक्स या समाजमाध्यमावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम वर्षानुवर्षे मैलाचे दगड पार करत आहे, असे त्यांनी सांगितले. भारताचा जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकास करण्याच्या सरकारच्या अटल संकल्पाचा त्यांनी उल्लेख केला.
The Make in India programme is crossing new milestones, year after year, under the leadership of PM Shri @narendramodi.
India has registered the highest ever growth in the value of defence production in 2023-24. The value of production has reached to Rs. 1,26,887 crore in…
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 5, 2024
2023-24 मध्ये एकूण उत्पादन मूल्यापैकी डीपीएसयु /इतर पीएसयुचे सुमारे 79.2% आणि खाजगी क्षेत्राचे 20.08 टक्के योगदान आहे. सार्वजनिक आणि खाजगी अशा दोनही क्षेत्रांनी संरक्षण उत्पादनात स्थिर वाढ नोंदवली आहे, असे या आकडेवारीवरून दिसते. त्याबद्दल राजनाथ सिंह यांनी दोनही क्षेत्रातल्या संरक्षण कंपन्यांचे अभिनंदन केले. संरक्षण मंत्र्यांनी डीपीएसयु, संरक्षण वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या इतर सार्वजनिक उपक्रमांसह उद्योग आणि खाजगी क्षेत्राच्या या उल्लेखनीय वाढीतील योगदानाची प्रशंसा केली, ज्यामुळे संरक्षण उत्पादन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहे.
आत्मनिर्भरतेवर भर देऊन सरकारने गेल्या 10 वर्षात धोरणात्मक सुधारणा/उपक्रम आणि व्यवसाय सुलभता आणल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांचा सातत्याने पाठपुरावा केला गेला आहे. त्यामुळे आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पादन मूल्य मिळाले आहे. वाढत्या संरक्षण निर्यातीमुळे देशी बनावटीच्या संरक्षण उत्पादनाच्या एकूण वाढीस मोठा हातभार लागला आहे.
एका निवेदनात नमूद केले आहे की, “स्वदेशीकरणाच्या आक्रमक आणि शाश्वत प्रयत्नांमुळे उत्पादनाचे मूल्य (व्हीओपी) आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे.”
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 21 हजार 083 कोटी रुपयांची विक्रमी संरक्षण निर्यात झाली. त्यात गेल्या आर्थिक वर्षात 15 हजार 920 कोटी रुपयांची निर्यात झाली होती. त्या तुलनेत निर्यातीत 32.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत (2019-20 पासून) संरक्षण उत्पादन सातत्याने वाढत आहे. ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. वर्षनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहेतः
स्रोत – संरक्षण मंत्रालय
टीम भारतशक्ती