पाकिस्तानचा धोका हाताबाहेर जाऊ देणे शहाणपणाचे नाही- रॉचे माजी अधिकारी

0
माजी
या आठवड्याच्या सुरुवातीला दिल्ली हादरवून सोडवणाऱ्या स्फोटामागील कट उघड करण्यासाठी तपास अधिकारी एकेका मुद्द्याचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न प्रयत्न करत असताना, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मद याचा या स्फोटाशी स्पष्ट संबंध असल्याचे दिसते. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती मर्यादित आहे, परंतु त्यातूनही जैशचा संबंध असल्याचे बाह्य आयाम दर्शवितो, असे संशोधन आणि विश्लेषण विभागाचे (रॉ) माजी विशेष सचिव रामनाथन कुमार म्हणतात.

“जसजसा काळ पुढे जाईल तसतसे अधिक पुरावे समोर येतील, परंतु मला वाटते की पाकिस्तानला असेण सोडणे देखील शहाणपणाचे नाही,” असे कुमार यांनी स्ट्रॅटन्यूज ग्लोबलचे मुख्य संपादक नितीन ए. गोखले यांना सांगितले. त्यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले-जर या स्फोटासाठी बाह्य प्रायोजकत्व असेल तर ते किती प्रमाणात आहे? ते बाह्यरित्या प्रेरित होते का, बाह्यरित्या मार्गदर्शित होते का, बाह्यरित्या कार्यान्वित होते का आणि पाकिस्तानमधून ही परिस्थिती हाताळणाऱ्यांचे नियंत्रण किती होते?

दिल्लीच्या स्फोटाच्या वेळी, काही ‘व्हाईट कॉलर’ लोकांना नेमके सांगायचे तर डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. याशिवाय  राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवर असलेल्या फरिदाबादमध्ये स्फोटक सामग्रीचा साठा जप्त करण्यात आला होता. हे सर्व काश्मीरमध्ये जैशची भित्तीचित्रे समोर आल्यानंतर सुरू झालेल्या तपासाचा परिणाम आहे. तपासाचा हा मार्ग सहारनपूरमधील एका डॉक्टरकडे आणि नंतर फरिदाबाद जिल्ह्यातील एका रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचला. स्फोटकांनी भरलेली गाडी जुन्या दिल्लीला नेणारी व्यक्ती काश्मीर खोऱ्यातील डॉक्टर होता.

गुप्तचर यंत्रणेचे अपयश?

गुप्तचर यंत्रणेची माहिती आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्येही अनेकदा पेला अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे ठरवण्याचा प्रश्न असतो, असे कुमार म्हणतात. ते अशा हल्ल्यांची तुलना गोलरक्षकाने विरोधी संघाला गोल करण्याची मुभा देण्याशी करतात. इतरवेळी अनेकदा असे हल्ले परतवून लावले गेले असतील, जे एकतर गृहीत धरले जातात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष दिले जात नाही.

“दिल्ली हल्ला होण्यापूर्वीच याच्याशी संबंधित इतर माहिती मिळाली होती, काही लोकांना ताब्यात घेण्यात आले होते, स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. ते यशच आहे पण हल्ला झाला आणि लोक मारले गेले ही वस्तुस्थिती अपयशासाठी कारणीभूत ठरली आहे. बऱ्याचदा या व्यवसायात अपयश आणि यश हातात हात घालून जातात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

तपास सुरू आहे

ज्या परिस्थितीत व्यक्ती किंवा समुदायांना तीव्र दुःख होते अशा परिस्थितीत दहशतवादाची भरभराट होते, असे निरीक्षण कुमार यांनी मांडले. अर्थात दहशतवादाला अनुकूल परिस्थिती अस्तित्वात राहणार नाही याची खातरजमा करण्यासाठी भारत सरकार चांगले काम करेल. 1980 च्या दशकात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असलेले बी. के. नेहरू यांनी तत्कालीन केंद्र सरकारला पत्र लिहून फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला बरखास्त न करण्याचा इशारा दिला होता.

“जर सरकार बरखास्त झाले तर काश्मिरी मुस्लिमांना मुख्य प्रवाहात संथ गतीने का होईना पण एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना धक्का बसेल. फुटीरतावादी वरचष्मा गाजवतील आणि त्यांना बळजबरीने दडपून टाकणे हा उपाय नाही “, असे राज्यपालांनी लिहिले होते.

काश्मिरी मुस्लिमांचे भारतीय मुख्य प्रवाहात संथपणे एकत्रीकरण करण्याचे काम अजूनही सुरूच आहे, असेही कुमार म्हणतात.

नितीन अ. गोखले

+ posts
Previous articleTripathi’s US Visit Yields Push for Expanded Joint Operations and Emerging-Tech Collaboration
Next articleIndia–France Strategic Air Exercise ‘Garuda 25’ Begin at Mont-de-Marsan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here