डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन शुक्रवारी मध्य कोपनहेगनमध्ये फेरफटका मारत असताना एका माणसाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्वरित त्यांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेत त्यांना कितपत दुखापत झाली हे लगेच समजू शकले नसल्याचे एका स्थानिक रहिवाशाने रॉयटर्सला सांगितले.
“पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांना शुक्रवारी संध्याकाळी कोपनहेगनमधील कल्टोरवेट येथे एका व्यक्तीने मारहाण केली. या व्यक्तीला नंतर अटक करण्यात आली. या घटनेमुळे पंतप्रधानांना धक्का बसला आहे,” असे त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
The Prime Minister of Denmark, Mette Frederiksen was reportedly Struck earlier by a Man while Walking around near Kultorvet Square in the Capital City of Copenhagen. The Prime Minister was Shocked but Unharmed, with the Man who Struck her having been Arrested by Police. pic.twitter.com/Z95cHWYTC4
— OSINTdefender (@sentdefender) June 7, 2024
पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की त्यांनी एका व्यक्तीला अटक केली आहे आणि घटनेचा पुढील तपास करत आहेत.
“त्या थोड्या तणावग्रस्त दिसत होत्या”, चौकातील कॉफी शॉपमध्ये काम करणाऱ्या सोरेन केजरगार्डने रॉयटर्सला सांगितले. या हल्ल्यानंतर पंतप्रधानांना सुरक्षारक्षकांनी सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असल्याचेही आपण पाहिले असल्याचे सोरेनने सांगितले.
डेन्स युरोपियन युनियन निवडणुकीतील मतदानाच्या दोन दिवस आधी हा हल्ला झाला आहे.
“मेट यांना या हल्ल्याने साहजिकच धक्का बसला आहे. मला असे म्हणायचे आहे की त्यांच्याजवळच्या आपल्या सर्वांनाच याचा मोठा धक्का बसला आहे,” डॅनिश पर्यावरण मंत्री मॅग्नस ह्युनिके यांनी एक्स वर सांगितले.
गेल्या काही आठवड्यांत अनेक युरोपीय नेत्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.
तीन आठवड्यांपूर्वी बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या हत्येच्या प्रयत्नातून स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको बरे होत आहेत, जर्मनीमध्ये प्रचार करत असताना युरोपियन संसदेचे सोशल डेमोक्रॅट सदस्य मॅथियास एके यांच्यावर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली.
तर मंगळवारी, मॅनहाइममध्ये बॉक्स कटर चालवणाऱ्या एका संशयिताने अत्यंत उजव्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाच्या एका राजकारण्याला भोसकले.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)