
सोमवारी हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट (HUD) विभागातील कर्मचारी कामावर जात असताना, त्यांना एक असामान्य दृश्य पाहायला मिळाले. ऑफिसमधील टेलिव्हिजनवर एक व्हिडिओ प्रसारित होत होता, ज्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बिलियनेयर एलोन मस्क यांच्या पायाचे चुंबन घेत होते आणि त्यावर “खरा राजा दीर्घायुषी होवो” असे कॅप्शन झळकत होते.
याच काल्पनिक ‘गव्हर्नमेंट एफिशियन्सी डिपार्टमेंट’ (Doge) चे नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांना दाखवले गेले होते.
हे अनपेक्षित दृश्य पाहून कर्मचारी आश्चर्यचकित झाले.
व्हिडिओ कसा समोर आला?
Vox च्या पत्रकार राचेल कोहेन, यांनी सोमवारी HUD च्या मुख्यालयात प्रसारित झालेल्या १९-सेकंदाच्या या क्लिपविषयी पहिले वृत्तांकन केले.
‘हे फुटेज, जे मूळत: Anthony Lamesa नावाच्या एका X युजरने शेअर केले होते, ते रॉबर्ट C. वेव्हर फेडरल बिल्डिंगमध्ये पाच मिनिटांपर्यंत लूपमध्ये चालवले गेले, ज्यात कॅफेटेरिया सारख्या वर्दळीच्या ठिकाणांचाही समावेश होता,’ असे पत्रकार मारिया काबास यांनी सांगितले.
एका अज्ञात HUD कर्मचाऱ्याने Wired वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘फेडरलच्या कर्मचार्यांना प्रत्येक टेलिव्हिजन हा स्वत: जाऊन बंद करावा लागला, ज्यामुळे या व्हिडिओचे प्रसारण थांबवणे शक्य झाले.’
व्हिडिओ मागील सत्य
या व्हिडिओसाठी नेमकं कोण जबाबदार आहे हे जरी अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या साहाय्याने तयार केला आहे.
प्रतिक्रिया आणि परिणाम
HUD च्या प्रवक्त्या- कासी लोव्हेट यांनी या कृतीचे वर्णन, ‘करदात्यांच्या डॉलर आणि संसाधनांचा अपव्यय’ असे केले आणि सांगितले की, ‘संबंधित व्यक्तींविरोधात लवकरच योग्य कारवाई केली जाईल.’
दरम्यान, व्हाइट हाऊस किंवा मस्क यांनी या प्रकरणावर अद्याप काहीही भाष्य केले नाही.
परंतु, डेमोक्रॅट्सने नियंत्रित केलेल्या यू.एस. हाऊस कमिटी ऑन फायनांशियल सर्व्हिसेसने, या घटनेची ऑनलाइन खिल्ली उडवत लिहीले की, “सर्व हिरो कॅप घालत नाहीत…” यावर HUD सचिव स्कॉट टर्नर यांच्या टीमने, या प्रतिक्रियेचा निषेध म्हणून उत्तर दिले की,”करदात्यांच्या संसाधनांचा दुरुपयोग करणे ही देखील हिरोगीरी नाही.”
विशेष म्हणजे, ट्रम्प मस्क यांच्या पायाचे चुंबन घेतानाचा, अशा प्रकारचा AI-निर्मित कॉन्टेन्ट, गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावर फिरत आहे. मस्क यांना त्यापैकी कोणत्याही गोष्टीवर अजूपर्यंत सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाही.
ट्रम्प-मस्क ब्रोमन्स
दुसरीकडे, ट्रम्प आणि मस्क यांच्या परस्पर हितसंबंधांची चौकशी केली जात आहे, कारण टेस्ला CEO ने ट्रम्प यांच्या 2024 च्या मोहिमेसाठी वित्तपुरवठा केला होता आणि DOGE या तथाकथित अनौपचारिक सल्लागार गटाद्वारे व्हाइट हाऊसमध्ये प्रभाव मिळवला होता.
टीम स्ट्रॅटन्यूज