राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले की, “यु.एस. मेक्सिकन आयातींवर लागू केलेले भरमसाट कर 2 एप्रिलपर्यंत स्थगित करत आहे.” मेक्सिकचे अध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
ही घोषणा कॅनडा सोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
ट्रम्प यांनी सांगितले की, “अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा यांच्यातील करारांतर्गत, मेक्सिकोच्या आयात उत्पादनांवर सध्या नवीन कर लागू केले जाणार नाहीत.”
“हा करार २ एप्रिलपर्यंत असेल मात्र त्यानंतर कॅनेडियन आणि मेक्सिकन उत्पादनांवर परस्पर कर लागू होऊ शकतात,” असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, या कराराबद्दल म्हटले की: “मी हा निर्णय मेक्सिकोचे अध्यक्ष शिनबॉम यांचा आदर ठेवत घेतला आहे. आमचे संबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही सीमा सुरक्षा प्रश्नासंदर्भात एकत्र काम देखील करत आहोत. यूएसमध्ये परदेशी लोकांचा बेकायदेशीर प्रवेश थांबविणे आणि फेंटनल रोखणे, या दोन्ही उद्देशातून हा सामायिक निर्णय घेण्यात आला आहे.”
त्यांचे हे वक्तव्य, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी झालेल्या त्यांच्या चर्चेनंतरच्या प्रतिक्रियेच्या एकदम विरुद्ध आहे, ज्यात त्यांनी “सत्तेत राहण्यासाठी” वादाचा वापर केल्याचा आरोप केला होता.
कॅनडाच्या पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, यांनी मंगळवारी यूएसच्या उत्पादनांवर 25% टॅरिफ्स लागू केले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाच्या आयातीवरील व्यापक टॅरिफ्स विरोधात लढण्याची शपथ घेतली. याला “व्यापारी युद्ध” असे संबोधत त्यांनी सांगितले की, “हे सर्वात आधी अमेरिकन कुटुंबांना हानी पोहचवेल.”
ट्रूडो यांनी म्हटले की, “कॅनडियन नागरिक ‘समंजस’ आणि ‘विनम्र’ आहेत, पण जेव्हा देशाचे हित धोक्यात येते, तेव्हा ते लढाईपासून मागे हटणार नाहीत.
पार्लियामेंट हिलवर बोलताना, ट्रूडो यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका करत म्हटले की, “भरमसाट टॅरिफ्स लागू करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.”
त्यांनी व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत काम करण्यामागील तर्कावरही प्रश्न उपस्थित केले होते, ज्यांना ट्रूडो यांनी “खूनी आणि हुकूमशहा” म्हटले होते, तर कॅनडा, जो त्यांचा जवळचा मित्र आहे, त्याच्यावरही कर लादण्यात आला होता.
“आज युनायटेड स्टेट्सने त्याचा सर्वात जवळचा व्यापार सहयोगी आणि मित्र असलेल्या कॅनडासोबत, ‘व्यापार युद्ध’ सुरू केले आहे,” ट्रूडो यांनी म्हटले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुटसह)