लडाखमधील उर्वरित संघर्षाच्या ठिकाणांहून पूर्णपणे माघार घेण्याचे प्रयत्न दुप्पट करणे आणि त्यासाठी तातडीने काम करण्यावर भारत आणि चीनने गुरुवारी सहमती दर्शवली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी उभय देशांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या सीमाप्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यावर लक्ष केंद्रित करून रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बैठकीदरम्यान, डोवाल यांनी वांग यांना सांगितले की, सीमावर्ती भागात शांतता आणि स्थिरता येणे गरजेचे असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा (एलएसी) आदर करणे, हे द्विपक्षीय संबंध सामान्य होण्यासाठी आवश्यक आहे.
ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेच्या निमित्ताने रशियातील एका शहरात डोवाल-वांग यांच्यात बैठक झाली.
ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेच्या निमित्ताने रशियातील एका शहरात डोवाल-वांग यांच्यात बैठक झाली.
परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले की, डोवाल आणि वांग यांच्यातील बैठकीने प्रलंबित समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याच्या उद्देशाने नुकत्याच हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्याची संधी दिली.
या बैठकीत दोन्ही बाजूंना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याच्या अलीकडील प्रयत्नांचा आढावा घेण्याची संधी मिळाली, ज्यामुळे द्विपक्षीय संबंध स्थिर करणे आणि पुनर्प्रस्थापित करण्याजोगी परिस्थिती निर्माण होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
“दोन्ही बाजूंनी तातडीने काम करण्यास आणि उर्वरित भागातून पूर्णपणे माघार घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना दुप्पट करण्यास सहमती दर्शविली,” असे निवेदनात म्हटले आहे.
या बैठकीत डोवाल यांनी सांगितले की, सीमावर्ती भागात शांतता आणि वास्तविक नियंत्रण रेषेचा आदर करणे हे द्विपक्षीय संबंध सामान्य होण्यासाठी आवश्यक आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
या बैठकीत डोवाल यांनी सांगितले की, सीमावर्ती भागात शांतता आणि वास्तविक नियंत्रण रेषेचा आदर करणे हे द्विपक्षीय संबंध सामान्य होण्यासाठी आवश्यक आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
दोन्ही बाजूंनी संबंधित द्विपक्षीय करार, नियमावली आणि दोन्ही सरकारांनी भूतकाळात केलेल्या सहमतींचे पूर्णपणे पालन केले पाहिजे.
परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) म्हटले आहे की भारत आणि चीन या दोघांनीही दोन्ही देशांसाठी, प्रदेशासाठी आणि जगासाठी आवश्यक अशा त्यांच्या द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व ओळखले आहे. एमइएने असेही नमूद केले की दोन्ही बाजूंनी जागतिक आणि प्रादेशिक परिस्थितीबाबत असणाऱ्या त्यांच्या दृष्टिकोनावरही चर्चा केली.. भारत आणि चीनमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या राजनैतिक चर्चेनंतर अजित डोवाल आणि वांग यी यांच्यात ही बैठक झाली. अद्याप कोणताही तोडगा न निघालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी मार्गांद्वारे संवाद वाढविण्यास डोवाल आणि वांग यांनी सहमती दर्शवली. मे 2020 पासून, भारतीय आणि चिनी सैन्य आमनेसामने असून संघर्षाच्या काही ठिकाण्यांहून माघार घेण्यात आली असली तरी, सीमा वादावर संपूर्ण तोडगा अद्याप निघालेला नाही.
75 टक्के सैन्य माघारीचे जयशंकर यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, सीमावादाच्या मुद्द्यावर चीनसोबत सुरू असणाऱ्या चर्चेत काही प्रगती झाली आहे. पूर्व लडाख भागात घुसखोरी केलेले चीनचे 75 टक्के सैन्य माघारी गेल्याची माहिती त्यांनी दिली.
“वाटाघाटी सुरू आहेत. आपण थोडीफार प्रगती केली आहे. साधारणपणे सुमारे 75 टक्के सैन्य माघारीचा प्रश्न निकाली निघाला आहे,” असे ते म्हणाले,”आणखी काही गोष्टी करणे बाकी आहे”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे असलेल्या जयशंकर यांनी ग्लोबल सेंटर फॉर सिक्युरिटी पॉलिसी या स्वतंत्र थिंक टॅंकरने आयोजित केलेल्या संवादात्मक सत्रात ही टिप्पणी केली. सीमेवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली सैन्य तैनाती ही एक प्रमुख चिंता असल्याचेही जयशंकर यांनी अधोरेखित केले. गलवान खोऱ्यात जून 2020 मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत-चीन संबंधांवर लक्षणीय परिणाम झाला आहे यावर त्यांनी भर दिला, ते म्हणाले, “सीमेवर हिंसाचार होत असताना द्विपक्षीय संबंध त्यापासून दूर राहू शकत नाहीत.”
टीम भारतशक्ती