Wednesday, March 11, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi DRDO-भारतीय नौदलाने घेतल्या ‘ADC-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या यशस्वी चाचण्या

DRDO-भारतीय नौदलाने घेतल्या ‘ADC-150’ एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या यशस्वी चाचण्या

0
DRDO
DRDO आणि भारतीय नौदलाने P-8I विमानातून हवेत फेकता येण्याजोग्या ADC-150 कंटेनरच्या चाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत 

DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे स्वदेशी ‘एडीसी-150’ म्हणजेच, एअर ड्रॉपेबल कंटेनरच्या चार यशस्वी इन-फ्लाइट रिलीज चाचण्या पूर्ण केल्या. या चाचण्या 21 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 दरम्यान गोव्याच्या किनाऱ्यालगत P 8-I विमानातून घेण्यात आल्या.

विविध प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या या चाचण्यांमध्ये स्वदेशी बनावटीच्या एअर ड्रॉपेबल कंटेनरची क्षमता 150 किलोग्रामपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची आहे हे सिद्ध झाले, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

हा एअर ड्रॉपेबल कंटेनर समुद्रात दूरवर तैनात असलेल्या नौदलाच्या जहाजांना बिकट परिस्थितीत महत्त्वाचे साहित्य, उपकरणे, वैद्यकीय मदत जलद गतीने पोहोचवू शकतो. त्यामुळे नौदलाच्या कार्यात्मक लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठी वाढ होईल. खुल्या समुद्रात कार्यरत असताना संकटात असलेल्या किंवा तातडीने पुनर्भरण आवश्यक असलेल्या जहाजांना मदत करणे हा या प्रणालीमागचा विशेष हेतू आहे.

विशाखापट्टणम येथील नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा ही या उपक्रमासाठी नोडल प्रयोगशाळा आहे. आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट यांनी या कंटेनरसाठी पॅराशूट सिस्टम विकसित केली आहे, तर बंगळुरू येथील सेंटर फॉर मिलिटरी एअरवर्दिनेस अँड सर्टिफिकेशन यांनी त्यासाठी उड्डाण परवानगी आणि प्रमाणन प्रदान केले आहे.

हैदराबाद येथील डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी यांनी चाचण्यांसाठी उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. भारतीय नौदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, P 8-I विमानासाठी ADC-150 प्रणाली अगदी कमी कालावधीत विकसित आणि  सक्षम करण्यात आली. सर्व डेव्हलपमेंटल फ्लाइट ट्रायल्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे, ही प्रणाली लवकरच भारतीय नौदलात समाविष्ट केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleSMPP ला निमलष्करी दलांकडून 10 हजार बुलेटप्रूफ जॅकेटची अतिरिक्त ऑर्डर
Next articleधोरणात्मक साठ्यांमधून मोठ्या प्रमाणात तेल उपलब्ध करून देण्याचा IEA चा प्रस्ताव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here