युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांनी, रशियातील ‘अणुऊर्जा प्रकल्पावर’ही साधले लक्ष्य

0
रशियातील

युक्रेनने रशियातील तेल आणि वीज सुविधांवर केलेल्या भीषण ड्रोन हल्ल्यांदरम्यान, एका अणुऊर्जा प्रकल्पावरही आपले लक्ष्य साधले. रशियातील काही अधिकारी आणि स्थानिक माध्यमांनी बुधवारी याविषयी माहिती दिली.

बेलारूसच्या सीमेला लागून असलेल्या स्मोलेन्स्कच्या पश्चिम भागात अणुऊर्जा सुविधेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ड्रोनला हवाई संरक्षण यंत्रणांनी नष्ट केले, असे राज्यपाल वसिली अनोखिन यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.

स्मोलेन्स्क न्यूक्लियर पॉवर प्लांट, हा रशियाच्या वायव्येकडील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प, त्यावेळी नेहमीप्रमाणेच कार्यरत होता, असा अहवाल RIA राज्य वृत्तसंस्थेने प्लांटच्या प्रेस सेवेचा हवाला देत जारी केला.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर सांगितले की, पश्चिम रशियामधील छाप्यांमध्ये एकूण 104 ड्रोन हल्ले सामाविष्ट होते, सहभागी होते, ज्यापैकी 11 स्मोलेंस्क प्रदेशावर नष्ट करण्यात आले.

एकूणच, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी नऊ प्रदेशांमध्ये ड्रोन नष्ट केले, त्यापैकी जवळपास अर्धे ड्रोन कुर्क्स येथे नष्ट केले, जिथे रशियन सैन्य, युक्रेनी सैनिकांना त्यांच्या हद्दीच्या आत असलेल्या अनेक गावांमधून हुसकावून लावण्यासाठी सध्या संघर्ष करत आहे.

रशियन पेट्रोकेमिकल्सचे दिग्गज सिबूर यांनी सांगितले की, ‘बुधवारी सकाळी युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे आग लागल्याने त्यांनी कस्टोव्हो येथील त्यांच्या प्लांटमधील ऑपरेशन तात्पुरते स्थगित केले होते.’

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन सीमेपासून सुमारे 800 किमी अंतरावर असलेल्या ‘निझनी नोव्हगोरोड’ या प्रदेशातील प्लांटमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेल्गोरोड प्रदेशावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात, एक व्यक्ती जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे,’  असे प्रादेशिक गव्हर्नर म्हणाले.

रशियन एव्हिएशन वॉचडॉग- Rosaviatsia ने, हल्ल्यानंतर रशियाच्या रिपब्लिक ऑफ तातारस्तानमधील- कझान विमानतळावरील आणि लेनिनग्राड प्रदेशातील पुलकोव्हो विमानतळावरील उड्डाणे तात्पुरती थांबवली होती. रोसाव्हिएटियाच्या टेलिग्राम विधानानुसार, आता ही उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाने आक्रमण करत सुरू केलेल्या युद्धात, सामान्य नागरिकांना टार्गेट केल्याच्या वृत्ताचा साफ विरोध केला आहे. याविषयी कीव म्हणतात, की ‘रशियाच्या अंतर्गत हल्ल्यांचा उद्देश मॉस्कोच्या युद्ध प्रयत्नांची पायाभूत सुविधा नष्ट करणे हा आहे.’

(रॉयटर्सच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleअमेरिका इस्रायलमधून Patriot Missiles युक्रेनमध्ये स्थलांतरित करणार
Next articleम्यानमारमध्ये यंदा निवडणुका होणार – जुंटाची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here