दुबईमध्ये सोमवारी 15 एप्रिलपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली पण त्याचे दृश्य परिणाम मंगळवारी दिसून आले. संपूर्ण वाळवंटातील या शहरामधील रस्ते, महामार्ग आणि अगदी विमानतळापासून सगळ्याच गोष्टींवर त्याचा गंभीर प्रभाव पडला. फ्लाय दुबई विमान पुराच्या पाण्यावर उतरण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आला.
दुबई विमानतळ हा जगातील सर्वात व्यस्त आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय वाहतूक केंद्रांपैकी एक आहे. मात्र मुसळधार पावसामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला.
बुधवारी एमिरेट्सने मध्यरात्रीपर्यंत सर्व उड्डाणांसाठी चेक-इन स्थगित करण्याची घोषणा केली. फ्लाय दुबईने दुबईहून निघणारी उड्डाणे याआधीच स्थगित केली.
यूएईची सरकारी वृत्तसंस्था एब्लूएएमने मंगळवारी या पावसाला ऐतिहासिक घटना म्हटले आहे. १९४९ मध्ये डेटा गोळा करण्यास सुरूवात झाल्यापासून हा सर्वाधिक पाऊस देशात झाला आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते निसर्गासोबत छेडछाड केल्याचा परिणाम असल्याचे सांगत आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दुबई आणि संयुक्त अरब अमीरातच्या दुसऱ्या भागात नुकतेच पाऊस आणि त्यानंतर पूर येण्याची घटना क्लाउड सीडिंगशी संबंधित आहे.
संयुक्त अरब अमीरात पृथ्वीवरील सर्वात उष्ण आणि कोरड्या प्रदेशात येतो. या देशात पाऊस वाढवण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा अनेकदा वापर करण्यात येतो. या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश वाढती लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था यासाठी लागणारी पाण्याची गरज पूर्ण करणे हा आहे. याआधी यूएईने २००२ मध्ये आपले क्लाउड सीडिंग ऑपरेशन सुरू केले होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार हवामान तज्ज्ञ अहमद हबीब यांनी सांगितले की नुकतेच सीडिंगसाठी अल-एन विमानतळावरून विमाने पाठवण्यात आली होती.
कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाला क्लाउड सीडिंग असे म्हटले जाते. यामध्ये विमान किंवा किंवा हेलीकॉप्टरचा वापर करून ढगांवर सिल्वर आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडसारखे पदार्थ फवारले जातात. यूएईच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त पाऊस पडावा यासाठी सीडिंग विमानांनी दोन दिवसांत सात वेळा उड्डाणे केली होती. युएईने आपल्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी 2002 मध्ये क्लाउड सीडिंगला सुरू केली, परंतु युएईमध्ये संपूर्ण वर्षातील सरासरी पावसाचे प्रमाण लक्षात घेता इतक्या मोठ्या प्रमाणातील पाण्यासाठी निचरा होण्यासाठी आवश्यक ड्रेनेज सिस्टीम तिथे नाही.
केतकी आंग्रे