चीनमधील यलो नदीच्या उगमस्थानाजवळ पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का

0
भूकंपाचा

चीनच्या किंगहाई प्रांताचा काही भाग बुधवारी 5.5 तीव्रतेच्या भूकंपाने हादरला, याचा केंद्रबिंदू उत्तर चीनला पुरवठा करणाऱ्या मुख्य नैसर्गिक जलमार्ग असलेल्या यलो नदीच्या उगमस्थानाजवळ आहे.

तिबेटमधील हिमालयाच्या पायथ्याशी 6.8 तीव्रतेचा प्राणघातक भूकंप आणि सिचुआनमध्ये 3.1 तीव्रतेचा लहान भूकंप यासह विशाल किंगहाई-तिबेटी पठार मंगळवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले होते.

चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरने (सीईएनसी) दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3ः44 वाजता (0844 जी. एम. टी.) आलेल्या किंगहाई भूकंपाचा केंद्रबिंदू, 14 किमीवर खोल (8.7 मैल)  गोलोग प्रांतातील मडोई काउंटीमध्ये होता.

हे मडोईच्या काउंटी सीटच्या पश्चिमेस सुमारे 200 किमी अंतरावर असून, या शहरात प्रामुख्याने तिबेटी लोक राहतात. यात माजी भटक्या मेंढपाळ आणि त्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे जे पुनर्वसन झाल्याने वर्षानुवर्षे सरकारने बांधलेल्या घरांमध्ये रहातात.

भौगोलिक प्रदेश

मडोईसह किंगहाई-तिबेटी पठाराच्या काठावर भूकंप होणे सामान्य आहे. सीईएनसीच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच वर्षांत बुधवारी झालेल्या भूकंपाच्या तुलनेत 200 किमीच्या आत 3 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे एकूण 102 भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत, ज्यापैकी सर्वात मोठे धक्के 2021 मध्ये 7.4 तीव्रतेपर्यंतचे होते.

बुधवारी झालेल्या किंगहाई भूकंपाचा केंद्रबिंदू एक दिवस आधी तिबेटमध्ये झालेल्या भूकंपाच्या ईशान्येस सुमारे एक हजार किमीवर आहे. तिबेटच्या भूकंपात 126जणांचा बळी गेला आहे.

अनुकृती
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleगाझामध्ये इस्रायली हल्ल्यात 22 ठार, संघर्षाचा सलग पंधरावा महिना
Next articleArmy Charts Blueprint For 2025: A ‘Year of Reforms’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here