Air India विमानातील इंधन स्विच लॉक्स सुरक्षित: FAA आणि बोईंगचा दावा

0
Air India
13 जून 2025 रोजी, अहमदाबाद येथे, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमानाशेजारी एक अग्निशमन दलाचा जवान पाहणी करताना. सौजन्य: रॉयटर्स/अदनान अबिदी (फाइल फोटो)

अहमदाबाद विमान दुर्घटनेची चौकशी सुरू असताना, ‘अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि बोईंग कंपनीने, Air India च्या अपघातग्रस्त बोईंग विमानातील इंधन कटऑफ स्विच लॉक सुरक्षित असल्याचे शांतपणे सांगितले आहे,’ अशी माहिती एका दस्तऐवजाद्वारे आणि चार सूत्रांच्या सांगण्यावरुन समोर आली आहे.

11 जुलै रोजी, FAA ने जारी केलेल्या Continued Airworthiness Notification मध्ये असे नमूद केले आहे की, ‘मागील महिन्यात Air India च्या बोईंग 787-8 विमानाच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालात इंधन कटऑफ स्विच संदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. या भीषण अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता.’

FAA ने, नागरी उड्डाण प्राधिकरणांना दिलेल्या सूचनेत म्हटले आहे की: “इंधन कंट्रोल स्विचचे डिझाईन, त्यामध्ये असलेले लॉकिंग फिचर यांसारखे घटक बोईंगच्या विविध विमानांमध्ये सारखे असले तरी, FAA ला असे वाटत नाही की हे डिझाईन इतके असुरक्षित आहे की त्यावर कोणत्याही बोईंग विमानावर एअरवर्थिनेस डिरेक्टिव्ह लागू केली जावी – यात बोईंग मॉडेल 787 चाही समावेश आहे.”

बोईंगनेही काही दिवसांपूर्वी, विमान कंपन्यांना पाठवलेल्या Multi-Operator Message मध्ये- FAA च्या सूचनेचा हवाला दिला असून कोणतीही कृती करण्याची गरज नाही, असे सांगितले असल्याचे दोन सूत्रांनी सांगितले.

भारताच्या एअरक्राफ्ट अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने, अपघातावर तयार केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात 2018 च्या FAA सल्लागाराची नोंद केली आहे, ज्यात काही बोईंग मॉडेल्स – जसे की 787 चाही समावेश आहे, ज्याच्या ऑपरेटर्सना इंधन कटऑफ स्विचमधील लॉकिंग फिचर तपासण्याची शिफारस करण्यात आली होती, जी सक्तीची नव्हती.

अहवालानुसार, Air India ने सांगितले होते की– त्यांनी ही तपासणी केली नव्हती कारण FAA चा 2018 चा सल्ला हा बंधनकारक नव्हता. मात्र देखभाल नोंदी दर्शवतात की, अपघातग्रस्त विमानाचे 2019 आणि 2023 मध्ये थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (ज्यात इंधन स्विचेस असतात) बदलण्यात आले होते.

अहवालात हेही नमूद करण्यात आले की, “सर्व लागू होणाऱ्या एअरवर्थिनेस डिरेक्टिव्ह्ज आणि अलर्ट सर्व्हिस बुलेटिन्स विमानावर तसेच इंजिनांवर लागू करण्यात आले होते.”

पायलटची चूक नाकारली

ALPA India, जी मॉन्ट्रियल-स्थित आंतरराष्ट्रीय वैमानिक संघटनेचा भारतीय पायलट प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, तिने शनिवारी एका निवेदनात पायलटच्या चुकीचा कोणताही निष्कर्ष नाकारला आहे आणि “निष्पक्ष व वस्तुनिष्ठ चौकशी”ची मागणी केली आहे.

“पायलट संघटनेला आता किमान निरीक्षक म्हणून तरी चौकशीत सहभागी केले पाहिजे,” असे ALPA India चे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी रविवारी सांगितले.

ALPA India ने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या पत्रात नमूद केले की, ‘प्राथमिक चौकशी अहवालात 2018 च्या FAA सल्लागाराचा उल्लेख आहे, जो इंधन कंट्रोल स्विच गेट्स संदर्भातील संभाव्य उपकरण बिघाडाकडे इशारा करतो.’

अहवालात नमूद केल्यानुसार, उड्डाणाच्या शेवटच्या क्षणी कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एका पायलटने दुसऱ्याला विचारले की: ‘त्याने इंधन का बंद केले?’ यावर दुसऱ्या पायलटने उत्तर दिले की: ‘त्याने तसे केलेच नाही’.

अहवालात असेही सांगितले आहे की, टेकऑफनंतर जवळजवळ एकाच वेळी इंधन स्विचेस “रन” स्थितीतून “कटऑफ” स्थितीत गेले. मात्र हे स्विच फ्लाइट दरम्यान कसे बदलले याबाबत काही माहिती दिली गेली नाही.

अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांचा पाठिंबा

शनिवारी दोन अमेरिकन विमान सुरक्षा तज्ज्ञांनी, ALPA India च्या चौकशीत निरीक्षक म्हणून सहभागी होण्याची मागणी योग्य असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी त्यांनी असेही नमूद केले की, अहवालात पायलटच्या चुकीकडे स्पष्टपणे बोट दाखवलेले नाही.

पायलट आणि ALPA US चे माजी प्रतिनिधी जॉन कॉक्स, यांनी सांगितले की- “AAIB चा अहवाल वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष वाटतो.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीनंतर, EU ने प्रत्युत्तर देण्यास नकार दिला
Next articleट्रम्प रॅलीतील त्रुटींसाठी अमेरिकन सिनेटच्या अहवालात गुप्तहेर यंत्रणेवर ताशेरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here