भारताने रेल्वे लाँचरमधून ‘अग्नि-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली

0

भारताने रेल्वे-आधारित लाँचरमधून ‘अग्नि-प्राइम‘ (Agni-Prime) या अण्वस्त्र-सक्षम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यानिमित्ताने भारताने आपल्या धोरणात्मक प्रतिबंधक कार्यक्रमात एक मोठा टप्पा गाठला आहे. क्षेपणास्त्र प्रणालीला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडणारी ही अशा प्रकारची पहिलीच चाचणी आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) द्वारे विकसित केलेले, अग्नि-प्राइम हे 2,000 किमी पर्यंत मारा करणारे, नवीन पिढीचे, अण्वस्त्र-सक्षम, मध्यम-श्रेणीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे अग्नी मालिकेतील पूर्वीच्या क्षेपणास्त्रांपेक्षा हलके, अधिक अचूक आणि अधिक गतिशील (mobile) आहे.

डीआरडीओने म्हटले आहे की, “हे क्षेपणास्त्र देशाला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गतिशीलता प्रदान करते आणि कमी दृश्यमानतेसह त्वरीत प्रक्षेपित केले जाऊ शकते. हे स्वयंपूर्ण असून यात अत्याधुनिक दळणवळण प्रणाली आणि संरक्षण यंत्रणांसह स्वतंत्र प्रक्षेपण क्षमता आहे. क्षेपणास्त्राच्या मार्गाचा विविध भू-केंद्रांनी मागोवा घेतला आणि प्रक्षेपण निर्दोषपणे पार पडले, ज्यामुळे मिशनची सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण झाली. ही यशस्वी चाचणी प्रगत रेल्वे-आधारित प्रणालींना सेवेत समाविष्ट करण्यास मदत करेल. या चाचणीचे निरीक्षण डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि सामरिक दल कमांडच्या अधिकाऱ्यांनी केले.ठ

रोड मोबाइल अग्नि-पी, हे अनेक यशस्वी उड्डाण चाचण्यांनंतर आधीच सेवेत समाविष्ट केले गेले आहे.

ऑगस्टमध्ये, ओडिशातील चांदीपूर येथे झालेल्या अग्नि-प्राइमच्या आधीच्या चाचणीनंतर, काही आठवड्यांनी ही चाचणी झाली आहे. या चाचणीच्या आधी मार्च 2024 मध्ये बहुचर्चित अग्नि-5 ‘मिशन दिव्यास्त्र’ चाचणी झाली होती, ज्यामध्ये भारताने अनेक स्वतंत्रपणे लक्ष्य करण्यायोग्य री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानाचा पहिला यशस्वी वापर दाखवला. सध्या एसएफसीद्वारे वापरल्या जाणाऱ्या एकल-वॉरहेड क्षेपणास्त्रांच्या विपरीत, MIRV -सुसज्ज प्रणाली एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांवर अनेक अण्वस्त्र वॉरहेड्स घेऊन त्यांना सोडू शकते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चाचणीचे कौतुक करताना भारताच्या वाढत्या क्षमतांचे प्रदर्शन म्हणून त्याचे वर्णन केले: “आज विशेषतः तयार केलेल्या रेल्वे-आधारित मोबाइल लाँचरमधून (rail-based mobile launcher) केलेली ही अशा प्रकारची पहिलीच चाचणी आहे, ज्यात कोणत्याही पूर्वअटींशिवाय रेल्वे नेटवर्कवर फिरण्याची क्षमता आहे. हे देशभरात गतिशीलता, कमी दृश्यमानता आणि कमी वेळेत त्वरित प्रक्षेपण सुनिश्चित करते,” असे त्यांनी X वर पोस्ट केले.

त्यांनी डीआरडीओ, सामरिक दल कमांड (SFC) आणि सशस्त्र दलांचे (Armed Forces) अभिनंदन केले. त्यांनी या चाचणीला एक ऐतिहासिक यश म्हटले, ज्यामुळे कॅनइस्टेराईज्ड बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (canisterised ballistic missiles) मोबाइल रेल्वे प्लॅटफॉर्मवरून तैनात करण्याची क्षमता असलेल्या निवडक राष्ट्रांच्या गटात भारताचा समावेश झाला आहे.

अग्नि-प्राइम: पुढील पिढीच्या क्षमता

  • कॅनइस्टेराईज्ड प्रक्षेपण प्रणाली: संरक्षणासाठी आणि जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी एका सीलबंद कॅनिस्टरमध्ये ठेवलेले, ज्यामुळे जलद गतिशीलता आणि अनेक प्लॅटफॉर्मवरून (road आणि rail-based systems) प्रक्षेपणाची सोय होते.
  • श्रेणी: 1,000-2,000 किमी, जे अग्नि-1 (Agni-I) आणि अग्नि-2 (Agni-II) यांच्यातील अंतर भरून काढते. या क्षेपणास्त्रांना बदलण्यासाठीच ते तयार केले आहे.
  • प्रणोदन: हलके कंपोझिट मोटर केसिग्स असलेले दोन-टप्प्याचे, घन-इंधन क्षेपणास्त्र.
  • मार्गदर्शन: रिंग-लेझर गायरोस्कोप आणि मायक्रो-इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम वापरणारी प्रगत ड्युअल रिडंडंट प्रणाली, तसेच अचूकतेसाठी जीपीएस (GPS) आणि भारताच्या नॅव्हिक (NaVIC) उपग्रह प्रणालीचे ऐच्छिक समर्थन.
  • चपळता: शत्रूच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना चुकवण्यासाठी मॅन्युव्हरेबल री-एंट्री व्हेईकल सह सुसज्ज.
  • वॉरहेड्स भविष्यात MIRVs सह समाकलनासाठी डिझाइन केलेले, ज्यामुळे मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते.
  • तैनाती : भारताच्या अण्वस्त्र शस्त्रागाराचे व्यवस्थापन करणाऱ्या सामरिक दल कमांडद्वारे हे चालवले जाते. रोड-मोबाइल प्रकार आधीच सेवेत समाविष्ट केले गेले आहेत.

धोरणात्मक महत्त्व

रेल्वे-प्रक्षेपणाची क्षमता भारताच्या अण्वस्त्र प्रतिबंधात  एक नवीन स्तर जोडते, ज्यामुळे ते अधिक अनपेक्षित आणि टिकाऊ बनते. निश्चित सायलो  किंवा दृश्यमान रोड काफिल्यांच्या विपरीत, रेल्वे-आधारित लाँचर विशाल रेल्वे नेटवर्कमध्ये सहज मिसळू शकतात, ज्यामुळे शत्रूंसाठी त्यांचा शोध घेणे आणि त्यांना लक्ष्य करणे अधिक कठीण होते.

अग्नि-प्राइम हळूहळू जुन्या अग्नि-1 आणि अग्नि-2 क्षेपणास्त्रांची जागा घेत असल्याने, भारत विकसित होत असलेल्या प्रादेशिक धोक्यांना प्रतिसाद म्हणून एक अधिक हलके, अधिक लवचिक आणि टिकाऊ अण्वस्त्र सामर्थ्य विकसित करत आहे.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleभारतातील सरकारी नियमांना X चे आव्हान; न्यायालयाने फेटाळली याचिका
Next articleचीन, ट्रम्प आणि इंडो-पॅसिफिक: फ्रान्स भारताबाबत आशावादी का आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here