भारतीय सशस्त्र दल, 2025 या नवीन वर्षात त्यांच्या ‘संयुक्त थिएटर कमांड्स’ स्थापनेच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. दोन वर्षांच्या व्यापक सल्लामसलती आणि सहकारी प्रयत्नांनंतर, भारतीय सैन्य प्रमुख, या महत्त्वाकांक्षी योजनेला अंमलात आणण्यासाठी पहिले ठोस पाऊल उचलत आहेत. या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमध्ये संयुक्तता वाढवण्यासाठी उपाययोजना सुरू करणे.
भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)- जनरल अनिल चौहान यांच्या नेतृत्वाखाली, या संक्रमणाअंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जाईल, ज्यामध्ये लष्कराच्या तीन सेवा प्रमुखांना, सिस्टर सर्व्हिस सेवांकडून Aide-de-Camps (ADCs) नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आजवरच्या पारंपारिक पद्धतींपेक्षा हा बदल पूर्णत: वेगळा आहे. कारण यापूर्वी प्रत्येक प्रमुखाचा ADC त्यांच्याच सेवेमधून आणि बहुतेक वेळा त्याच्या पॅरेंट युनिटमधूनच निवडला जात असे.
वरिष्ठ सैन्य स्रोतांच्या म्हणण्यानुसार, ”हा बदल प्रतिकात्मक दिसत असला तरी सेना, नौसेना आणि वायुदलांमधील संयुक्तता आणि समाकलन वाढवण्यासाठी, हा निर्णय एक धाडसी आणि दृश्यमान इशारा आहे”. ‘हा निर्णय संपूर्ण सैन्य दलाला एक मजबूत संदेश देतो, की लष्कराच्या तिनही सेवांच्या एकात्मतेची आणि थिएटर कमांड्सच्या ऑपरेशनल तयारीची दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर आता त्याबाबत एक धोरणात्मक अनिवार्यता बनली आहे.’
रँक्समधील संयुक्तता
जनरल चौहान आणि सेवा प्रमुखांनी गेल्या दोन वर्षांत, संविधानात्मक समाकलनासाठीचे व्यापक प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येतात. त्यांनी जवळपास २०० महत्वाच्या समस्या ओळखून, संयुक्त थिएटर कमांड्ससाठी चौकट तयार करण्याच्या दृष्टीने त्वरित काम सुरु केले. यात आठ प्रमुख क्षेत्रे केंद्र बिंदू म्हणून उदयास आली. ज्यामध्ये- ऑपरेशन्स आणि गुप्तचर, ऑपरेशनल लॉजिस्टिक्स, क्षमता विकास, संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान, प्रशिक्षण, देखभाल आणि समर्थन सेवा, मानवी संसाधने, आणि प्रशासकीय व कायदेशीर बाबी इत्यादींचा समावेश आहे.
२०२३ आणि २०२४ दरम्यान, सेवा विभागांमध्ये कनिष्ठ आणि मध्यवर्ती स्तरावरील अधिकाऱ्यांची क्रॉस-पोस्टिंग ही सुधारणा प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक बनली. ज्यामुळे तिन्ही सेवांमधील कर्मचारी वातावरणात अनुकूलता येण्यास मदत होऊ शकते. २०२४ च्या मध्यापर्यंत, मध्यवर्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानव संसाधन सुधारणा प्रक्रियेद्वारे, सिस्टर सेवांमध्ये ऑपरेशनल भूमिका दिल्या जात होत्या. या उपाय योजना भविष्यात अखंड एकात्मतेचा पाया घालण्याच्या दृष्टीकोनातून, संयुक्ततेची संस्थात्मक संस्कृती तयार करण्यासाठी डिझाइन केलेल्या आहेत.
दरम्यान, सिस्टर सेवांमधून ADCs ची नियुक्तीचा हा प्रयत्न, सशस्त्र दलांच्या उच्च पातळीवर सहकार्याची भावना रुजवण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे. विश्लेषक या निर्णयाला, सैन्याच्या थिएटर कमांड्ससाठी असलेल्या वचनबद्धतेचा एक मजबूत संकेत मानतात. ज्यामुळे गेल्या दोन वर्षांत सुरू केलेल्या संरचनात्मक आणि प्रक्रियात्मक बदलांना बळकटी मिळते, असे त्यांचे मत आहे.