फ्रान्सने ‘Mirage Fighter’ ची पहिली तुकडी, युक्रेनकडे सुपूर्त केली

0
फ्रान्सने
मिराज 2000-5 लढाऊ विमानांची पहिली तुकडी फ्रान्सकडून युक्रेनकडे सुपूर्त

फ्रान्सने गुरुवारी यूक्रेनला आपल्या पहिल्या ‘मिराज लढाऊ विमानांच्या’ तुकडीचे हस्तांतरण केले, जे त्यांच्या युरोपीय प्रयत्नांचा एक भाग आहे, आणि ज्याचा उद्देश, कीव आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धात, कीवला सहकार्य करणे आणि युक्रेनला अमेरिकेने पाठिंबा दिल्यानंतर पॅरिसची वचनबद्धता दर्शविणे, हा आहे.

राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, यांनी गेल्या जूनमध्ये यूक्रेनी पायलट्सना, ‘डॅसो मॅड मिराज 2000’ हे लढाऊ विमान उडवण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे वचन दिले होते, जो कीवच्या सैन्य समर्थनातील एक नवीन टप्पा होता.

“फ्रान्समध्ये काही महिने प्रशिक्षण घेतलेले यूक्रेनी पायलट्स, आता यूक्रेनच्या हवाई सीमांचे संरक्षण करण्यात भाग घेतील,” असे संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकॉर्नू यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले.

यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमीर झेलेन्स्की, यांनी X वर पुष्टी केली की, “फ्रान्सकडून मिराज 2000 लढाऊ विमानांची पहिली तुकडी आली आहे, जी आपल्या हवाई संरक्षण क्षमतांना वृद्धिंगत करणार आहे.”

अधिकार्यांनी सांगितले की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव पॅरिसने नेमक्या किती लढाऊ विमानांचे वितरण केले आहे, याची आकडेवारी सांगितलेली नाही. या विमानांना खास जमिनीवरील हल्ल्यांकरता डिझाईन करण्यात आले आहे.’

फ्रान्सच्या हवाई दलातील, ‘राफेल लढाऊ विमानांची’ जागा आता या विमानांनी घेतली असून, प्रामुख्याने हे विमान हवाई डॉग फाईट्ससाठी तयार करण्यात आले होते.

युक्रेनने वारंवार पश्चिमी सहयोगींवर, अधिक जटिल शस्त्रास्त्र आणि शस्त्रसामग्री पुरवठा करण्यासाठी दबाव टाकला आहे, ज्यात आर्मर्ड वाहने, टँक्स, लांब श्रेणीची क्षेपणास्त्रे आणि अमेरिकेतील F-16 लढाऊ विमानांचा समावेश आहे.

2024 मध्ये, पहिली F-16 जेट विमाने युक्रेनमध्ये आली. तथापि, रशियाच्या हवाई दलाच्या सामर्थ्यामुळे त्यांचा युद्धावर प्रभाव मर्यादित राहिला.

“आम्ही आमच्या F-16 फ्लीटचा विस्तार करत आहोत,” असेही झेलेन्स्की यांनी त्यांच्या सोशल मिडीयवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

मिराज 2000 हे एक बहु-भूमिका प्रदान करणारे, सिंगल-इंजिन जेट फायटर आहे. 2024 च्या शेवटच्या फ्रेंच संसदीय अहवालात म्हटले आहे की, फ्रान्सच्या हवाई दलात 26 मिराज 2000-5 विमानांपैकी सहा यूक्रेनला दिली जातील.

फ्रान्स 12 फेब्रुवारी रोजी, यूक्रेन आणि त्याचे मुख्य युरोपीय सहयोगी- ब्रिटन आणि अमेरिकेसोबत एक बैठक आयोजित करणार आहे, ज्यामध्ये कीवला अधिकाधिक समर्थन कसे दिले जाऊ शकते यावर चर्चा केली जाईल.

यूक्रेन समोरील वाढत्या आव्हानांसोबत युद्धाचे राजनैतिक निराकरण करण्यासाठी, पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनामुळे या प्रयत्नांना नव्याने महत्त्व आणि प्राप्त झाली आहे.

रॉयटर्सच्या इनपुटसह


Spread the love
Previous articleअमेरिकन सैन्याची गरज नाही, इस्रायल गाझाचा ताबा देणार- ट्रम्प
Next articleProtesters Burn Sheikh Hasina’s Father’s House

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here